सिनेमेनिया : डायलॉग्ज आणि अॅक्शनने पुरेपूर 'बादशाहो'

सिनेमेनिया : डायलॉग्ज आणि अॅक्शनने पुरेपूर 'बादशाहो'

दमदार डायलॉग्स, धमाकेदार अॅक्शन आणि परफेक्ट स्टारकास्ट... एका ओळीत ‘बादशाहो’ चित्रपटाचा ट्रेलर सांगता येईल. आपल्या अॅक्शनसाठी ओळखला जाणारा अजय देवगन पुन्हा एकादा बॉक्स ऑफिसवर अॅक्शन करताना दिसणार आहे. चित्रपटात अजय देवगणसोबत विद्युत जामवाल, इमरान हाशमी, ईशा गुप्ता, इलियाना डिक्रूज आणि संजय मिश्रा अशा तगड्या स्टार्सची जुगलबंदी चित्रपटात पाहायला मिळणार हे नक्की.

Baadshaho 1

आणीबाणी, राजघराणं आणि त्यांचा खजाना या भोवती चित्रपट असल्याचं ट्रेलरमध्ये दिसतं. अजय देवगण आणि डायलॉग्जचं नातं काही नवीन नाही. बादशाहोच्या ट्रेलरमध्येही आपल्याला ते अनुभवायला मिळतं. अजयच्या डायलॉग्सचं जे टायमिंग ट्रेलरमध्ये साधलं आहे, तेच चित्रपटात असावं म्हणजे झालं.

Baadshaho

मोठ्या पडद्यापासून मोठा ब्रेक घेतल्यानंतर इमरान हाशमी एका वेगळ्याचं भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत विद्युत जामवालही एक चॅलेंजिंग भुमिका साकरतोय.

Baadshaho 3

आणीबाणी लागू होताच राजघराण्यांचे खजाने सरकारकडे जमा करण्याचे आदेश निघतात. त्यात राणीच्या भूमिकेत असलेली इलियाना आपला खजाना सरकारकडून लूटण्याचा डाव रचते. तिच्या डावात अजय, इमरान, ईशा गुप्ता आणि संजय मिश्रा सामील होतात. विद्युत जामवाल इथं पोलिसांच्या भूमिकेत या सर्वांना रोखण्याचा प्रयत्न करतना ट्रेलरमध्ये दिसतो आहे.

Baadshaho 4

मौत जब सरपे होती हे, जिंदगी की किमत पता चलती है…  या दमदार डायलॉगने सुरु झालेल्या ट्रेलरमध्ये सुपर डॉयलॉग आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून बॉलीवूडमध्ये रोमँटिक चित्रपटांची रीघ लागली होती. आणि अॅक्शनपटाचा जणू दुष्काळ आला होता. मात्र आता बादशाहोच्या माध्यमातून बॉक्स ऑफिसवर अॅक्शन धडकणार हे नक्की.

Baadshaho 5

मिलन लुथरियांनी दिग्दर्शित केलेला बादशाहो 1 सप्टेंबरला आपल्या भेटीला येतोय. अजय देवगणचे कडक डायलॉग, दमदार अॅक्शन असलेल्या बादशाहोच्या ट्रेलरची खास झलक :

शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV