पीक विमा भरण्यासाठी रांगेत उभा असलेल्या शेतकऱ्यांवर लाठीचार्ज

अनेक बँका कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम सांगत पीक विमा भरून घेण्यास टाळत आहेत. दुर्दैवी म्हणजे गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस शेतकर्‍यांवर बळाचा वापर करत आहेत.

पीक विमा भरण्यासाठी रांगेत उभा असलेल्या शेतकऱ्यांवर लाठीचार्ज

नांदेड : पीक विमा भरण्याची मुदत संपायला आता अवघे 5 दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यासाठी शेतकरी पीक विमा भरायला बँकेबाहेर गर्दी करत आहेत. पण अनेक बँका कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम सांगत पीक विमा भरून घेण्यास टाळत आहेत. दुर्दैवी म्हणजे गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस शेतकर्‍यांवर बळाचा वापर करत आहेत.

पीक विमा भरण्यासाठी 31 जुलै शेवटची तारीख आहे. शेतकरी शेतातले कामं सोडून बँकेच्या रांगेत उभा आहे. मात्र सिस्टमचा प्रॉब्लम सांगून बँकेकडून शेतकऱ्यांना ताटकळत उभं केलं जात आहे. शेतकऱ्यांना सेतू केंद्रावर जाण्याचा सल्ला दिला जातोय, पण तिथेही अशीच अवस्था आहे.

बँकेत अधिकार्‍यांना काही बोलण्याचा प्रयत्न केला पोलीसही शेतकऱ्यांवर धावून जातात. बँकेच्या रांगेत उभं असलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांकडून धमकावलं जात आहे आणि बळाचाही वापर केला जातोय.

शेतकरी पहाटेपासून तहान-भूक विसरुन बँकेच्या दारात रांगा लावत आहेत. बँकेत सिस्टम प्रॉब्लम असेल तरी तो कधी नीट होईल, याबाबत काहीही उत्तर दिलं जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचाही संयम संपत आला आहे. बँकेच्या या कारभाराविरोधात आज मुखेड तालुक्यात शेतकर्‍यांनी रास्तारोको केला तहसिलदारांनाही घेराव घातला.

सरकारचा सर्व काही ऑनलाईन करण्यावर भर आहे. पारदर्शकतेसाठी हे पाऊल गरजेचं असलं तरी त्यामध्ये ग्रामीण भागाची काय परिस्थिती होते, शेतकरी कसा भरडला जातो, ते देखील सरकारने पहावं, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

शेती शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV