सांगलीतील शेतकऱ्यांची वायरलेस ठिंबक सिंचन योजना

सांगलीतील शेतकऱ्यांची वायरलेस ठिंबक सिंचन योजना

सांगली : अनेक शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शेतीतून मोठे उत्पादन घेतात. सांगलीच्या कवलापूरमधील शेतकऱ्यांनीही आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने क्षारपड जमिनीवर किमया घडवली आहे. वायरलेस ठिबक सिंचनाच्या माध्यमातून सांगलीतील शेतकरी द्राक्षाचं भरघोस पिक घेत आहेत.

कवलापूरमध्ये सिद्धेश्वर सहकारी पाणी पुरवठा संस्थेने वायरलेस ठिबक सिंचन योजना अंमलात आणली आहे. जवळपास 250 एकर क्षेत्र या वायरलेस ठिबक सिंचनाखाली आहे. अनेक शेतकरी एकत्र आले आणि हि यंत्रणा अंमलात आली.

काय आहे वायरलेस ठिबक सिंचन योजना?

पाण्यामुळे या भागातील जमिनी क्षारपड होत्या. कोणत्याच जमिनीतून चांगलं पीक येत नसल्याने या भागातील शेतकरी हवालदिल झाले होते. मात्र ही स्वयंचलित वायरलेस ठिबक सिंचन योजना अंमलात आणली आणि शेतकऱ्यांना फायदा होऊ लागला.

sangli 3

प्रत्येकवेळी पाणी चालू करण्यासाठी शेतावर जाण्याची गरज नाही. स्वयंचलित ठिबक यंत्रणा सुरु झाली की शेतकऱ्याच्या मोबाइलवर मेसेज येतो. दररोजचं हे वेळापत्रक तयार करुन ई-मेलद्वारे पाठवण्यात येतं. यामुळे शेतीला आवश्यक तेवढं पाणी मिळण्यास मदत होते.

sangli 1

या योजनेसाठी कृष्णा नदीतून पाणी उचलण्यात येतं. यासाठी नदीवर 25 एचपीचे 3 पंप बसवण्यात आले आहेत. नदीतून फिल्टर युनिटला आणि तेथून शेतापर्यंत पाणी नेण्यात येतं. टँकमध्ये पाणी एकत्र करून ते फिल्टर करून ते पाणी शेतीला सोडण्यात येतं. पाणी सोडण्याची संपूर्ण प्रक्रिया हि वेब बेस आहे. यांचा मुख्य सर्व्हर हा जळगावमधील जैन इरिगेशनमध्ये असून हा प्रोजेक्ट तिथून ऑपरेट केला जातोय.

sangli 2

क्षारपड जमीन आणि खारं पाणी यामुळे उत्पादन देखील कमी होत होतं. पण गोडं पाणी आणि स्वयंचलीत ठिबक सिंचन योजना या शेतामध्ये राबवल्याने सध्या उत्पादनात मोठी वाढ झाल्याचं शेतकरी सांगतात. शिवाय स्वयंचलीत ठिबक सिंचन योजना असल्याने शेतकऱ्यांची मेहनतही कमी झाली आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आणि अनेक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जैन इरिगेशनच्या पुढाकाराने राबलेली ही यंत्रणा सर्व अर्थाने फायदेशीर ठरली आहे.

First Published:

Related Stories

ऊसाच्या एफआरपीमध्ये वाढ, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब
ऊसाच्या एफआरपीमध्ये वाढ, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत...

नवी दिल्ली : दोन वर्षानंतर ऊसाच्या एफआरपीमध्ये वाढ झाली आहे. आज

एफआरपी म्हणजे काय?
एफआरपी म्हणजे काय?

मुंबई : सारखरेच्या दरासंदर्भात सर्रास कानावर पडणारा शब्द म्हणजे

तूर, मोसंबी, मिरचीनंतर आता हळदीच्या दरातही घसरण
तूर, मोसंबी, मिरचीनंतर आता हळदीच्या दरातही घसरण

सांगली : तूर, मोसंबी, मिरची आणि आता हळदीच्या उत्पादनात 20 ते 25 टक्के वाढ

खरीप हंगामासाठी 'महाबीज' 6 लाख क्विंटल बियाणं बाजारात आणणार
खरीप हंगामासाठी 'महाबीज' 6 लाख क्विंटल बियाणं बाजारात आणणार

अकोला : येत्या खरीप हंगामासाठी ‘महाराष्ट्र राज्य बियाणे

शेतकऱ्यांच्या प्रतिकात्मक प्रेतयात्रेच्या तयारीत असलेला शेतकरी ताब्यात
शेतकऱ्यांच्या प्रतिकात्मक प्रेतयात्रेच्या तयारीत असलेला शेतकरी...

मुंबई : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा

शिवसेनेच्या मेळाव्यात अस्थी घेऊन शेतकरी मंचावर
शिवसेनेच्या मेळाव्यात अस्थी घेऊन शेतकरी मंचावर

नाशिक: नाशिकमध्ये सुरु असलेल्या शिवसेनेच्या मेळाव्यातल्या एका

मोदींनी 'चाय पे चर्चा' केलेले दीडशे शेतकरी उपोषणासाठी दिल्लीत
मोदींनी 'चाय पे चर्चा' केलेले दीडशे शेतकरी उपोषणासाठी दिल्लीत

नवी दिल्ली : यवतमाळच्या ज्या दाभडी गावात तीन वर्षांपूर्वी

मान्सून 30 मे रोजी केरळात!
मान्सून 30 मे रोजी केरळात!

पुणे : मान्सून 30 मे रोजी केरळमध्ये दाखल होणार आहे. भारतीय हवामान

अल निनो न्यूट्रल, यंदा मान्सूनवर परिणाम नाही!
अल निनो न्यूट्रल, यंदा मान्सूनवर परिणाम नाही!

वॉशिंग्टन : भारतात यंदाच्या मान्सूनवर अल निनोचा प्रभाव राहणार नाही,

जालन्यात बेवारसपणे असलेली 1694 तुरीची पोती जप्त
जालन्यात बेवारसपणे असलेली 1694 तुरीची पोती जप्त

जालना : महसूल विभाग आणि पोलिसांनी 1 हजार 694 तुरीची पोती जप्त केली आहेत.