दुष्काळी भागात ‘तेजोमय’ शेती, पॉलीहाऊसच्या हायटेक शेतीतून लाखोंचा नफा

सांगली जिल्ह्यातील तेजोमय घाडगे या तरुणानं पाण्याचं चोख व्यवस्थापनाद्वारे वर्षाला 9 ते 10 लाखांचं उत्पन्न मिळवत आहे.

दुष्काळी भागात ‘तेजोमय’ शेती, पॉलीहाऊसच्या हायटेक शेतीतून लाखोंचा नफा

सांगली : दुष्काळग्रस्त भागात जिथे साधी शेती करणंही अवघड असतं, तिथे एका तरुणानं पॉलीहाऊसची हायटेक शेती सुरु केली आहे. सांगली जिल्ह्यातील तेजोमय घाडगे या तरुणानं पाण्याचं चोख व्यवस्थापनाद्वारे वर्षाला 9 ते 10 लाखांचं उत्पन्न मिळवत आहे.

तेजोमयनं बीएससी एग्री आणि नंतर एमबीएचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर सुरुवातीला नोकरी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, नोकरीत मन रमत नसल्याने, शेतीकडे वळण्याचं ठरवलं. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्याच्या जोधळखिंडीमधून त्याच्या प्रवासाला सुरुवात झाली.

सुरुवातीला शेती करताना तेजोमयला मोठ्या नुकसानाला सामोरं जावं लागलं. मात्र, त्यावर खचून न जाता त्यानं आपले नवनवीन प्रयोग चालूच ठेवले. 2015 साली त्यानं पहिलं 10 गुंठ्यातील पॉलीहाऊस उभारलं. त्यामध्ये रंगीत ढोबळी मिरचीची लागवड केली. त्यानंतर शेतातील बोअरवेलच्या पाण्याचं योग्य व्यवस्थापन करुन, 10 गुंठे क्षेत्रात आणखी 2 पॉलीहाऊसची उभारणी केली.

पॉलीहाऊस उभारणी आधी तेजोमयनं माळावर गाळाची माती, चांगले कुजलेले शेणखत, भाताचे तूस आणि जैविक खतांचं योग्य मिश्रण टाकलं. या 3 पॉलिहाऊसला एकूण 15 हजार लिटर पाणी लागतं. मात्र, त्याचंही चोख व्यवस्थापन त्यानं केल्याने, त्याला 10 गुंठ्यामध्ये हरितगृह उभारणीला 13 लाख 17 हजार इतका खर्च आला. या खर्चात ठिबक सिंचन, खतं, औषधं, माती, शेणखत, पाण्याची टाकी या सगळ्या खर्चांचा समावेश आहे.

राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत कृषी विभागाकडून यासाठी 50 टक्क्यांप्रमाणे 4 लाख 72 हजार रुपयांचं अनुदान त्याला मिळालं. त्यामुळे सहा महिन्यांत जवळपास निम्मा खर्च निघाला आहे. अपेक्षित उत्पन्न निघाल्यास पहिल्या दीड वर्षांत तेजोमयला शभंर टक्के खर्च वसूल होण्याची आशा आहे.

शेती शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV