जिभेचे चोचले : स्पेशालिटी ट्रिपल ट्रिट

जिभेचे चोचले : स्पेशालिटी ट्रिपल ट्रिट

आजकाल बाहेर जेवायला जायचं ठरवल्यावर कुठे जायचं हे ठरवणं सोपं काम राहिलेलं नाही. पूर्वी बरं होतं इतके जगभरातले पदार्थ मिळत नव्हते, बाहेर तसंच रेस्टॉरन्टसमध्ये पण इतकं वैविध्य नव्हतं. त्यामुळे बाहेर जेवायला जायचं म्हणजे कुठे जायचं हे वर्षानुवर्ष ठरलेलं असायचं आणि तिथे जाऊन काय खायचं हे ही ठरलेलं असायचं.. माझ्या लहानपणी नागपूरला बाहेर जेवायला जायचं म्हणजे आर्यभवन नावाच्या रेस्टॉरन्टलाच जायचं हे समिकरण होतं. तिथे जाऊन कुठली पंजाबी भाजी मागवायची हेदेखील ठरलेलंच असायचं.. स्नॅक्स आणि जेवण हाच तेवढा फरक असायचा.

स्नॅक्समध्येही डोसा, सॅण्डविच, इडली असेच थोडेफार ऑप्शन्स असायचे. पण आता परिस्थिती इतकी बदलली आहे की बाहेर खायचं ठरवल्यावर आता कुठल्या प्रकारचं क्युझिन चाखायचं याचा विचार डोक्यात सुरु होतो. चायनिज, मेक्सिकन, अशा विविध देशांच्या खाद्यसंस्कृतींबरोबरच आता स्पेशालिटी रेस्टॉरन्टच्या काळात राजस्थानी, गुजराती, दाक्षिणात्य यांच्याही पुढे जाऊन मराठी खाद्यसंस्कृतीतल्या मालवणी, वऱ्हाडी सावजी अशा त्या त्या भागाच्या स्पेशालिटीचीही रेस्टॉरन्टस बघायला मिळतात.. त्यामुळे आपल्याला चॉईस भरपूर असला तरी चांगलाच अवघड असतो.

अशा देशी स्पेशालिटी रेस्टॉरन्टसला खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय रुपडं देऊन ते स्वयंपाकघरातून आणि आपल्या ताटातून थेट रेस्टॉरन्टच्या प्लेटमध्ये आणण्यात दादरला अगदी शिवाजी पार्कात असलेल्या तीन रेस्टॉरन्टसचा मोठा हात आहे आणि मराठी किंवा गोवन पोर्तुगिज किंवा दाक्षिणात्य चारही राज्यातले हॉटेलांमध्ये सहसा न मिळणाऱ्या पदार्थांना ग्लॅमर दिलं ते शेफ दिपा अवचट आणि सुहास अवचट यांच्या एका रांगेत किंबहुना एकत्रच असलेल्या तीन रेस्टॉरन्टसनी..मराठी पदार्थांना आंतरराष्ट्रीय पद्धतीने पेश करणारं ‘दिवा महाराष्ट्राचा’, पारंपरिक गोवन किंवा पोर्तुगिज पदार्थांसाठी ‘गोवा पोर्तुगीजा’ आणि दाक्षिणात्य पदार्थांसाठी ‘दक्षिण कल्चर करी’ अशी ही रेस्टॉरन्टसची तिकडी. दादर, माहिम भागात अतिशय प्रसिद्ध आहे.diva-maharashtracha

एक दुसऱ्याला लागून असलेले हे तीन रेस्टो बार त्यांच्या आतल्या आणि बाहेरच्या डेकोरेशनमुळे वेगवेगळे लगेच ओळखू येतात. बाहेरच तुतारी आणि एखाद्या मराठी वाड्याला शोभेल असं आकर्षक गेट आहे ते मराठी पदार्थांसाठीच्या दिवा महाराष्ट्राचाचं, तर दुसरीकडे गोव्याची आठवण करुन देणारं गोवा पोर्तुगीजा आणि एखाद्या दाक्षिणात्य मंदिराची प्रतिकृती वाटावी असा दरवाजा दिसतो तो दक्षिण कल्चर करी या तिसऱ्या रेस्टॉरन्टचं प्रवेश द्वार.

दिवा १-compressed

आत गेल्यावर कळतं की आतही प्रत्येक रेस्टॉरन्टची सजावट अगदी त्या त्या थीमला साजेशी, दिवा महाराष्ट्राचामध्ये शिरल्यावर सगळीकडे मराठी टच जाणवतो, तेच दक्षिण कल्चर करीमध्ये मात्र एखाद्या दक्षिण भारतीय गावात शिरल्याचा फिल येतो, तेच गोवन रेस्टॉरन्टच्या दारातून आता गेल्यावर गोवन कपडे परिधान केलेले वेटर्स, गिटार घेऊन पोर्तुगिज गाण्यांवर ताल धरणारे गायक असा खास गोवन टच मिळतो. बरं ही तीनही रेस्टॉरन्ट आतून एकमेकांना जोडलेली आहेत, त्यामुळे गोवा पोर्तुगीजामध्ये शिरल्यानंतर मूड बदलला आणि दाक्षिणात्य रेस्टॉरन्टमध्ये जाण्याची इच्छा झाली तर फार काही बिघडत नाही, लगेच जागा बदलता येते, बरं कुठेही बसलं तरी तीनही रेस्टॉरन्टच्या मेन्यूकार्डातून हवे ते पदार्थ मागवता येतात हा आणखी एक प्लस पॉईंट.. म्हणजे दक्षिण कल्चर करीमध्ये बसल्यावर थेट मराठी पदार्थ ऑर्ड करता येतात त्यामुळे एका जागी बसून तीन थीम्स आणि तीन रेस्टॉरन्टसचा फिल घ्यायचा असेल तर अवचटांच्या या रेस्टॉरन्ट चेनला भेट द्यायलाच हवी..

आजकाल ठाणे, पार्ले, दादर अशा मुंबईतल्या मराठीबहुल भागात आता मराठी पदार्थांचे चवदार ट्विस्ट पेश करणारे मराठी शेफ्सचे अनेक रेस्टॉरन्टस् दिसू लागलेत.. पण अशा पद्धतीनं पारंपरिक मराठी पदार्थांवर प्रयोग करुन ट्विस्ट सादर करणारं दिवा महाराष्ट्राचा बहुतेक पहिलं रेस्टॉरन्ट असावं.. एरव्ही बाहेर जाऊन टोमॅटो किंवा चायनिज सूप पिणाऱ्यांना भोपळ्याचं सूप सर्व्ह कऱणारं पहिलं रेस्टॉरन्ट बहुतेक दिवा महाराष्ट्राचा असावं.. पण खरा मराठीला आंतरराष्ट्रीय ट्विस्ट दिसतो तो दिवा महाराष्ट्राचामधल्या स्टार्टर्समध्ये.

diva

उकडीचे मोदक विथ ट्विस्ट नावही उकडीचे मटार आणि काजु मोदक नावाचं तिखट स्टार्टर, हे हिरव्या रंगाचे मोदक जिभेवर ठेवल्याबरोबर विरघळतात आणि मटार काजुच्या चवीशी अगदी एकरुप होतात, तसंच मिनी थालिपीठं नावाचं व्हेज आणि नॉनव्हेज दोन्हीमध्ये मिळणारं आणखी एक पारंपरिक पण आंतरराष्ट्रीय सजावटीद्वारे आपल्यासमोर येणारं स्टार्टर.. छोटे छोटे थालीपीठं आणि त्यावर चटणी किंवा खिमा यांचं टॉपिंग.. आपल्या नेहमीच्या पदार्थांना असा दर्जेदार ट्विस्ट मिळणार असेल तर कुठलाही मराठी खवय्या हा पदार्थ चाखायला थोडे जास्त पैसे द्यावे लागले तरी  नक्की नकार देणार नाही... गोवा पोर्तुगीजाचा मेन्यू तर सी फुडच्या चाहत्यांसाठी स्वर्गच...खास गोवन पद्धतीने केलेले माशांचे विविध प्रकार आणि ताजे ताजे मासे खाण्याचा आनंद गोवा पोर्तुगीजामध्ये नक्की मिळतो..

kaju bhaji

दक्षिण कल्चर करीमध्येही नेहमीच्या दाक्षिणात्य इडली डोशांच्या पलिकडे जाऊन दक्षिणी पदार्थांची चव चाखता येते.. मग तामिळनाडूतली प्रसिद्ध चेट्टीनाड खाद्यसंस्कृतीची झलक असो किंवा आंध्रप्रदेशातील किंचित तिखट भाज्या असोत किंवा केरळी लोक आवडीने खातात ती मिक्स भाजी म्हणजे अवियल असो.. डोशापेक्षा पूर्णपणे वेगळे मलबारी पराठे आणि अप्पम या सगळ्याची चव घ्यायची तर दक्षिण कल्चर करी हा अत्यंत उत्तम पर्याय आहे..

matar pattice

अर्थात यात नाविन्य असलं तरी अवचटांच्या तीनही रेस्टॉरन्टसची खरी खासियत त्यांच्या डेझर्टसमध्ये दिसते. परणपोळी, श्रीखंडासारख्या मराठी पदार्थांसोबत बेबिंकासारखा अनेकांनी नावही न ऐकलेलं गोवन डेझर्ट खायचं ते इथेच.. अर्थात दादरसारख्या उच्चभ्रू भागातले प्रयोगशील रेस्टॉरन्टस असल्याने किमती चांगल्याच चढ्या आहेत, पण असे हटके प्रयोग चाखायचे तर तेवढी किंमत द्यायची तयारी ठेवावीच लागते.. स्पेशालिटी रेस्टॉरन्टमध्ये जाऊन खास कुठलं तरी क्युझीन चाखायची लहर आल्यावर या तीन पर्यायांचा विचार केलाच पाहिजे...

संबंधित ब्लॉग :

जिभेचे चोचले : जिवाची मुंबई – पंचतारांकित रेनेसॉंचा संडे ब्रंच

जिभेचे चोचले : वाह ताज !– मसाला क्राफ्ट

जिभेचे चोचले : पारंपरिक जेवणाचा थाट – भगत ताराचंद

जिभेचे चोचले: बोटीच्या थीमचं हार्बर ओ फोर


जिभेचे चोचले : डोशासारख्या क्रेप्ससाठी ‘डी क्रेप्स’ कॅफे

जिभेचे चोचले : लिजेंडरी क्रिम सेंटर

जिभेचे चोचले : तरुणाईचा ‘चिजी’ अड्डा, प्युअर मिल्क सेंटर

जिभेचे चोचले: उडुपी संस्कृतीचा पारंपारिक थाट

जिभेचे चोचले : आस्वादचा ‘आस्वाद’

जिभेचे चोचले : स्पेशल सिझलरसाठी ‘फुड स्टुडियो’

जिभेचे चोचले : ‘फ’ से फ्यूजन… ‘फ’ से फूड

जिभेचे चोचले : ढाब्याची आठवण – चौबारा 601

जिभेचे चोचले : ग्लोबल एशियन फ्युजन

जिभेचे चोचले : हम काले है मगर… आईस्क्रीमचा भन्नाट फ्लेवर

जिभेचे चोचले : महाराष्ट्राचा काठ आणि घाट

जिभेचे चोचले: केक चॉकलेट पेस्ट्रीचं रोलिंग पिन

जिभेचे चोचले : पाणीपुरी – ‘तोंडभर’ आनंद

जिभेचे चोचले: पावभाजी – विथ लव्ह फ्रॉम मुंबई

 जिभेचे चोचले: इराणी हॉटेलांचा मॉडर्न अवतार

जिभेचे चोचले : मुंबईतलं मिनी दक्षिण भारत : इडली-डोशाचं गाव

जिभेचे चोचले : मुंबईचं मॉडर्न कॅन्टीन

जिभेचे चोचले : कुटुंबसंस्थेचं सेलिब्रेशन

जिभेचे चोचले : सफर विस्मरणातल्या खाद्यसंस्कृतीची

जिभेचे चोचले : हवाहवासा प्रवास

जिभेचे चोचले : गल्लीतला ‘खाऊ’

जिभेचे चोचले : पंचतारांकित रसनातृप्ती

जिभेचे चोचले : चमचमीत ग्रील आणि बार्बेक्यू

जिभेचे चोचले : तरुणाईची हँगआऊट प्लेस

जिभेचे चोचले : टूमदार, चटकदार घराची ‘स्टोरी’

जिभेचे चोचले: विलक्षण पाहुणचार

जिभेचे चोचले – खाद्यपदार्थांची न्यारी दुनिया ! 

जिभेचे चोचले : मुंबईतला नवा ट्रेण्ड- मॉडर्न फुड विथ ट्विस्ट

Blog शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: bharati sahasrabuddhes blog on speciallity tripple treat
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV