जिभेचे चोचले: बोटीच्या थीमचं हार्बर ओ फोर

जिभेचे चोचले: बोटीच्या थीमचं हार्बर ओ फोर

आजकाल लोकांजवळ पैसा आहे पण वेळ बिलकुल नाही, त्यामुळे वेगवेगळी ठिकाणं बघत हिंडणं, वेगवेगळ्या संस्कृतींची ओळख करुन घेणं यासाठी पैसा असूनही कितीही इच्छा असली तरी वेळ मात्र नाही, आपलं पर्यटनही अगदी ठरलेल्या वेळात मिळालेल्या सुट्टीत आपल्याला उरकून घ्यावं लागतं.

यासगळ्या अपरिहार्यतेवरच उपाय म्हणून की काय आजकाल सगळ्या मोठ्या शहरांमध्ये थीम रेस्टॉरन्टसची क्रेझ वाढलीय, लोकांना जिथे जिथे जायला आवडू शकतं त्या सगळ्या प्रकारची थीम रेस्टॉरन्टस आजकाल आपल्याला दिसतात.

म्हणजे वेगवेगळ्या राज्याच्या थीमची रेस्टॉरन्टस हमखास बघायला मिळतात, राजस्थानी किंवा गुजराती थीम असेल तर तिथे खादयपदार्थांपासून गरबा आणि दांडिया नृत्यापर्यंत सगळ्याचा अनुभव एकाच वेळी घेता येतो.पंजाबी थीमच्या रेस्टॉरन्टमध्ये थेट खाटेवर बसून ढाब्यासारख्या जेवणापासून ते लस्सीच्या ग्लासापर्यंत सगळं काही असतं.त्यामुळे आपल्याच शहरात तीन चार तासात एखाद्या राज्याचा फिल देतात ही थीम रेस्टॉरन्टस.

पण याहीपेक्षा वेगळी ठरतात ती काही भन्नाट थीमची रेस्टॉरन्टस. जंगलाची थीम असलेल्या मुंबईतल्या एका रेस्टॉरन्टमध्ये तर थेट जंगलातच जेवायला बसलोय असं वाटावं अशी सगळी सजावट आहे, बरं वाढणारे वेटरही थेट शिकाऱ्याच्या पोशाखात. नेहमीच्या वातावरणापेक्षा वेगळ्या वातावरणाचा अनुभव मिळत असल्याने लोकही अशा भन्नाट कल्पना उचलून धरतात आणि लोकप्रिय करतात. पण या थीम रेस्टॉरन्टसमध्ये सर्वात लोकप्रिय होतात ती प्रवासाच्या साधनांच्या थीम्स.. आगगाडी, विमान अशा प्रवासाच्या साधनांचं अगदी सगळ्या वयोगटातल्या लोकांना आकर्षण असतं..इच्छित स्थळी पोचण्याइतकाच आनंददायक तिथे पोचण्यापर्यंतचा प्रवास असतो..पण वेळेअभावी हा प्रवासही बरेचदा शक्य होत नाही..म्हणूनच कदाचित कमला मिल कंपाऊडमधलं प्रवास नावाचं राजधानी एक्सप्रेसच्या डब्यांशी साध्यर्म असलेलं ट्रेनचं थीम रेस्टॉरन्ट अल्पावधीतच लोकप्रिय झालं.. मुंबईच्या विविध भागात तर लोकल ट्रेनच्या डब्यांमध्ये बसल्याचा अनुभव देणारीही काही रेस्टॉरन्टस आहेत..पण एकूणच प्रवासातही सामान्यांना फारसा परिचित नसलेला प्रवास असतो तो बोटीचा..आगगाडी किंवा विमानासारखं आपल्या सगळ्यांनाच काही बोटीत मात्र बसायला मिळत नाही किंवा बोट आतून बघायलाही मिळत नाही आणि म्हणूनच ठाण्याच्या लुईसवाडी भागातलं सन मॅग्नेटिका बिल्डिंगमधलं बोटीच्या थीमचं ‘हार्बर ओ फोर’ नावाचं रेस्टॉरन्ट अगदी पहिल्या दिवसापासून लोकप्रिय झालंय...

Outside sitting

‘हार्बर ओ फोर’ला आत आणि बाहेर भरपूर जागा असल्यानं अख्खी बोटच त्यांनी उभारली आहे..रेस्टॉरन्टमध्ये प्रवेश करण्यासाठी तयार करण्यात आलेला लाकडी दरवाजाच काय थीम असेल याची जाणीव करुन देतो..लाकडी दरवाज्यातून आत शिरल्याबरोबर बोटीतच प्रवेश केलाय की काय असा भास व्हावा इतकी आतली परफेक्ट बोटीची सजावट. लाकडी डेकसारख्या पायऱ्या चढून जर बाहेर ओपन एयरमध्ये ठेवलेल्या टेबलांचा पर्याय आपण स्वीकारला असेल तर थेट बाहेर पडल्यावर पाय वाळूतच जातात आपले..समोर एक भव्य बोट नांगर टाकून उभी आहे आणि त्याच्यासमोरच वाळूत आपण चमचमीत पदार्थांचा आस्वाद घेतोय अशीच बाहेर वाळूत ठेवलेल्या टेबल्सवर बसल्यावर आपली भावना होते.

आतल्या एसी सेक्शनमध्ये मात्र पूर्णपणे बोटीच्या आत बसलोय असंच प्रत्येकाला वाटावं अशाप्रकारची संपूर्ण सजावट..भिंती लाकडी, फ्लोअरिंगही लाकडी आणि सर्विंग विंडोही बोटीच्या डेकचा भाग असावा अशी लाकडी खिडकी..फर्निचर, टेबल्स बसण्यासाठीच्या खुर्च्या आणि इतकंच नाही तर सर्व्ह करण्यासाठी वापरली जाणारी भांडी आणि प्लेट्स यांच्या वापरातूनही क्षणोक्षणी बोटीत बसल्याचा अनुभव देण्याचा प्रयत्न.

Sajavat

एखादं स्टार्टर मागवलं की इतर ठिकाणासाऱख्या नुसत्या प्लेटमध्ये आपण मागवलेले पदार्थ येत नाही तर बोटीचा गोलाकार सिंबॉल प्रत्येक प्लेटच्या खाली ठेवलेला असतो आणि त्यावर ठेऊनच ती प्लेट खवय्यांपुढे आणली जाते..बरं सर्व्ह करणारे वेटर, ऑर्डर घ्यायला येणारे मॅनेजर यांच्यापासून ते डिशेश उचलायला येणाऱ्या बॉयपर्यंत सगळे बोटीवरच्या गणवेषातच आपल्यापुढे येतात..त्यामुळे आपण बोटीवरच प्रवास करतोय असं तिथे बसल्यावर वाटल्याशिवाय रहात नाही. अर्थात बोटीची हटके थीम तर आहेच पण त्याबरोबरच तरुणाईला आकर्षित करणारी आणखी गोष्ट म्हणजे ‘हुक्का किंवा शीशा’..

या रेस्टॉरन्टमध्ये एका सेक्शनमध्ये हुक्का सर्व्ह केल्या जात असल्याने तर तरुण मुलामुलींचे अक्षरश: थवे असतात हार्बर ओ फोरला. अर्थात हुक्का मिळतो याचा अर्थ फॅमिलीजनी जाण्यासाठी ही जागा नाहीच असाही समज करुन घ्यायची गरज नाही कारण हे रेस्टॉरन्ट तीन भागात विभागलंय, आतली एसी सिटींग जिथे पूर्णपणे बोटीची थीम आहे, बाहेर वाळूत टाकलेली टेबलं बोटीपेक्षा बिचचा फिल जास्त देतात आणि तिथेच बाहेरच्या फॅमिली सेक्शन पडदे लावून वेगळा केलेला शीशा म्हणजे हुक्का पिणाऱ्यांसाठीचा विभाग, जिथे मनसोक्त बसून हुक्क्याच्या विविध फ्लेवर्सचा आस्वाद घेता येतो, त्याच्या जोडीला लुडो, कॅरमसारखे खेळही खेळण्याची सोय केलेली आहे या सेक्शनमध्ये. म्हणजे वेळ कसा घालवायचा याची चिंताच नको..बाहेरच्या फॅमिली सेक्शनमधे लावलेला स्प्रिंकलर्स हा आणखी एक नेहमी बघायला न मिळणारा प्रकार..बाहेर एसीची सोय नसल्यानं मध्यभागी गोलाकार खांब उभे केलेत आणि त्यातून दर थोड्यावेळाने आजुबाजुला पाण्याचा मंद शिडकावा होऊन सगळा भाग गार करुन जातो..ते पाण्याचे तुषार गर्मीत तर अंगावर घ्यायला फारच छान वाटतात..

Sprinkler

अर्थात थीम, हुक्का असं सगळं आहे मग खायला चांगलं मिळतं की नाही असा प्रश्न या थीम रेस्टॉरन्टसच्या बाबतीत नेहमीच पडतो..पण इथे मात्र सजावटीबरोबरच चवींकडेही लक्ष दिलं गेलंय..त्यामुळेच तर सगळ्या वयोगटातले लोक इथे कायम गर्दी करतात.

Padartha

इथलं मेन्यू कार्ड बघितल्यावर लक्षात येतं की मल्टीक्युझीन व्हेज आणि नॉन व्हेज रेस्टॉरन्ट या प्रकारात मोडणारं हे रेस्टॉरन्ट, त्यामुळे पंजाबी सब्जी रोटीपासून पिझ्झा पास्तापर्यंत सगळे प्रकार इथे मिळतातच..पण इथल्या चायनिज, इटालियन अशा पदार्थांपेक्षाही आवर्जुन इथले भारतीय पदार्थ चाखावे असं इथले पदार्थ खाऊन बघितल्यावर लक्षात येतं, बिर्याणी किंवा इतर भाज्यांचा पर्याय निवडल्यास निराशा होणार नाही एवढं नक्की..अर्थात ‘चिकन पेरी पेरी’ नावाचं इथलं स्टार्टर सगळ्या प्रसिद्ध आहे, कारण हार्बर ओ फोरला भेट देऊन आलेला प्रत्येक खवय्या चिकन पेरी पेरीची अगदी न चुकता शिफारस करतो.

Biryani

इथे हार्बर ओ फोरला गेल्यावर किंचित त्रासदायक वाटणारी गोष्ट एकच आहे ती म्हणजे जागा प्रचंड मोठी असल्याने ऑर्डर यायला जरा जास्तच वेळ लागतो..एवढ्या मोठ्या परिसरात आणि तीन तीन सेक्शनमध्ये फिरत असल्याने बरेचदा वेटर अचानक गायबही होतात..पण तेवढावेळ मन रमवायला इथे अनेक साधनं असल्यानं तितकासा प्रश्न पडत नाही आणि बोटीचा अनुभव घ्यायला तेवढाच अधिक वेळ मिळतो..खरं तर बोटीचा प्रवास सगळ्यांनाच काही शक्य नसल्यानं दोन तीन तासासाठी बोटीचा अनुभव घ्यायला खरोखर हरकत नाही..

संबंधित ब्लॉग

जिभेचे चोचले : डोशासारख्या क्रेप्ससाठी ‘डी क्रेप्स’ कॅफे

जिभेचे चोचले : लिजेंडरी क्रिम सेंटर

जिभेचे चोचले : तरुणाईचा ‘चिजी’ अड्डा, प्युअर मिल्क सेंटर

जिभेचे चोचले: उडुपी संस्कृतीचा पारंपारिक थाट

जिभेचे चोचले : आस्वादचा ‘आस्वाद’

जिभेचे चोचले : स्पेशल सिझलरसाठी ‘फुड स्टुडियो’

जिभेचे चोचले : ‘फ’ से फ्यूजन… ‘फ’ से फूड

जिभेचे चोचले : ढाब्याची आठवण – चौबारा 601

जिभेचे चोचले : ग्लोबल एशियन फ्युजन

जिभेचे चोचले : हम काले है मगर… आईस्क्रीमचा भन्नाट फ्लेवर

जिभेचे चोचले : महाराष्ट्राचा काठ आणि घाट

जिभेचे चोचले: केक चॉकलेट पेस्ट्रीचं रोलिंग पिन

जिभेचे चोचले : पाणीपुरी – ‘तोंडभर’ आनंद

जिभेचे चोचले: पावभाजी – विथ लव्ह फ्रॉम मुंबई

 जिभेचे चोचले: इराणी हॉटेलांचा मॉडर्न अवतार

जिभेचे चोचले : मुंबईतलं मिनी दक्षिण भारत : इडली-डोशाचं गाव

जिभेचे चोचले : मुंबईचं मॉडर्न कॅन्टीन

जिभेचे चोचले : कुटुंबसंस्थेचं सेलिब्रेशन

जिभेचे चोचले : सफर विस्मरणातल्या खाद्यसंस्कृतीची

जिभेचे चोचले : हवाहवासा प्रवास

जिभेचे चोचले : गल्लीतला ‘खाऊ’

जिभेचे चोचले : पंचतारांकित रसनातृप्ती

जिभेचे चोचले : चमचमीत ग्रील आणि बार्बेक्यू

जिभेचे चोचले : तरुणाईची हँगआऊट प्लेस

जिभेचे चोचले : टूमदार, चटकदार घराची ‘स्टोरी’

जिभेचे चोचले: विलक्षण पाहुणचार

जिभेचे चोचले – खाद्यपदार्थांची न्यारी दुनिया ! 

जिभेचे चोचले : मुंबईतला नवा ट्रेण्ड- मॉडर्न फुड विथ ट्विस्ट 

Blog शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV