फवारणीतून विषबाधा रोखण्यासाठी हेल्मेटचा वापर

वर्ध्यातील सेलू तालुक्यातील प्रयोगशील शेतकऱ्याने चक्क बाईकवर वापरलं जाणारं हेल्मेट कीटकनाशक फवारणीवेळी वापरलं आहे. जेणेकरुन विषबाधा रोखता येईल.

Helmet used for pesticide sprain in Wardha latest updates

वर्धा : गेल्या काही दिवसांपासून कीटकनाशक फवारणीतून विषबाधा होऊन 30 हून अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे शेतमजुरांनी शेताकडे पाठ फिरवली होती. मात्र वर्ध्यातील शेतकऱ्यांनी यावर उपाय म्हणून अजब फंडा अवलंबला आहे.

वर्ध्यातील सेलू तालुक्यातील प्रयोगशील शेतकऱ्याने चक्क बाईकवर वापरलं जाणारं हेल्मेट कीटकनाशक फवारणीवेळी वापरलं आहे. जेणेकरुन विषबाधा रोखता येईल.

वृषाल पाटील, प्रयोगशील शेतकरी

वृषाल पाटील, प्रयोगशील शेतकरी

कीटकनाशक फवारणीतून विषबाधा होते आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू होतो, यामुळे शेतीत काम करण्यास मजूर मिळणंही मुश्किल झालं होतं. मात्र सेलू तालुक्यातील या शेतकऱ्याच्या हेल्मेट प्रयोगामुळे शेतमजूरही मिळू लागले आहेत. वृषाल पाटील असे या प्रयोगशील शेतकऱ्याचं नाव आहे.

वृषाल पाटील हा युवा शेतकरी शेतीत नेहमीच नव-नवीन प्रयोग करत असतो. असाच प्रयोग या गाडीचा हेल्मेटच्या मदतीने केला आहे. फवारणी करताना उडणाऱ्या तुषारांमुळे अनेक शेतमजुरांना जीव गमवावा लागला. तर काहींना डोळ्यांची दृष्टी गमवावी लागली. हेल्मेटच्या सहाय्याने फवारणी केल्यास या सर्व गोष्टींपासून आपला बचाव होतो, असे वृषाल पाटील यांचे म्हणणे आहे.

हेल्मेट प्रयोगाचा फायदा आता मजुरांना होत असल्याने त्यांनीही पुन्हा शेतीची वाट धरली आहे. थोडा त्रास होत आहे, पण 300 रुपये मजुरी मिळत असताना विषबाधा झाल्यावर होणारा 500 ते 700 रुपयांच्या आर्थिक फटक्यापासून रक्षण होतंय. शिवाय आरोग्याला होणारी हानीही थांबली आहे.

wardha 1

भीतीच्या वातावरण निर्माण झाल्याने अनेक मजुरांना घरात बसण्याची वेळ आली होती. पण आता हा प्रयोग फायद्याचा ठरत असल्याने इतर शेतकऱ्यांकडे मजूर आता हेल्मेटची मागणी करत आहेत.

फवारणीचा त्रास झाल्यास त्याचा थेट परिणाम नाक, डोळे आणि तोंडाला होता. आणि हेल्मेटमुळे याच अवयवांचं रक्षण करणं सहज सोपं होतं.

आता जिल्हा परिषदच्या माध्यमातून बियांना आणि औषधी विक्रेत्यांनी खरेदीवर इतर वस्तू देण्यापेक्षा फवारणी करताना विषबाधा होऊ नये म्हणून एक किट स्वस्तात उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी संजय बमनोटेंनी दिली.

Agriculture News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Helmet used for pesticide sprain in Wardha latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

केंद्राने सर्व डाळींवरील निर्यातबंदी हटवली!
केंद्राने सर्व डाळींवरील निर्यातबंदी हटवली!

मुंबई : केंदीय मंत्रिमंडळाने सर्व डाळींच्या निर्यातींवरचे

ऊसदर आंदोलन पेटलं, पोलिसांचा हवेत गोळीबार, 2 जखमी
ऊसदर आंदोलन पेटलं, पोलिसांचा हवेत गोळीबार, 2 जखमी

अहमदनगर: ऊसाला 3100 रुपये दर द्यावा यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाला

परतीच्या पावसाचा संत्र्यांच्या बागांना फटका, संत्र्यावर वाय बार रोगाचा प्रादुर्भाव
परतीच्या पावसाचा संत्र्यांच्या बागांना फटका, संत्र्यावर वाय बार...

अमरावती : परतीच्या पावसाचा फटका खरीप हंगामातील जवळपास सगळ्याच

हिंगणघाटच्या शेतकऱ्याची हायटेक कल्पना, व्हॉट्सअॅपद्वारे सिताफळ विक्री
हिंगणघाटच्या शेतकऱ्याची हायटेक कल्पना, व्हॉट्सअॅपद्वारे सिताफळ...

  वर्धा : सोशल मीडियाचा वापर इंन्स्टट अपडेट्स मिळवण्यासोबतच

विदर्भात बीटी कपाशीवर बोंडअळींचा प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल
विदर्भात बीटी कपाशीवर बोंडअळींचा प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

नागपूर : विदर्भात गुलाबी बोंडअळीनं कापसावर हल्ला चढवला आहे.

एफआरपी म्हणजे काय?
एफआरपी म्हणजे काय?

मुंबई: ऊस दराबाबत सर्रास कानावर पडणारा शब्द म्हणजे एफआरपी. पण

सतेज पाटलांचा 'गोकुळ'वर मोर्चा, दूध खरेदी दरकपातीचा निषेध
सतेज पाटलांचा 'गोकुळ'वर मोर्चा, दूध खरेदी दरकपातीचा निषेध

कोल्हापूर: गायीच्या दूध खरेदीदरात कपात केल्याने काँग्रेसने आक्रमक

गोकुळचा शेतकऱ्यांना झटका, गायीच्या दूध खरेदीदरात 2 रुपयांची कपात!
गोकुळचा शेतकऱ्यांना झटका, गायीच्या दूध खरेदीदरात 2 रुपयांची कपात!

कोल्हापूर: गोकुळ दूध संघाने मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्याला आणखी

रासायनिक खतांची विक्री आता ऑनलाईन
रासायनिक खतांची विक्री आता ऑनलाईन

कोल्हापूर : महाराष्ट्रात शेतीसाठी लागणाऱ्या रासायनिक खतांची

भाज्यांचे दर कडाडले, टोमॅटोनं पन्नाशी गाठली!
भाज्यांचे दर कडाडले, टोमॅटोनं पन्नाशी गाठली!

नाशिक : नाशिकमधील किरकोळ बाजारात भाज्यांनी ऐंशी पार केली आहे. तर