पीक विम्यासाठी आजही बँका सुरु राहणार

पीक विमा भरण्यासाठी आजही (रविवार, 30 जुलै) बँका सुरु राहतील. शिवाय, उद्या म्हणजे सोमवारी (31 जुलै) ज्या बँकांची आठवडी सुट्टी असते, त्याही उद्या सुरु राहतील.

पीक विम्यासाठी आजही बँका सुरु राहणार

मुंबई : पीक विमा भरण्यासाठी आजही (रविवार, 30 जुलै) बँका सुरु राहतील. शिवाय, उद्या म्हणजे सोमवारी (31 जुलै) ज्या बँकांची आठवडी सुट्टी असते, त्याही उद्या सुरु राहतील. पीक विम्याच्या ऑनलाईन पोर्टलचा बोजवारा उडाला असल्याने शेतकरी दोन-दोन दिवस रांगेत उभे आहेत. या स्थितीत आजही बँका सुरु राहणार असल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.

आरबीआयने आदेशात काय म्हटलंय?

पीक विमा भरण्यासाठी प्रादेशिक ग्रामीण बँका आणि सहकारी बँकांच्या ग्रामीण आणि निम-शहरी भागातील सर्व शाखा 30 जुलै 2017 रोजी सुरु राहतील. त्याचसोबत सोमवारी (31 जुलै 2017) ज्या बँकांची आठवडी सुट्टी असते, अशा बँकाही पीक विमा भरण्यासाठी सोमवारी सुरुच राहतील. आरबीआयचे सहाय्यक सल्लागार अजित प्रसाद यांनी यासंदर्भात पत्रक जारी केले आहे.

कृषीमंत्र्यांना आता जाग आली!

पीक विम्यासाठी दोन-दोन दिवस रांगेत उभे राहून शेतकरी पोलिसांचा लाठीमार सहन करत आहेत. त्यानंतर आता राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांना जाग आली आहे. शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी घाई करु नये, असं वक्तव्य कृषीमंत्री पांडुरंग फुंडकरांनी केलं आहे. शिवाय, 15 दिवसांची मुदत वाढवून मिळावी यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला असल्याचंही फुंडकरांनी सांगितलं. दरम्यान, पीक विम्याच्या गोंधळावरून संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बुलडाण्यात पांडुरंग फुंडकरांना काळे झेंडे दाखवले.

संबंधित बातम्या :

...तर पीक विमा भरण्याची मुदत वाढवून मिळणार

पीक विमा भरण्यासाठी रांगेत उभा असलेल्या शेतकऱ्यांवर लाठीचार्ज

शेती शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV