Marathi News and Latest News from Mumbai, Maharashtra, Konkan, Pune, Nagpur, India and World - ABP Majha formerly Star Majha

सलमानचे पिता, ज्येष्ठ लेखक सलीम खान रुग्णालयात  

बॉलिवूडचा दबंग हिरो सलमान खानचे पिता आणि सुप्रसिद्ध लेखक सलीम खान यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हर्नियाच्या ऑपरेशनसाठी सलीम खान यांना लीलावती रुग्णालयात नेण्यात आलं आहे. ...  विस्तृत बातमी »

लग्नाच्या एका महिन्यातच पत्नीला व्हॉट्सअॅपवरुन घटस्फोट  

व्हॉट्सअॅपचे जसे फायदे तसे तोटेही समोर येत आहेत. केरळच्या 21 वर्षीय कॉलेज विद्यार्थिनीने मोठ्या अपेक्षेने एका एनआरआयसोबत लग्न केलं. मात्र लग्नाच्या अवघ्या एका महिन्यात पतीने व्हॉट्सअॅपवर तिला घटस्फोट दिला. ...  विस्तृत बातमी »

कुत्र्यासोबत खेळण्यास नकार, 11 वर्षाच्या मुलाकडून 8 वर्षाच्या मुलीची हत्या  

अमेरिकेतील व्हाईट पाईनमध्ये अक्षरशः मनाला सुन्न करणारी एक घटना घडली आहे. कुत्र्यासोबत खेळण्यास नकार दिल्यामुळे 11 वर्षांच्या मुलाने 8 वर्षांच्या मुलीची गोळ्या झाडून हत्या केल्याचं वृत्त आहे. ...  विस्तृत बातमी »

टॉप हेडलाईन्स

संजय गांधी अभयारण्यात बिग बींच्या मागे वाघ, 4 किमी पाठलाग  

बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांच्या मागे खरेखुरे वाघ लागले. एखाद्या सिनेमात पाहावं, तसाच खराखुरा अनुभव बिग बींना बोरिवलीच्या संजय गांधी अभयारण्यात आला. ...  विस्तृत बातमी »

लवासाला झटका, शेतकऱ्यांची 200 एकर जमीन परत करा; पुणे प्रांताधिकाऱ्यांचे आदेश  

लवासाला पुण्याच्या उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी जोरदार दणका दिला आहे. लवासातील 200 एकर जमीन शेतकऱ्यांना परत करा, असे आदेश पुणे उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत. ...  विस्तृत बातमी »

डाऊनहिल रायडिंगमध्ये पुण्याचा युवास्टार, पियुष चव्हाणची भरारी  

पुण्याचा डाऊनहिल रायडर पियुष चव्हाणला स्कॉट स्पोर्ट्सची साथ मिळाली आहे. या स्विस स्पोर्ट्स कंपनीनं भारतातल्या युवा सायकलपटूंसाठी स्कॉलरशिप योजना सुरु केली असून, त्यासाठी पियुषची निवड झाली आहे. ...  विस्तृत बातमी »

माजी क्रिकेटर नवज्योतसिंग सिद्धू रुग्णालयात दाखल  

भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज आणि भाजपचा माजी खासदार नवज्योतसिंग सिद्धूला दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ...  विस्तृत बातमी »

मैदानावर सचिन, शेन वॉर्न पुन्हा अवतरणार, अमेरिकेत टी-20 मालिका  

सचिन तेंडुलकर आणि शेन वॉर्न या दोन अवलियांमधल्या द्वंद्वांचा आनंद लुटण्याची संधी नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेतल्या क्रिकेटरसिकांना मिळणार आहे. ...  विस्तृत बातमी »

कोल्हापुरात काडीमोड, मात्र कल्याण-डोंबिवलीत शिवसेना-भाजप युतीचे संकेत  

कोल्हापुरात शिवसेना-भाजपनं काडीमोड घेतला असला तरी कल्याण-डोंबिवली महापालिकेत सेना-भाजपची युती होण्याची शक्यता आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी युतीसंदर्भातले स्पष्ट संकेत दिले आहेत. ...  विस्तृत बातमी »

विनाचालक ट्रक 14 किमी धावला, चाचणी यशस्वी  

एकीकडे विनाचालक कारबाबत संशोधन सुरु असताना दुसरीकडे मात्र, जर्मनीतील डायमेलर आणि मर्सडिज-बेंझ यांनी विनाचालक ट्रकची रहदारी असणाऱ्या रस्त्यावर यशस्वी चाचणी घेतली आहे. ...  विस्तृत बातमी »

#टोलचाझोल : MSRDC चा आणखी एक खोटारडेपणा, सातारा- कागल टोल नाक्यांवरील आकड्यांची टोलवाटोलवी  

मुंबई एण्ट्री पाईंट आणि एक्स्प्रेस वेच्या घोटाळ्यानंतर आता सातारा -कागल प्रकल्पाचा घोटाळा पुढे आला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते संजय शिरोडकर यांनी माहिती अधिकाराद्वारे मिळवलेली माहिती आणि MSRDC ची मा ...  विस्तृत बातमी »

मी कोणत्याही प्रकारे आत्महत्येचा प्रयत्न केला नव्हता: इंद्राणी मुखर्जी  

"मी कोणत्याही गोळ्या घेतल्या नव्हत्या किंबहुना मी कोणत्याही प्रकारे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला नाही." असा खुलासा शीना बोरा हत्या प्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जी हिने केला आहे. पोलिसांना दिलेल्य ...  विस्तृत बातमी »

चमचमती भारत-पाक सीमारेषा... थेट अंतराळातून वेध, फोटो सोशल मीडियावर व्हायरल  

अमेरिका अंतराळ संशोधन संस्था नासाने नुकताच भारत आणि पाकिस्तान आतंरराष्ट्रीय सीमारेषेचा आंतराळातून घेतलेला फोटो फेसबुकवर शेअर केला आहे. ...  विस्तृत बातमी »

लालू प्रसाद यांचा धाकटा मुलगा 26 वर्षांचा, मोठा पंचविशीचा  

बिहार निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून आरोप-प्रत्यारोपांचे बाण सुरु आहेत. मात्र नामांकन पत्रामध्ये लालू प्रसाद यांच्या मुलांच्या वयात गोलमाल दिसून आला आहे. त्यांचा मोठा मुलगा तेज प्रतापने वय ...  विस्तृत बातमी »

चार वर्षीय चिमुरड्याच्या पोटात भ्रूण, वैद्यकीय शास्त्रातील दुर्मिळ घटना  

एका 4 वर्षीय मुलाच्या पोटात भ्रूण असल्याचा अनोखी घटना समोर आली आहे. वैद्यकीय शास्त्रातील ही फारच दुर्मिळ घटना असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. ...  विस्तृत बातमी »

बॉलिवूड किंग शाहरुख खानचे एडिनबरा विद्यापीठात खास व्याख्यान  

बॉलिवूड किंग शाहरुख खान 15 ऑक्टोबरला एडिनबरा विद्यापीठात विद्यार्थ्यांना खास व्याख्यान देणार आहे. विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवर याबाबत माहिती देण्यात आली आहे. ...  विस्तृत बातमी »

12 हजार नको, 50 हजार रुपये द्या; दिल्लीतील आमदारांना हवी चौपट पगारवाढ!  

महागाईचे चटके फक्त सामान्य जनतेलाच बसतात, असा जर तुमचा समज असेल तर दिल्लीच्या आमदारांनी चूक ठरवलं आहे. दिल्लीच्या आमदारांना जवळपास चौपट पगारवाढ करण्याची मागणी केली आहे. तसा प्रस्तावच एका समितीनं मांडल ...  विस्तृत बातमी »

भव्य दाढी- मिशी स्पर्धा, मुछे हो तो नथ्थुलाल जैसी हो.. वर्ना ना हो !  

"मुछे हो तो नथ्थुलाल जैसी हो.. वर्ना ना हो".. हा अमिताभचा फेमस डायलॉग. वर्ष उलटून गेली पण हा डायलॉग अगदी कालपरवाचाच वाटतो. ...  विस्तृत बातमी »

मोदींच्या नेतृत्त्वावर ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सहगल नाराज, साहित्य अकादमी पुरस्कार परत करण्याचा निर्णय  

येष्ठ साहित्यिका नयनतारा सहगल यांनी साहित्य अकादमी पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत सहगल यांनी हा निर्णय घेतला आहे. ...  विस्तृत बातमी »

पुणे: मंदिराच्या पायरीवर चप्पल काढली, वृद्धास बेदम मारहाण  

मंदिराच्या पायरीवर चप्पल काढल्याच्या कारणावरुन, चौघाजणांनी एका वृद्धास बेदम मारहाण केली. ही घटना पिंपरी-चिंचवडमध्ये वाकड येथील दत्तमंदिरात नुकतीच घडली. ...  विस्तृत बातमी »

गणपती मंदिरात मुस्लीम महिला प्रसुत, बाळाचं नाव 'गणेश'  

हिंदू आणि मुस्लीम धर्माचे नागरिक एकमेकांच्या मदतीला धावून आल्याची अनेक उदाहरणं आपण पाहतो. एकीकडे अफवांमुळे विनाकारण धार्मिक तेढ निर्माण होत असल्याच्या घटना ताज्या असताना हिंदू-मुस्लीम समभावाचं दर्शन घ ...  विस्तृत बातमी »

जेव्हा विमान आकाशात असतानाच पायलटचा मृत्यू होतो...  

अमेरिकन एअरलाइन्सच्या इतिहासात एक दुर्दैवी घटना घडली. बोस्टनला झेपावलेलं विमान हवेत असतानाच पायलटचा मृत्यू झाला, मात्र विमान यशस्वीपणे लँड करण्यात आलं आणि 147 प्रवासीही सुखरुप आहेत. ...  विस्तृत बातमी »

दैवी चमत्कार की आधुनिक विज्ञानाचा विजय, चिमुकल्याचं धडावेगळं शीर पुन्हा जोडलं !  

जादूई करिष्मा हा शब्द आपण ऐकला, वाचला आहे. पण जादूई करिष्मा म्हणजे नेमकं काय आणि तो कसा असतो, हे ऑस्ट्रेलियातील डॉक्टरांनी जगाला दाखवला आहे. ...  विस्तृत बातमी »

दुबईला जायचंय? स्पाईसजेटकडून स्वस्त आणि मस्त ऑफर!  

बजेट एअरलाईन म्हणून प्रसिद्ध असलेल्या स्पाईसजेटने विमान प्रवाशांसाठी पुन्हा एक नवी ऑफर आणली आहे. अमृतसर आणि कोझीकोडहून थेट दुबईला जाण्यासाठी नव्या फ्लाईटची घोषणा केली आहे. या फ्लाईटची तिकीट असणार आहे  ...  विस्तृत बातमी »

आमीरच्या कमेंटमुळे सलमान भडकला, मग सलमानच्या उत्तराने आमीर रडला !  

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान यांच्यात सध्या अलबेल नसल्याचं चित्र आहे. या दोघांच्या मैत्रीत 'दरार' निर्माण झाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. ...  विस्तृत बातमी »