परतीच्या पावसाचा संत्र्यांच्या बागांना फटका, संत्र्यावर वाय बार रोगाचा प्रादुर्भाव

परतीच्या पावसाचा फटका खरीप हंगामातील जवळपास सगळ्याच पिकांना बसला आहे. या पिकांच्या यादीमध्ये आता संत्र्यांचाही समावेश झाला. विदर्भातील कॅलिफोर्नीया अशी ओळख असलेल्या अमरावती जिल्ह्यातील भागामध्ये संत्र्यावर वाय बार नावाचा रोग पडला आहे. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यां सोबतच व्यापारीही चिंताग्रस्त झाले आहेत.

परतीच्या पावसाचा संत्र्यांच्या बागांना फटका, संत्र्यावर वाय बार रोगाचा प्रादुर्भाव

अमरावती : परतीच्या पावसाचा फटका खरीप हंगामातील जवळपास सगळ्याच पिकांना बसला आहे. या पिकांच्या यादीमध्ये आता संत्र्यांचाही समावेश झाला. विदर्भातील कॅलिफोर्नीया अशी ओळख असलेल्या अमरावती जिल्ह्यातील भागामध्ये संत्र्यावर वाय बार नावाचा रोग पडला आहे. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यां सोबतच व्यापारीही चिंताग्रस्त झाले आहेत.

अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी, चांदूर बाजार आणि अचलपूरचा परिसर विदर्भातील कॅलीफोर्निया म्हणून ओळखला जातो. मात्र इथल्या संत्र्यांच्या बागांवर आता रोग पडल्यानं शेतकऱ्यांना नुकसान सहन करावं लागतं आहे.

या भागातील आंबिया बहरातील जवळपास ७० हजार हेक्टरवर संत्रा बागा आहेत. त्यातील बहूतांश बागा रोगाच्या प्रादुर्भावानं वाया गेल्या आहेत. परतीच्या पावसाचं पाणी बागेत साचल्यानं संत्र्यावर वाय बार हा रोग पडला आहे. सध्या धुक्याची परिस्थिती असल्यानंही 30 ते 35 टक्के संत्र्यांचं नुकसान झालं आहे.

संत्र्यांची हमखास आवक असणाऱ्या या परिसरातील उत्पादन घटल्यानं व्यापारीही त्रस्त झाले आहेत. शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी मालच नसल्याने, बाजारातील संत्र्यांची आवक कमी झाली आहे. यामुळे दर अधिक मिळूनही त्याचा फायदा घेता येत नाही, अशी खंत व्यापारी व्यक्त करत आहेत. दिल्ली, कोलकत्ता , मुंबई , मद्रास या ठिकाणी जाणारा इथला माल कमी झाल्यानं व्यापारी चिंताग्रस्त झाले आहेत.

दरम्यान, परिसरातील इतर बागांमध्ये या रोगाचा प्रसार होऊ नये, यासाठी कृषी विभागानं प्रयत्न सुरु केले आहेत.  मोठ्या प्रमाणात जैविक खत आणि अन्न द्रव्यांचा पुरवठा केल्यानं रोगाचा प्रादुर्भाव टाळता येऊ शकतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

रोगाच्या प्रादुर्भावामुळे पिकांचं नुकसान होऊ नये, यासाठी योग्य काळजी घेतल्यास प्रादुर्भाव वाढण्यापासून रोखता येऊ शकतं. त्यामुळे रोगाचं वेळीच निदान करुन उपाय योजना करण्याचा सल्ला कृषी विभागानं शेतकऱ्यांना दिला आहे.

शेती शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Big loss of orange orchards in Amravati
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV