भाज्यांचे दर कडाडले, टोमॅटोनं पन्नाशी गाठली!

नाशिक जिल्ह्यातील पिंपळगावच्या ठोक बाजारात टोमॅटो 50 रुपये किलोवर पोहचला आहे. गेल्या अनेक वर्षात टोमॅटोला पहिल्यांदा इतके ‘अच्छे दिन’ आले आहेत.

भाज्यांचे दर कडाडले, टोमॅटोनं पन्नाशी गाठली!

नाशिक : नाशिकमधील किरकोळ बाजारात भाज्यांनी ऐंशी पार केली आहे. तर कोथिंबीर, कांद्यानंतर आता टोमॅटोने विक्रमी भावाकडे वाटचाल सुरु केली आहे. त्यामुळे दिवाळीनंतर शेतकऱ्यांची खरी दिवाळी साजरी होतांना दिसते आहे.

नाशिक जिल्ह्यातील पिंपळगावच्या ठोक बाजारात टोमॅटो 50 रुपये किलोवर पोहचला आहे. गेल्या अनेक वर्षात टोमॅटोला पहिल्यांदा इतके ‘अच्छे दिन’ आले आहेत. तर कांदा 40 रुपये किलो तर कोथंबीर 150 रुपये जुडी झाली आहे.

याशिवाय इतरही भाज्यांचे भावही गगनाला भिडले आहेत. तर किरकोळ बाजारात इतर भाज्याचे भाव 80 रुपयापर्यंत पोहोचले आहेत.

शेती शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Tomato will cost Rs 50 per kg latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV