करोडपती बनवणारा शेवगा, बाळासाहेब पाटील यांची यशोगाथा!

चार जणांचं कुटुंब, पारंपरिक शेती आणि कमालीची गरीबी. अशा परिस्थितीतून या कुटुंबाला शेवग्याच्या पिकानं बाहेर काढलं.

Balasaheb Patils Drumstick (shevga) success story

सोलापूर: घरासमोर किंवा शहरातही अगदी सहज दिसणारा शेवगा एखाद्याला लखपतीही बनवू शकतो. याच विषयावर सोलापूरच्या बाळासाहेब पाटील यांनी पुस्तक लिहिलं आहे. शेवग्याच्या लागवडीतून आलेले अनुभव यात त्यांनी लिहिलेत. केवळ शेवग्याच्या उत्पादनावर बाळासाहेब महिना एक लाखांचा नफा कमावत आहेत.

चार जणांचं कुटुंब, पारंपरिक शेती आणि कमालीची गरीबी. अशा परिस्थितीतून या कुटुंबाला शेवग्याच्या पिकानं बाहेर काढलं. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत ज्यांना होती, ते आता महिन्याला 1 लाखाची कमाई करत आहेत. इथेच न थांबता त्यांनी त्यावर पुस्तकही लिहीलं.

‘शेवगा बनवेल करोडपती’ 

हे किमयागार आहेत ‘शेवगा बनवेल करोडपती’ या पुस्तकाचे लेखक बाळासाहेब शिवाजी पाटील. सोलापूर जिल्ह्यातल्या उपळाई खुर्द गावात त्यांची 4 एकर शेती आहे. आता ही संपूर्ण शेती इतर शेतकऱ्यांसाठी शेवग्याचं विद्यापीठ बनलं आहे.

5 वर्षा 30 लाखांची कमाई

शेवग्याच्या पिकातून बाळासाहेबांनी 5 वर्षात 30 लाखांची कमाई केली आहे. या भरघोस यशाबद्दल त्यांना वेगवेगळ्या पुरस्कारांनीही गौरवण्यात आलं. आपल्या घरावर हातात शेवगा घेतलेल्या शेतकऱ्याची प्रतिकृतीही त्यांनी उभारली आहे. इतक्यावरच न थांबता त्यांनी शेतात शेवग्याची नर्सरीही सुरु केली आहे. या नर्सरीमध्ये शेवग्याचं नवं वाणंही त्यांनी विकसीत केलंय.

shevga

पुस्तकाच्या लिखाणामध्ये बाळासाहेबांना त्यांचे भाऊ अरविंद पाटील यांची मोठी मदत झाली. शेतातील शेवग्याच्या नर्सरीचा संपूर्ण जबाबदारी ते सांभाळतात. अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीनं या दोन्ही भावांनी शेवग्याचं पीक घेतलंय.

बाळासाहेबांनी लिहीलेलं पुस्तक इतर शेतकऱ्यांसाठी फायद्याचं ठरतंय. या पुस्तकाच्या 3 हजार प्रतिंची आतापर्यंत विक्री झाली आहे. या पुस्तकात शेवग्याच्या लागवडीपासून त्यासाठी लगणाऱ्या खर्चाबाबत सगळी माहिती आहे. बाळासाहेबांच्या या पुस्तकामुळे अनेक शेतकरी शेवगा शेतीकडे वळत आहेत.

पाणी टंचाई असतानाही शेवग्याची कास

कोरडवाहू शेती आणि पाण्याची टंचाई, यामुळे परिसरातील शेतकरी चिंतेत असायचे. पण बाळासाहेब पाटील यांनी मात्र चिंता न करता शेवग्याची कास धरली. अख्खं कुटुंब शेतात राबलं. गेली तीन वर्षे शेवग्याच पीक सातत्याने आलं. हलाखीची परिस्थिती सुबत्तेत परिवर्तीत झाली. ज्या शेवग्याच्या उत्पन्नातून घर, कुटुंब आणि शेती सुधारली त्या शेवग्याच्या पिकाबद्दल कुटुंबियांना कमालीची आत्मियता आहे.

कमी खर्चात, मात्र उत्तम नियोजनामुळे जास्त उत्पन्न

जेमतेम दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या बाळासाहेबांनी शेवग्याची शेती केली. कमी खर्च, कमी पाणी  आणि जादा उत्पन्न असं या शेवग्याच्या शेतीच रहस्य आहे. पाटील यांनी जिद्द, मेहनत आणी नियोजनाची जोड दिली. आता शेवग्याच्या रोपांची  विक्री करण्याचा व्यवसाय त्यांनी सुरु केलाय. त्याची यशस्वी शेती पाहून शेवग्याच त्याचं वाण घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सुद्धा वाढलीय. एकीकडे शेवग्याचं उत्पन्न आणि सोबत शेवग्याच्या बियांच्या विक्रीतून मिळणारं उत्पन्न असा दुहेरी फायदा बाळासाहेब घेतायत. भविष्यात शेवगा पिकावर आणखी संशोधन करून प्रगती करण्याचा मानस आहे.

शेवग्यामुळे संसाराला आधार!
तीन वर्षांपूर्वी पाटील कुटुंबियांना राहायला घर नव्हतं. कुडाच्या घरात त्याचं कुटुंब राहायचं. गावात त्यांची कसलीही आर्थिक पत नव्हती. शेवग्याच्या पिकाने साथ दिली आणि सुबत्ता आली. बाळासाहेब पाटील यांची सध्याची आर्थिक परिथिती चांगली असली तरी शेतकऱ्यांच्या बाबतीत चिंता वाटतेय. त्यासाठीच ते आपला बराच वेळ शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात घालवतात. कोरडवाहू शेती आणि पाणी टंचाई असलेल्या शेतकऱ्यांना पिक पद्धतीत बदल करण्याचा अट्टाहास ते धरतात. आत्तापर्यंत त्यांनी हजारो शेतकऱ्यांना शेवगा शेती करण्याविषयी मार्गदर्शन केलंय. कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करणाऱ्या या बहाद्दर शेतकऱ्याला तोड नाही.

 शेतात टुमदार घर,घरावर शेतकऱ्याचं शिल्प

शेवग्याच्या उत्पनांतून बाळासाहेब पाटील यांनी शेतात टुमदार घर बांधलं आहे आणि आपल्या घरावर बैलजोडीसह हातात शेवग्याच्या शेंगा असलेलं शिल्प उभारलं आहे. शेतकऱ्याच्या घरावर साकारलेलं आठ फुटांचं शिल्प पंचक्रोशीत कुतूहलाचा विषय बनला आहे.

30 हजार रुपये खर्चून फायबरचं शिल्प

माती आणि पीक याविषयी कायम कृतज्ञता रहावी, या भावनेने पाटील यांनी आपल्या घरावर बैलजोडी आणि हातात शेवगा घेतलेल्या बळीराजाच शिल्प उभारलं आहे. कारण शेवगा उत्पन्नातून बाळासाहेब पाटील यांच्या जीवनात अर्थक्रांती आली. 30 हजार रुपये खर्चून पाटील यांनी बळीराजाची ही फायबरची शिल्पकृती साकारली आहे.

shevga 5

5 एकरात शेवगा, 15 लाखांचं उत्पन्न
पाटील यांची एकूण बारा एकर शेती आहे. त्यापैकी पाच एकरात ते शेवगा घेतात. एकरी 15 टन प्रमाण त्यांना वार्षिक 15 लाखांचं उत्पन्न मिळालं. गेल्या तीन वर्षात सातत्याने शेवग्याच्या उत्पन्नातून पाटील यांची आर्थिक स्थिती  सुधारली. शेवग्याच्या विक्रीतून आलेल्या पैशातून शेतात टुमदार घर बांधलं आहे. ही सगळी किमया शेवग्याने केली आहे. म्हणून पाटील यांनी शेवग्याच्या शेंगा हातात घेतलेल्या बळीराजाच शिल्प घरावर उभ केलं आहे.

Agriculture News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Balasaheb Patils Drumstick (shevga) success story
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

कर्जमाफी लाभार्थ्यांच्या यादीत तुमचं नाव आहे का? इथे चेक करा!
कर्जमाफी लाभार्थ्यांच्या यादीत तुमचं नाव आहे का? इथे चेक करा!

मुंबई: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम आजपासून

अनुसूचित जातींचा निधी सरकार कर्जमाफीसाठी वापरणार
अनुसूचित जातींचा निधी सरकार कर्जमाफीसाठी वापरणार

मुंबई : शेतकरी कर्जमाफीसाठी अनुसूचित जाती उपयोजनेचा निधी मंजूर

गोधनातून वर्षाला 36 लाखांची कमाई, माझाचा स्पेशल रिपोर्ट
गोधनातून वर्षाला 36 लाखांची कमाई, माझाचा स्पेशल रिपोर्ट

नाशिक : आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या नकारात्मक गोष्टींकडे न पाहता

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 15/10/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 15/10/2017

  शिवसेनेचं नीच राजकारण, उद्धवची खेळी कधीच विसरणार नाही, राज

फवारणीतून विषबाधा रोखण्यासाठी हेल्मेटचा वापर
फवारणीतून विषबाधा रोखण्यासाठी हेल्मेटचा वापर

वर्धा : गेल्या काही दिवसांपासून कीटकनाशक फवारणीतून विषबाधा होऊन 30

पुणतांब्यात नव्या क्रांतीची तयारी, शेतकरी गावरान वाणाची पेरणी करणार
पुणतांब्यात नव्या क्रांतीची तयारी, शेतकरी गावरान वाणाची पेरणी...

पुणतांबा (अहमदनगर) : शेतकरी संपाची मशाल पेटवणाऱ्या पुणतांब्यातून

मुख्यमंत्र्यांवर हत्येचा गुन्हा दाखल झाला पाहिजे : बाळा नांदगावकर
मुख्यमंत्र्यांवर हत्येचा गुन्हा दाखल झाला पाहिजे : बाळा नांदगावकर

यवतमाळ : कीटकनाशक फवारणीमुळे शेतकऱ्यांच्या मृत्यूस सरकारी यंत्रणा

मनसेचा आक्रमक पवित्रा, शेतकरी मृत्यूप्रकरणी यवतमाळमध्ये तोडफोड
मनसेचा आक्रमक पवित्रा, शेतकरी मृत्यूप्रकरणी यवतमाळमध्ये तोडफोड

यवतमाळ: कीटकनाशकं फवारणी अनेक शेतकऱ्यांच्या जीवावर उठल्यानंतर,

अकोल्यात 14 कोटींचा अवैध कीटकनाशक साठा जप्त
अकोल्यात 14 कोटींचा अवैध कीटकनाशक साठा जप्त

अकोला : कीटकनाशक फवारणी करताना शेतकऱ्यांचा विषबाधा होऊन मृत्यू

दुष्काळी भागात ‘तेजोमय’ शेती, पॉलीहाऊसच्या हायटेक शेतीतून लाखोंचा नफा
दुष्काळी भागात ‘तेजोमय’ शेती, पॉलीहाऊसच्या हायटेक शेतीतून लाखोंचा...

सांगली : दुष्काळग्रस्त भागात जिथे साधी शेती करणंही अवघड असतं, तिथे