शेतमजूर मिळेनात? घाबरु नका, पेरणी ते काढणी सर्व कामं करणारं मशीन!

आता शेतकऱ्यांना शेतमजुरावर अवलंबून राहण्याची गरज नाही. कारण पेरणीपासून ते काढणीपर्यंत सर्व काम करणारं एक मशीन बनवण्यात आलं आहे.

शेतमजूर मिळेनात? घाबरु नका, पेरणी ते काढणी सर्व कामं करणारं मशीन!

वाशिम: सुगीच्या दिवसा शेतमजुर मिळणं हे शेतकऱ्यांसमोरचं मोठं आव्हान असतं. एकीकडे पीकं काढण्याची लगबग सुरु असते, त्याचवेळी शेतकऱ्याचं आभाळाकडे लक्ष असतं. कारण हातातोंडाशी आलेलं पीक पावसात अडकू नये म्हणून सुगीत शेतकऱ्यांची गडबड सुरु असते. त्यासाठी जास्तीत जास्त शेतमजुर घेऊन पीक काढण्याचा प्रयत्न असतो.

मात्र आता शेतकऱ्यांना शेतमजुरावर अवलंबून राहण्याची गरज नाही. कारण पेरणीपासून ते काढणीपर्यंत सर्व काम करणारं एक मशीन बनवण्यात आलं आहे.

हंगामातील काढणीच्या काळात शेतकऱ्यांना मजुरांच्या तुटवड्याच्या समस्येला सामोरं जावं लागतं. शेतातील मालाची वेळेत काढणी होणं गरजेचं असतं. मात्र या काढणीसाठी मजुर काही मिळत नाही. वाशिम जिल्ह्यात प्रामुख्यानं सोयाबीनचं पीक घेतलं जातं. सध्या सोयाबीनचं पीक काढणीच्या अवस्थेत आहे. मात्र काढणीला मजुरचं न मिळाल्यानं शेतकरी चिंतेत सापडलाय. यावर कारडा कृषी विज्ञान केंद्रानी हायटेक उपाय शोधलाय. मेकॅनिकल हार्वेस्टिंग म्हणजेच मशीनद्वारे काढणी करण्याचा प्रयोग त्यांनी यशस्वी करुन दाखवला आहे.

हा सगळा प्रयोग लेबरलेस फार्मिंग या त्यांच्या उपक्रमाखाली करण्यात येतोय. त्यामध्ये नांगरणीपासून काढणीपर्यंतची सगळी कामं मशीनद्वारे करण्यात येतात. पारंपारिक पद्धतीने सोयाबीन काढणीसाठी जिथे एकरी 4 हजाराचा खर्च येतो, तिथे या मशीनद्वारे निम्म्या खर्चात काढणी होते, असं कृषीतज्ज्ञ सांगतात.

एका तासात एक एकर पिकाची काढणी

या मशीनद्वारे एका तासामध्ये एक एकरातील पिकांची काढणी होते. पीक काढणी नंतरचा माल थेट ट्राली अथवा पोत्यामध्ये भरता येतो. मॅकेनिकल कंबाईन हार्वेस्टरद्वारे निघणारा कुटार उत्तम प्रतीचा असतो. जनावरांसाठी त्याचा वापर करता येतो. याचं प्रात्यक्षिक करडा येथील कृषी विज्ञान केंद्रात शेतकऱ्यांना दाखविण्यात आलां. या प्रयोगाला शेतकऱ्यांचा उत्त्म प्रतिसाद मिळालाय.

कृषी विज्ञान केंद्र करडाद्वारे या मॉडेलचा प्रयोग रिसोड तालुक्यातील गोहगाव हाडेमध्ये 50 एकरावर करण्यात आला. यामध्ये मॅकेनिकल कंबाइन हार्वेस्टर मालक आणि शेतकरी यांच्यामध्ये करार करून पिकांची काढणी केली गेली.

या लेबरलेस मॉडेलमुळे शेतकऱ्याचा मजुरांचा मोठा प्रश्न सुटणार आहे. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनच्या काढणीमध्ये या मॉडेलची मोठी मदत होऊ शकते. कृषी विज्ञान केंद्र कराडने  केलेल्या या प्रयोगानं शेतकऱ्यांचा चिंतेचा भारच कमी केला आहे.

शेती शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV