पीकविमा आज संध्याकाळी 5 पर्यंत भरता येणार, शेतकऱ्यांना दिलासा

शेतकऱ्यांना पीकविमा अर्ज भरता यावा यासाठी सरकारने आणखी एक दिवसाची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आजही शेतकरी आपला पीकविमा अर्ज भरु शकतील. आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत शेतकऱ्यांना ऑफलाईन पीकविमा भरता येईल. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. काल पीकविमा भरण्याची शेवटची मुदत होती, मात्र सर्व्हर डाऊन असल्यानं अनेक शेतकऱ्यांना पीकविमा भरता आला नव्हता.

By: | Last Updated: > Saturday, 5 August 2017 12:19 PM
crop insurance last date is extended to 5 august latest news updates

मुंबई : शेतकऱ्यांना पीकविमा अर्ज भरता यावा यासाठी सरकारने आणखी एक दिवसाची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आजही बिगर कर्जदार शेतकरी आपला पीकविमा अर्ज भरु शकतील. आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत शेतकऱ्यांना ऑफलाईन पीकविम्यासाठी अर्ज भरता येईल. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. काल पीकविमा भरण्याची शेवटची मुदत होती, मात्र सर्व्हर डाऊन असल्यानं अनेक शेतकऱ्यांना पीकविमा भरता आला नव्हता.

दरम्यान आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत फक्त पीकविम्यासाठी अर्ज भरावा लागणार आहे. यावेळी कोणतीही रक्कम भरण्याची आवश्यकता नाही. पीकविमा योजनेला राज्य सरकारनं मुदतवाढ दिली असली, तरीही त्याला केंद्र सरकारनं अद्याप हिरवा कंदील देण्यात आलेला नाही. त्यामुळे राज्य सरकारनं आज 5 ऑगस्टपर्यंत दिलेली मुदतवाढ फक्त पीकविम्याच्या अर्जासाठी आहे.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत दाखल झालेल्या अर्जांची दोन आठवड्यांमध्ये छाननी केली जाईल. अर्जांची छाननी झाल्यानंतरच पीकविम्याचा हफ्ता शेतकऱ्याला भरावा लागणार आहे. अर्जांची छाननी आणि पीकविम्याच्या भरण्यानंतर शेतकरी पीकविम्यासाठी पात्र असेल.

 

पीकविम्यासाठी दोनवेळा मुदतवाढ

31 जुलैपर्यंत शेतकऱ्यांनी पीकविमा भरण्यासाठी बँकांसमोर रांगा लावल्या होत्या. मात्र अनेक शेतकऱ्यांना या मुदतीत पीकविमा भरणं शक्य झाला नाही. त्यामुळे प्रधानमंत्री पीक विमा योजनेसंदर्भात राज्य सरकारकडून आणखी एक महत्त्वाचा बदल करण्यात आला. बिगर कर्जदार शेतकऱ्यांना आज 4 ऑगस्टपर्यंत पीक विमा भरण्याची सुविधा देण्यात आली होती. मात्र सर्व्हर डाऊन असल्यानं शेतकऱ्यांना गेल्या चार दिवसात अर्ज भरता आलेले नाहीत.

 

खालील अटी आणि शर्तींवर आज पीकविमा भरता येणार आहे.

crop insurance

सर्व्हर डाऊन, शेतकऱ्यांना मनस्ताप

पीक विमा भरण्याची काल 4 ऑगस्ट ही शेवटची मुदत होती, मात्र पीकविम्याची वेबसाईट डाऊन असल्यामुळे शेतकऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. पीकविम्यासाठी सरकारनं 31 जुलै ही मुदत दिली होती. मात्र अनेक शेतकऱ्यांना आपला अर्ज या मुदतीत दाखल करता आला नाही, त्यामुळे केंद्राकडे विनंती करत 4 ऑगस्टपर्यंत पीकविमा भरण्याची मुदतवाढ मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली होती. आता आजही शेतकऱ्यांना पीकविमा भरता येणार आहे, पण संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पीकविमा भरण्याचं आव्हान शेतकऱ्यांसमोर असेल.

याआधी म्हणजे 31 जुलै 2017 रोजी सरकारने 5 ऑगस्टपर्यंत पीक विम्याची मुदत वाढवली होती. मात्र, 1 ऑगस्ट 2017 रोजी सुधारित शासन निर्णय सरकारने जारी केला आणि 4 ऑगस्टपर्यंत पीक विमा भरण्याची मुदत वाढवल्याचे जाहीर केलं.

बिगर कर्जदार शेतकरी आज 4 ऑगस्टपर्यंत केवळ ऑनलाईन पद्धतीने पीक विम्याच्या पोर्टलवर अर्ज भरु शकतील किंवा स्वत: शेतकऱ्यांनी थेट भरलेले अर्जही स्वीकारले जातील. याचसोबत शेतकऱ्यांकडे 31 जुलै किंवा त्यापूर्वीचं पीक पेरणी प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर, बँका शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारू शकणार नाहीत. सरकारच्या जनसुविधा केंद्रांवर अर्ज स्वीकारले जातील.

कर्जदार शेतकऱ्यांचा विमा नियमित प्रक्रियेनुसार भरला जातो.

याआधी पीक विम्यासाठी अंतिम तारीख 31 जुलै 2017 ही होती. मात्र, बँकांबाहेर शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागू लागल्या, त्याशिवाय ऑफलाईन-ऑनलाईनच्या घोळामुळे आणखीच अडथळे निर्माण झाले. या सर्व पार्श्वभूमीवर सरकारने पीक विमा भरण्याची मुदत वाढवली होती.

संबंधित बातमी :

पीकविमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची तलाठ्यांकडून आर्थिक पिळवणूक

पीकविम्याचे अर्ज स्वीकारण्याची मुदत 5 ऑगस्टपर्यंत वाढवली

Agriculture News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:crop insurance last date is extended to 5 august latest news updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

1 ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष कर्जमाफीची प्रक्रिया सुरु होणार : सहकार मंत्री
1 ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष कर्जमाफीची प्रक्रिया सुरु होणार : सहकार...

मुंबई : येत्या 1 ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष कर्जमाफीची प्रक्रिया सुरु

शेतकऱ्यांना दिलासा, उडीद आणि मुगाच्या आयातीवर निर्बंध!
शेतकऱ्यांना दिलासा, उडीद आणि मुगाच्या आयातीवर निर्बंध!

नवी दिल्ली : केंद्र सरकारने उडीद आणि मुगाच्या आयातीवर निर्बंध

भंगारातून नॅनो ट्रॅक्टर, अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी राजेंद्र लोहारांचा उत्तम पर्याय
भंगारातून नॅनो ट्रॅक्टर, अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी राजेंद्र...

जळगाव : अल्पभूधारक शेतकऱ्यांची स्थिती इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत

शेतकऱ्यांना 'बीज से बाजार' तक सुविधा देणार: मोदी
शेतकऱ्यांना 'बीज से बाजार' तक सुविधा देणार: मोदी

नवी दिल्ली: मातीतून सोनं पिकवण्याची धमक माझ्या शेतकऱ्यांमध्ये आहे,

क्षारपड जमिनीत अरुण आलासेंचा कोळंबी उत्पादनाचा यशस्वी प्रयोग
क्षारपड जमिनीत अरुण आलासेंचा कोळंबी उत्पादनाचा यशस्वी प्रयोग

कोल्हापूर : मासे खाणाऱ्यांसाठी कोळंबी म्हणजे जीव कि प्राण. या

पीकविम्याची आज शेवटची तारीख, सर्व्हर मात्र डाऊन!
पीकविम्याची आज शेवटची तारीख, सर्व्हर मात्र डाऊन!

बीड : पीक विमा भरण्याची आज 4 ऑगस्ट ही शेवटची मुदत आहे, मात्र

बिगर कर्जदार शेतकऱ्यांना 4 ऑगस्टपर्यंत पीक विमा भरता येणार
बिगर कर्जदार शेतकऱ्यांना 4 ऑगस्टपर्यंत पीक विमा भरता येणार

मुंबई : प्रधानमंत्री पीक विमा योजनेसंदर्भात राज्य सरकारकडून आणखी

पीकविमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची तलाठ्यांकडून आर्थिक पिळवणूक
पीकविमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची तलाठ्यांकडून आर्थिक पिळवणूक

अहमदनगर : पीकविमा भरण्यासाठी रांगेत ताटकळणाऱ्या शेतकऱ्यांची

पीकविम्याचे अर्ज स्वीकारण्याची मुदत 5 ऑगस्टपर्यंत वाढवली
पीकविम्याचे अर्ज स्वीकारण्याची मुदत 5 ऑगस्टपर्यंत वाढवली

मुंबई : प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे अर्ज स्वीकारण्यासाठी 5

पीकविम्याची मुदत वाढवली नाही तर दिल्ली गाठू, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
पीकविम्याची मुदत वाढवली नाही तर दिल्ली गाठू, मुख्यमंत्र्यांचं...

मुंबई : पीकविमा भरण्याची मुदत संपत आली तरीही अद्याप लाखो शेतकरी