वडिलोपार्जित शेतीतून ST महामंडळातील अधिकाऱ्याचे 40 टन डाळिंबाचे उत्पादन

By: | Last Updated: > Saturday, 4 March 2017 5:32 PM
वडिलोपार्जित शेतीतून ST महामंडळातील अधिकाऱ्याचे 40 टन डाळिंबाचे उत्पादन

 

धुळे : एसटी महामंडळात नियंत्रक पदावर असलेले राजेंद्र देवरे यांची जशी कार्यालयात शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळख आहे. तशी अधुनिक शेतकरी म्हणूनही त्यांची पंचक्रोशीत ओळख आहे. एकीकडे डाळिंबाचं पीक घेण्यासाठी शेतकरी नाखुश असतांना, दुसरीकडे नोकरी सांभाळत, आपल्या वडिलोपार्जित शेतीतून तब्बल 40 टन डाळिंबाचं उत्पादन घेतलं आहे.

राजेंद्र देवरे यांची धुळे जिल्ह्यातील म्हसदी गावात 13 एकर वडिलोपार्जित शेती आहे. कमी पर्जन्यमान असलेल्या या गावाला डाळिंबाचं गांव म्हणूनही ओळखलं जातं. पण गेल्या काही वर्षापासून या गावाची ही ओळख कालबाह्य होत आहे. पण दुसरीकडे शासकीय सेवेत उच्चपदावर काम करतांना देवरे यांनी आपल्या वडिलोपार्जित शेतीकडे लक्ष करुन सात एकरवर तज्ज्ञ मंडळींच्या सल्ल्यानुसार शेती करुन तब्बल 40 टन डाळिंब उत्पादन घेतलं आहे.

देवरे यांनी शेती करण्यास सुरुवात केल्यानंतर 2013 मध्ये त्यांनी डाळिंबाची लागवड केली. मात्र, अवकाळी पाऊस, नैसर्गिक आपत्ती, डाळिंबावरील तेल्या रोगाचा प्रदुर्भाव, गारपीट या अशा विविध कारणांनी त्यांचं मोठं नुकसान झालं. पण तरीही खचून न जाता, त्यांनी आपली डाळिंब शेती साबूत राहण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली.

नुकसान भरुन काढण्यासाठी त्यांनी काहीकाळ आंतरपिकं घेतली. त्यानंतर कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार देवरे यांनी योग्यरित्या पाणी आणि खत व्यवस्थापन करुन एका झाडाला किमान 20 ते 25 किलोपर्यंतच्या डाळिंबाची लागवड केली. सध्या त्यांच्या सात एकरावरील दोन हजार डाळिंबाच्या झाडांमधून 40 टन डाळिंबाचं उत्पादन झालं आहे. यातून त्यांना 32 लाखांचं उत्पन्न मिळेल अशी त्यांची अपेक्षा आहे.

एकीकडे गावातील इतर शेतकऱ्यांनी डाळिंबाच्या बागा काढून दुसरं पीक घेण्यावर भर दिला. तर दुसरीकडे देवरे यांनी आपल्या प्रयत्नांच्या जोरावर तब्बल 40 टन डाळिंबाचे यशस्वी उत्पादन घेतलंय. त्यामुळे म्हसदी परिसरातील देवरे यांची हिरवीगार डाळिंब बाग पाहून गावातील इतर शेतकऱ्यांनीही आता डाळिंब लागवडीची तयारी सुरु केली आहे.

First Published:

Related Stories

मी शेतकऱ्यांचा हनुमान म्हणून सरकारच्या लंकेत: सदाभाऊ
मी शेतकऱ्यांचा हनुमान म्हणून सरकारच्या लंकेत: सदाभाऊ

अहमदनगर: मी शेतकऱ्यांचा हनुमान म्हणून सरकारच्या लंकेत गेलो आहे,

अखेर पाऊस आला, मान्सून केरळात दाखल झाला!
अखेर पाऊस आला, मान्सून केरळात दाखल झाला!

नवी दिल्ली : पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या देशवासियांसाठी

''मान्सून राज्यात वेगाने येणार, 2, 3 आणि 4 जूनला पावसाचा अंदाज''
''मान्सून राज्यात वेगाने येणार, 2, 3 आणि 4 जूनला पावसाचा अंदाज''

पुणे : राज्यात मान्सून वेगाने दाखल होईल. 2, 3 आणि 4 जून रोजी पावसाची

ऊसाच्या एफआरपीमध्ये वाढ, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब
ऊसाच्या एफआरपीमध्ये वाढ, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत...

नवी दिल्ली : दोन वर्षानंतर ऊसाच्या एफआरपीमध्ये वाढ झाली आहे. आज

एफआरपी म्हणजे काय?
एफआरपी म्हणजे काय?

मुंबई : सारखरेच्या दरासंदर्भात सर्रास कानावर पडणारा शब्द म्हणजे

तूर, मोसंबी, मिरचीनंतर आता हळदीच्या दरातही घसरण
तूर, मोसंबी, मिरचीनंतर आता हळदीच्या दरातही घसरण

सांगली : तूर, मोसंबी, मिरची आणि आता हळदीच्या उत्पादनात 20 ते 25 टक्के वाढ

खरीप हंगामासाठी 'महाबीज' 6 लाख क्विंटल बियाणं बाजारात आणणार
खरीप हंगामासाठी 'महाबीज' 6 लाख क्विंटल बियाणं बाजारात आणणार

अकोला : येत्या खरीप हंगामासाठी ‘महाराष्ट्र राज्य बियाणे

शेतकऱ्यांच्या प्रतिकात्मक प्रेतयात्रेच्या तयारीत असलेला शेतकरी ताब्यात
शेतकऱ्यांच्या प्रतिकात्मक प्रेतयात्रेच्या तयारीत असलेला शेतकरी...

मुंबई : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा

शिवसेनेच्या मेळाव्यात अस्थी घेऊन शेतकरी मंचावर
शिवसेनेच्या मेळाव्यात अस्थी घेऊन शेतकरी मंचावर

नाशिक: नाशिकमध्ये सुरु असलेल्या शिवसेनेच्या मेळाव्यातल्या एका

मोदींनी 'चाय पे चर्चा' केलेले दीडशे शेतकरी उपोषणासाठी दिल्लीत
मोदींनी 'चाय पे चर्चा' केलेले दीडशे शेतकरी उपोषणासाठी दिल्लीत

नवी दिल्ली : यवतमाळच्या ज्या दाभडी गावात तीन वर्षांपूर्वी