हायटेक नर्सरीच्या माध्यमातून सांगलीच्या शेतकऱ्याची कोट्यवधीची उलाढाल

हायटेक नर्सरीच्या माध्यमातून सांगलीच्या शेतकऱ्याची कोट्यवधीची उलाढाल

सांगली: सध्या नर्सरी व्यवसायात मजुर मिळत नसल्याने मोठी परवड सुरु आहे. पण आपला वडिलोपार्जित नर्सरी व्यवसाय हायटेक करुन मिरज तालुक्यातील बापू वाघमोडे या शेतकऱ्याने कोट्यवधीची उलाढाल गाठली आहे.

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून कृषी पदवीपर्यंतच शिक्षण पूर्ण केल्यानंतर, १९८३ पासून बापू वाघमोडे यांनी वडिलांच्या दोन गुंठे क्षेत्रावर नर्सरीचा व्यवसायास सुरु केला. चांगल्या प्रतीची, योग्य त्या जातीची निरोगी रोपे पुरविल्यामुळं शेतकऱ्यांचा विश्वास व्यवसायही वाढत गेला. दोन गुंठ्यावर सुरु केलेला हा पसरा आज सात एकरावर पसरला आहे.

वाघमोडे यांची रोपवाटिकेतून आज महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, आंध्रप्रदेशातील शेतकऱ्यांना रोपे पुरविण्याचे येतात. या रोपवाटिकेतून वर्षभरात एक कोटीहुन अधिक विविध प्रकारच्या भाजीपाल्यांच्या रोपांची निर्मिती होते.

वाघमोडे यांनी ज्यावेळी नर्सरीचा शेतीला सुरुवात केली, त्यावेळी त्यांनाही अनंत अडचणींचा सामना करावा लागला. वर्षभर इथं मजुरांना काम मिळत असले, तरी ऐन रोप निर्मितीच्या काळात मजुरांची कमतरता भासत होती. म्हणून यावर उपाय म्हणून बापू वाघमोडे गेल्यावर्षी यांनी थेट चीनवरुन सीडलिंग मशीन आयात केलं. यासाठी त्यांना तब्बल 22 लाख रुपये मोजावे लागले. या सीडलिंग मशीनमुळं वाघमोडेंचा मजुरांचा प्रश्न निकाली निघालाच, पण त्याचबरोबर त्यांची वार्षिक उलाढाल कोट्यवधींच्या घरात पोहचली आहे.

सीडलिंग मशीन आणण्यापूर्वी वाघमोडेंना मजुरांवर आणि इतर मिळून महिन्याला सहा लाखापर्यंत खर्च करावा लागत होता. पण आता या यंत्राद्वारे केवळ दोन ते तीन मजुरांवर तासाला ४० ते ४५ हजार बियाण्यांची टोकण होत असल्यानं, वेळ आणि श्रमात बचत झालीय. तसेच यावर वाघमोडेंना महिन्याला केवळ सव्वा लाख रुपये खर्च करावा लागतोय.

कसं चालतं हे सीडलिंग मशिन?
संपूर्ण स्वयंचलित या मशीनमध्ये प्लॅस्टिक ट्रे ठेवल्यानंतर सीटबेल्टद्वारे पुढे सरकतात. सुरवातीला ट्रेमधील कपात कोकोपीट भरलं जातं. यानंतर या भरलेल्या ट्रेमधील कोकोपीटची एकसारखी लेव्हल केली जाते. त्यानंतर बरोबर कपाच्या मध्यभागी समान खोलीवर होल पडून मशीनद्वारेच एकेक बियाणं त्यामध्ये टाकलं जातं. पुढे त्यावर कोकोपीट टाकलं जात. अशा प्रकारे एका तासामध्ये ४० ते ४५ हजार बियाण्याची टोकण केली जातात.

टोकण लाऊन झाल्यानंतर भरलेले ट्रे एका ठिकाणी ठेवून त्याची ३ ते ४ दिवसापर्यंत भट्टी लावली जाते. पुढे हे ट्रे पॉली हाऊसमध्ये आणले जातात. त्यानंतर शेड हाऊसमध्ये १० दिवस आणि हार्डनिंगमध्ये पाच दिवस, असं महिनाभरात दर्जेदार रोपांची निर्मिती होते. कृषी विभागानं वेगवेगळ्या बाबीखाली त्यांना अनुदान दिल आहे.

कमी कालावधीत अधिक रोपांची निर्मिती करण्याच्या बापू वाघमोडे यांच्या हायटेक नर्सरीमुळे त्यांची आज वार्षिक उलाढाल दोन कोटीपर्यंत जाऊन पोहोचली आहे. यातून खर्च वजा केल्यास त्यांना पन्नास लाख रुपये नव्वळ नफा शिल्लक राहतोय.

त्यामुळे नर्सरी उद्योगात नव्यानं येऊ पाहणाऱ्या तरुण शेतकऱ्यांसाठी बापू वाघमोडेंची नर्सरी प्रेरणा देणारीच आहे.

शेती शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV