...म्हणून त्यांना शेतकरी नवरा असल्याचा अभिमान वाटतो!

Nalawde familys success story in sangli district

सांगली : गेल्या पंधरा वर्षांपासून पाच एकर शेतीतून सेंद्रीय शेतीद्वारे बेडगच्या नलवडे कुटुंबियांनी लाखो रुपयांचे उत्पन्न घेतलं आहे. सेंद्रीय शेतीत उत्पादन खर्च कमी असल्याने, आणि अधिकचं निव्वळ उत्पन्न शिल्लक राहत आहे. त्यामुळेच शेतकरी नवरा असल्याचा नीता नलवडे यांना अभिमान आहे.

सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर बेडगमध्ये नलवडे कुटुंबियांची पाच एकर शेती आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी या शेतजमीनी जवळच 50 गुंठे जमीन खरेदी करून त्यामध्ये त्यांनी सेंद्रीय भाजीपाला करण्यास सुरवात केली. यामध्ये त्यांनी दीड एकरात चिक्कूची 60 झाडे,  रामफळाची 70 झाडे आणि गवती चहाची लागवड केली. तर अर्ध्या एकरात पेरु आणि दोन एकरात 100 सीताफळाची झाडांची, तर अर्ध्या एकरात शाळुची लागवड केली जाते.

गेल्या चार वर्षांपासून शेतीसोबतच स्वतः विक्री सुरु केल्याने त्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. दिवसभर घरचं कुटुंब भाजीपाला काढणी, फळांची काढणी, त्याची प्रतवारी करण्यात मग्न असत. तर त्याची विक्री करण्याचं काम तानाजी नलवडे करतात.

इतर भाजीपाल्याच्या आणि फळांच्या तुलनेत तानाजी यांच्या सेंद्रीय उत्पादनांना दर अधिक मिळत असल्याने, दिवसेंदिवस उत्पन्नही वाढत आहे. खाजगी नोकरीत इतके पैसे आणि समाधान मिळाले नसते, ते या सेंद्रिय शेतीतून मिळत असल्याने नलावडे कुटुंबियही समाधानी आहेत. त्यामुळंच तानाजीच्या पत्नीला आपला नवरा शेतकरी असल्याचा अभिमान आहे.

तानाजी नलावडेंचा गेल्या चार वर्षाचा या सेंद्रिय शेतीचा ताळेबंद पाहिला तर ती आकडेवारी पाहून थक्क व्हायला होतं.

 

वर्ष

एकूण उत्पन्न

खर्च

निव्वळ नफा

2013

1 लाख 70 हजार रुपये

70 हजार रुपये

1 लाख रुपये

2014

3 लाख 5 हजार रुपये

85 हजार रुपये

2 लाख 20 हजार रुपये

2015

5 लाख 50 हजार रुपये

40  हजार रुपये

4 लाख 30 हजार रुपये

2016

5 लाख 50 हजार रुपये

50  हजार रुपये

5 लाख रुपये

 

यावर्षी तानाजी यांना सहा ते साडे सहा लाख रुपये नफा अपेक्षित असून, त्यासाठी नलवडे यांचे प्रयत्न सुरु आहेत. पर्यावरणाला हानी न पोहचवता केलेली सेंद्रीय शेती माणसाला वरदान ठरणारीच आहे.

Agriculture News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Nalawde familys success story in sangli district
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

भंगारातून नॅनो ट्रॅक्टर, अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी राजेंद्र लोहारांचा उत्तम पर्याय
भंगारातून नॅनो ट्रॅक्टर, अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी राजेंद्र...

जळगाव : अल्पभूधारक शेतकऱ्यांची स्थिती इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत

शेतकऱ्यांना 'बीज से बाजार' तक सुविधा देणार: मोदी
शेतकऱ्यांना 'बीज से बाजार' तक सुविधा देणार: मोदी

नवी दिल्ली: मातीतून सोनं पिकवण्याची धमक माझ्या शेतकऱ्यांमध्ये आहे,

क्षारपड जमिनीत अरुण आलासेंचा कोळंबी उत्पादनाचा यशस्वी प्रयोग
क्षारपड जमिनीत अरुण आलासेंचा कोळंबी उत्पादनाचा यशस्वी प्रयोग

कोल्हापूर : मासे खाणाऱ्यांसाठी कोळंबी म्हणजे जीव कि प्राण. या

पीकविमा आज संध्याकाळी 5 पर्यंत भरता येणार, शेतकऱ्यांना दिलासा
पीकविमा आज संध्याकाळी 5 पर्यंत भरता येणार, शेतकऱ्यांना दिलासा

मुंबई : शेतकऱ्यांना पीकविमा अर्ज भरता यावा यासाठी सरकारने आणखी एक

पीकविम्याची आज शेवटची तारीख, सर्व्हर मात्र डाऊन!
पीकविम्याची आज शेवटची तारीख, सर्व्हर मात्र डाऊन!

बीड : पीक विमा भरण्याची आज 4 ऑगस्ट ही शेवटची मुदत आहे, मात्र

बिगर कर्जदार शेतकऱ्यांना 4 ऑगस्टपर्यंत पीक विमा भरता येणार
बिगर कर्जदार शेतकऱ्यांना 4 ऑगस्टपर्यंत पीक विमा भरता येणार

मुंबई : प्रधानमंत्री पीक विमा योजनेसंदर्भात राज्य सरकारकडून आणखी

पीकविमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची तलाठ्यांकडून आर्थिक पिळवणूक
पीकविमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची तलाठ्यांकडून आर्थिक पिळवणूक

अहमदनगर : पीकविमा भरण्यासाठी रांगेत ताटकळणाऱ्या शेतकऱ्यांची

पीकविम्याचे अर्ज स्वीकारण्याची मुदत 5 ऑगस्टपर्यंत वाढवली
पीकविम्याचे अर्ज स्वीकारण्याची मुदत 5 ऑगस्टपर्यंत वाढवली

मुंबई : प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे अर्ज स्वीकारण्यासाठी 5

पीकविम्याची मुदत वाढवली नाही तर दिल्ली गाठू, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
पीकविम्याची मुदत वाढवली नाही तर दिल्ली गाठू, मुख्यमंत्र्यांचं...

मुंबई : पीकविमा भरण्याची मुदत संपत आली तरीही अद्याप लाखो शेतकरी

शेतीतला ‘सचिन’, मिरची लागवडीतून 4 महिन्यात 6 लाखांचं उत्पन्न!
शेतीतला ‘सचिन’, मिरची लागवडीतून 4 महिन्यात 6 लाखांचं उत्पन्न!

सांगली : तासगावमधील कवठे एकंद गावातील सचिन जाधव या तरुण शेतकऱ्याने