आता शेतमाल खरेदीची तारीख SMS द्वारे शेतकऱ्यांना कळवणार

शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जवळच्या खरेदी केंद्रावर आपले नाव नोंदणी करावी, असे आवाहनही पणन विभागाकडून करण्यात आले आहे.

आता शेतमाल खरेदीची तारीख SMS द्वारे शेतकऱ्यांना कळवणार

मुंबई : शेतमाल खरेदीची तारीख आता एसएमएसद्वारे शेतकऱ्यांना कळवलं जाणार आहे. शेतकऱ्यांचा वेळ वाया जाऊ नये यासाठी सरकारने ही सुविधा सुरु केली आहे.  

शेतकऱ्यांकडून मूग, उडीद, सोयाबीन आणि कापूस हमीभावानुसार खरेदी करण्यासाठी खरेदी विक्री केंद्रावर नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. शेतकऱ्यांनी जवळच्या खरेदी केंद्रावर नाव नोंदणी करावी, असे आवाहन पणन विभागातर्फे करण्यात आले आहे.

नाव नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी सोबत आधार क्रमांकाची झेरॉक्स प्रत, बँकेचे पासबुक तसेच सातबारा घेऊन जाणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्याला एसएमएसमार्फत खरेदीची तारीख कळवण्यात येणार आहे.

एसएमएमसद्वारे कळवण्यात आलेल्या तारखेलाच शेतकऱ्यांना आपला माल खरेदी केंद्रावर आणायचा आहे. खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना थांबावं लागू नये आणि वेळेची बचत व्हावी, हा उद्देश या सुविधेमागे आहे.

शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जवळच्या खरेदी  केंद्रावर आपले नाव नोंदणी करावी, असे आवाहनही पणन विभागाकडून करण्यात आले आहे.

शेती शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV