एक एकरातून 200 टन ऊस, इन्व्हर्टेड स्प्रिंकलरची कमाल

आठ ते नऊ फूट उंच वाढलेला ऊस, पानांची लांबी पाच फूट, रुंदी 3 इंच आणि सरीच्या दहा फुटाच्या लांबीत सरासरी 55 ते 60 ऊसाची संख्या. ही विश्वास न बसणारी कामगिरी सांगली जिल्ह्यातील उरूण इस्लामपूरच्या अशोक खोत यांनी करुन दाखवली आहे.

712 : Sangli : Sugarcane sprinkler Story of Ashok Khot

सांगली: पॉलीहाऊस किंवा शेडनेटमधील तापमान नियंत्रण करणारे फॉगर्स सगळ्यांनाच माहिती आहेत. मात्र मोकळ्या जागेत आणि तेही ऊसामध्ये अशा फॉगर्सचा वापर केलाय सांगली जिल्ह्यातील उरुण इस्लामपूर गावच्या अशोक खोत यांनी.

आठ ते नऊ फूट उंच वाढलेला ऊस, पानांची लांबी पाच फूट, रुंदी 3 इंच आणि सरीच्या दहा फुटाच्या लांबीत सरासरी 55 ते 60 ऊसाची संख्या. ही विश्वास न बसणारी कामगिरी सांगली जिल्ह्यातील उरूण इस्लामपूरच्या अशोक खोत यांनी करुन दाखवली आहे.

साधारणत: पाच ते सहा महिन्यांनी ऊस या अवस्थेत येतो, मात्र अवघ्या चार महिन्यात खोत यांनी भारदस्त ऊस पिकवला आहे. इन्व्हर्टर मॉड्युलर स्प्रिंकलरचा वापर केल्याने त्यांनी ही किमया साधली आहे.

एकरी 100 टन सहज उत्पन्न

15 वर्षांपासून सातत्यानं ऊसावर लक्ष केंद्रित करणारे अशोक खोत यांची साडे दहा एकर शेती उरुण इस्लामपूर इथं आहे. यातील साडेतीन एकर शेती कोरडवाहू असून उर्वरित सात एकर क्षेत्रावर त्यांचे ऊसाचे सातत्याने प्रयोग सुरु असतात.

Sangli sugarcane Sprinklers 1

गेल्या पाच वर्षाचा ऊसाचा उत्पादनाचा आलेख पाहता ते सहज एकरी 100 टन उत्पादन घेतात.  2013 आणि 2014 मध्ये एकरी 103 टन, 2015 मध्ये 148 टन, 2016 मध्ये एकरी 120 टन आणि यावेळी 2017 मध्ये तुटलेल्या ऊसाचं एकरी 104 टन उत्पादन घेण्यात ते यशस्वी झाले आहेत.

आता यावेळी त्यांना एकरी 200 टन ऊसाच उत्पादन घेऊन जागतिक विक्रम करायचा आहे. यासाठी जमिनीच्या मशागतीपासून ते खत आणि पाणी व्यवस्थापनाचं योग्य नियोजन त्यांनी केलं.

ऊसाचं बियाणं

30 गुंठे क्षेत्रातील ऊसाचा खोडवा तुटून गेल्यानंतर जमिनीची चांगली मशागत करून सेंद्रिय खत, शेणखत, कोंबडी खत यांचा वापर त्यांनी जमिनीत केला. पाच फुटाची सरी सोडून सुरुवातीला बेसल रासायनिक खताचा हप्ता जमिनीत घालून मातीआड केला. अशोक खोत यांनी स्वतःच्या क्षेत्रातील 86032 जातीचा ऊसाचे बियाणे म्हणून वापर केला. एक डोळ्याची कांडी बीजप्रक्रिया करुन सव्वा फुटावर एक याप्रमाणे लावून घेतली.

200 टन ऊस उत्पनादनाचं ध्येय

या 30 गुंठ्यात एकूण 36 ऊस सऱ्यांची संख्या असून यासाठी त्यांना 5227 एक डोळ्याची कांडी लागली. उसाची एक डोळ्याची कांडी लावण करून चार महिने होऊन गेलेत. आज दहा फुटाच्या सरीच्या लांबीत सरासरी 55 ते 60 ऊसाची संख्या असून शेवटपर्यंत 30 हजार ऊसाची संख्या आणि एक ऊस 5 किलोंचा. म्हणजे 30 गुंठ्यात 150 टन आणि एकरी 200 टन ऊसाचं उद्दिष्ट आहे.

इन्व्हर्टर मॉड्युलर स्प्रिंकलर

योग्य शास्त्रोक्त पद्धतीनं ऊसाची लावणं त्याचं खत आणि ठिबक सिंचनाद्वारे पाणी व्यवस्थापन अशोक खोत यांनी केलं. मार्च ते मे या तीन महिन्यात तापमान 40 ते 42 अंशावर जातं. या काळात अति तापमानवाढीचा फटका ऊसला बसत असल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी तज्ज्ञांशी चर्चा केली. या तापमान वाढीच्या काळात जर पिकांवर स्प्रिंकलर बसवले तर निदान तापमान कमी करता येईल, या उद्देशाने त्यांनी इन्व्हर्टर मॉड्युलर स्प्रिंकलर बसविले.

जमिनीपासून 18 फूट उंचीवर लोखंडी पोल उभारून त्यावर ही सिस्टीम बसवली आहे . यासाठी त्यांना सगळा मिळून एक लाख दहा हजार रुपये खर्च आला. या सिस्टीमची वैधता कमीत कमी दहा वर्ष धरली तरी दहा वर्षासाठी खर्च विभागून वर्षाला 11 ते 12 हजार रुपयेच येईल.

Sangli sugarcane Sprinklers

यातून सिस्टिममुळं तापमान नियंत्रण करता येणारच आहे, शिवाय पानावर फवारणीसाठी विद्राव्य खतांचाही वापर, कीटकनाशक आणि बुरशीनाशकाचीही मोठ्या ऊसात सहजरित्या फवारणी करता येणार आहे. पाच सप्टेंबरला ऊसाची भरणी केली असून यावेळी करंजीपेंड युक्त सेंद्रिय खत, रासायनिक खत आणि सूक्ष्मअन्नद्रव्याचा वापर त्यांनी केला.

महाराष्ट्राची सरासरी ऊसाची उत्पादकता पहिली तर 95 ते 100 टन प्रति हेक्टरी आहे. उत्पादकता वाढविण्यासाठी पंचसूत्रीचा वापर करून ऊसाचं उत्पादन वाढविणे शक्य आहे . या ठिकाणी अशोक खोत यांनी या पंचसूत्रीचा वापर करत तापमान नियंत्रणाचा आणखी एक हा प्रयोग केलाय. याचा निश्चित तापमान वाढीच्या काळात फायदा होऊन उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे.

इन्व्हर्टर मॉड्युलर स्प्रिंकलर सिस्टीमची डिझाईन

या इन्व्हर्टर मॉड्युलर स्प्रिंकलर सिस्टीमची डिझाईन करताना 3 बाय 3 मीटरवर जमिनीपासून 18 फूट उंचीवर लावण्यात आले आहेत. 43 लिटर प्रति तास पाण्याचा यातून डिस्चार्ज  होतो. या 30 गुंठ्यात 360 मॉड्युलर स्प्रिंकलर बसविण्यात आले आहेत. यामध्ये पाण्याच्या थेंबाचे रुपांतर सूक्ष्म रूपात होते आणि धुक्यासारखी स्थिती निर्माण होऊन तापमान कमी होण्यास मदत होते.

तापमानानुसार जर 3 ते 5 मिनिटापर्यंत चालविल्यास 5 ते 8 अंश डिग्री सेल्सियसपर्यंत तापमान खाली येते. हिवाळ्यात देखील तापमान घसरल्यास स्प्रिंकलर चालवून तापमान वाढविता येतं. अशा या सिस्टीममधून तापमानाचा ऊसाच्या वाढीवर होणारा परिणाम कमी करता येणार आहे .

आज अनेक जिल्ह्यातील, राज्यातील आणि राज्याबाहेरील शेतकरी अशोक खोत यांच्या ऊसाच्या प्लॉटला भेट देत आहेत. ऊसाची वाढ पाहून समाधान व्यक्त करत आहेत . गुजरातचे शेतकरी आता असा हा प्रयोग करणार असल्याचं आवर्जून सांगतात.
तापमान वाढीच्या नियंत्रणासाठी नर्सरी, पॉलिहाऊस, कुकुटपालनगृहात अशा या स्प्रिंक्लरचा वापर होतो, परंतु पहिल्यांदाच ओपन फिल्डला आणि ते ऊस पिकाला केलेला हा प्रयोग देशातील पहिलाच आहे.

अशोक खोत, उरुण इस्लामपूर  फोन नंबर – ९८२२७४४५५५

 

Agriculture News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:712 : Sangli : Sugarcane sprinkler Story of Ashok Khot
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

कर्जमाफी लाभार्थ्यांच्या यादीत तुमचं नाव आहे का? इथे चेक करा!
कर्जमाफी लाभार्थ्यांच्या यादीत तुमचं नाव आहे का? इथे चेक करा!

मुंबई: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम आजपासून

अनुसूचित जातींचा निधी सरकार कर्जमाफीसाठी वापरणार
अनुसूचित जातींचा निधी सरकार कर्जमाफीसाठी वापरणार

मुंबई : शेतकरी कर्जमाफीसाठी अनुसूचित जाती उपयोजनेचा निधी मंजूर

गोधनातून वर्षाला 36 लाखांची कमाई, माझाचा स्पेशल रिपोर्ट
गोधनातून वर्षाला 36 लाखांची कमाई, माझाचा स्पेशल रिपोर्ट

नाशिक : आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या नकारात्मक गोष्टींकडे न पाहता

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 15/10/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 15/10/2017

  शिवसेनेचं नीच राजकारण, उद्धवची खेळी कधीच विसरणार नाही, राज

फवारणीतून विषबाधा रोखण्यासाठी हेल्मेटचा वापर
फवारणीतून विषबाधा रोखण्यासाठी हेल्मेटचा वापर

वर्धा : गेल्या काही दिवसांपासून कीटकनाशक फवारणीतून विषबाधा होऊन 30

पुणतांब्यात नव्या क्रांतीची तयारी, शेतकरी गावरान वाणाची पेरणी करणार
पुणतांब्यात नव्या क्रांतीची तयारी, शेतकरी गावरान वाणाची पेरणी...

पुणतांबा (अहमदनगर) : शेतकरी संपाची मशाल पेटवणाऱ्या पुणतांब्यातून

मुख्यमंत्र्यांवर हत्येचा गुन्हा दाखल झाला पाहिजे : बाळा नांदगावकर
मुख्यमंत्र्यांवर हत्येचा गुन्हा दाखल झाला पाहिजे : बाळा नांदगावकर

यवतमाळ : कीटकनाशक फवारणीमुळे शेतकऱ्यांच्या मृत्यूस सरकारी यंत्रणा

मनसेचा आक्रमक पवित्रा, शेतकरी मृत्यूप्रकरणी यवतमाळमध्ये तोडफोड
मनसेचा आक्रमक पवित्रा, शेतकरी मृत्यूप्रकरणी यवतमाळमध्ये तोडफोड

यवतमाळ: कीटकनाशकं फवारणी अनेक शेतकऱ्यांच्या जीवावर उठल्यानंतर,

अकोल्यात 14 कोटींचा अवैध कीटकनाशक साठा जप्त
अकोल्यात 14 कोटींचा अवैध कीटकनाशक साठा जप्त

अकोला : कीटकनाशक फवारणी करताना शेतकऱ्यांचा विषबाधा होऊन मृत्यू

दुष्काळी भागात ‘तेजोमय’ शेती, पॉलीहाऊसच्या हायटेक शेतीतून लाखोंचा नफा
दुष्काळी भागात ‘तेजोमय’ शेती, पॉलीहाऊसच्या हायटेक शेतीतून लाखोंचा...

सांगली : दुष्काळग्रस्त भागात जिथे साधी शेती करणंही अवघड असतं, तिथे