केंद्राकडून 18 कीटकनाशकांच्या वापरावर बंदी

By: एबीपी माझा वेब टीम | Last Updated: Sunday, 8 January 2017 11:25 AM
केंद्राकडून 18 कीटकनाशकांच्या वापरावर बंदी

नवी दिल्ली : कृषी मंत्रालयाने मानवी आणि पशु-पक्षांना हानिकारक असलेल्या 18 कीटकनाशकांच्या वापरावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारकडून यासंबंधित आदेश संबंधित विक्रेता, निर्माता आणि राज्य सरकारला देण्यात आले आहेत.

बंदी घालण्यात आलेल्या कीटकनाशकांपैकी 12 औषधांवर 1 जानेवारी 2018 पासून, तर उर्वरित सहा औषधांवर 31 डिसेंबर 2020 पासून बंदी घालावी, असं केंद्र सरकारने म्हटलं आहे.

इतर देशांमध्ये या औषधांच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे. पक्षी, प्राणी आणि मानवी शरिरासाठी या औषधांचा वापर धोकादायक असल्याचं कृषी मंत्रालयाच्या अहवालात म्हटलं आहे.

भारतीय कृषी संशोधन संस्थेचे माजी प्राध्यापक अनुपम वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली कृषी मंत्रालयाने या औषधांवर अभ्यास करण्यासाठी जुलै 2013 मध्ये समिती नियुक्त केली होती. या समितीच्या शिफारशीनंतर या औषधांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.

भारतात वापरण्यात येणाऱ्या कीटकनाशकांपैकी 66 औषधांवर परदेशात बंदी घालण्यात आलेली आहे. मात्र भारतात याचा वापर सुरुच असल्याचा अहवाल या समितीने दिलाय.

बंदी घालण्यात आलेले कीटकनाशकं

 1. बेनोमील
 2. कार्बारील
 3. डायझिनॉन
 4. फेनारिमॉल
 5. फेन्थिऑन
 6. लिनुरॉन
 7. मिथॉक्झीइथिल मर्क्युरी क्लोराईड
 8. मिथिल पॅराथिऑन
 9. सोडियम सायनाईड
 10. थिओमेटॉन
 11. ट्रायडेमॉर्फ
 12. ट्रायफ्लुरालिन
 13. अलाक्लोर
 14. डायक्लोरव्हास
 15. फोरेट
 16. फॉस्फामिडॉन
 17. ट्रायझोफॉस
 18. ट्रायक्लोरफॉन
First Published: Sunday, 8 January 2017 11:21 AM

Related Stories

गुजरात पोलीस चांगले, पण... : आमदार बच्चू कडू
गुजरात पोलीस चांगले, पण... : आमदार बच्चू कडू

गांधीनगर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तालिबानी सरकारनं आम्हाला

शेतकऱ्यांसाठी एक रुपयात जेवण...!
शेतकऱ्यांसाठी एक रुपयात जेवण...!

बीड : दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. अशा काळात एकेवेळचं बाहेर जेवायचं

शेतकरी कर्जमाफीसाठी राष्ट्रवादीचं भजन आंदोलन
शेतकरी कर्जमाफीसाठी राष्ट्रवादीचं भजन आंदोलन

सांगली: सांगलीत शेतकरी कर्जमाफीसाठी राष्ट्रवादी

शेतकऱ्यांचा समूह करुन शेतातच सौर उर्जा निर्मिती : बावनकुळे
शेतकऱ्यांचा समूह करुन शेतातच सौर उर्जा निर्मिती : बावनकुळे

अहमदनगर : विजेची समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकारने सौर ऊर्जेवर भर

कांदा उत्पादकांना अनुदान देण्यास राज्य सरकारला अखेर मुहूर्त
कांदा उत्पादकांना अनुदान देण्यास राज्य सरकारला अखेर मुहूर्त

मुंबई : कांदा उत्पादकांना अनुदान देण्यास राज्य सरकारकडून अखेर

गरज पडल्यास 22 एप्रिलनंतरही तूर खरेदी सुरु ठेवू : सुभाष देशमुख
गरज पडल्यास 22 एप्रिलनंतरही तूर खरेदी सुरु ठेवू : सुभाष देशमुख

सोलापूर : राज्यातील तूर खरेदी 22 तारखेपर्यंत चालू राहील. गरज भासली तर

बरकत देणारी बकरी, शेळीपालनाची सुरुवात कशी करावी?
बरकत देणारी बकरी, शेळीपालनाची सुरुवात कशी करावी?

बुलडाणा: बुलडाणा जिल्हयातलं लोणार सरोवर प्रसिद्ध आहे. याच परिसरात

व्हायरल सत्य : खरंच शेतकऱ्यांना 3 हजाराची पेन्शन मिळणार का?
व्हायरल सत्य : खरंच शेतकऱ्यांना 3 हजाराची पेन्शन मिळणार का?

मुंबई: शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा राज्यासह देशभरात गाजत आहे. उत्तर

शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारचं एक पाऊल पुढे!
शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारचं एक पाऊल पुढे!

मुंबई: उत्तर प्रदेशातील कर्जमाफीनंतर महाराष्ट्र सरकारवरही

शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीला विरोध : एमआयएम
शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीला विरोध : एमआयएम

औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीला आमचा विरोध आहे. सरसकट