सिनेमेनिया : अॅक्शन, ड्रामा, रिव्हेंज… संजुबाबा बॅक विथ बँग

सिनेमेनिया : अॅक्शन, ड्रामा, रिव्हेंज… संजुबाबा बॅक विथ बँग

गेल्या तीन वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर असलेला मुन्नाभाई अर्थात संजय दत्त परत येतोय. 'भूमि'… संजूबाबाची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर पहिल्या चित्रपटाचा ट्रेलर रीलिज झाला. चित्रपटात संजूबाबासोबत आदिती राव हैदरी त्याच्या लेकीच्या भूमिकेत दिसणार आहे.

Bhoomi 1

2 मिनिटं 41 सेकंदाच्या ट्रेलरमध्ये आपल्याला बाप-लेकीचं प्रेम, आपली लेकच आपलं जग मानणाऱ्या बापाची कहाणी वेगवेगळ्या टप्प्यात दिसते.

Bhoomi 2

मराठी चित्रपट लयभारीचा विलन संग्राम म्हणजे शरद केळकर पुन्हा एकदा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. यावेळी मात्र तो जरा जास्तच खतरनाक असण्याची शक्यता आहे.

Bhoomi 3

ट्रेलरच्या पहिल्या टप्प्यात बाप-लेकीचं प्रेम आणि त्यांची सुपर केमिस्ट्री दिसते… बापाच्या भूमिकेत संजय दत्त कसा दाखवलाय हे पाहणं नक्की मजेशीर ठरेल.

Bhoomi 4

ट्रेलरमध्ये खरी रंगत येते शरद केळकरच्या एन्ट्रीनंतरच… आपल्या मुलीसोबत झालेल्या घटनेचा बदला घेताना आपल्याला संजय दत्त इन अॅक्शन दिसेल. बेस्ट फाईट सीन्स काही वेळा ट्रेलरला एका वेगळ्याचं उंचीवर नेतात.

Bhoomi 5

ट्रेलरमध्ये सर्वात सस्पेंस ठेवलाय तो शेवटी… आपल्या मुलीसाठी सर्व थरावर जाऊन बदला घेणारा बाप… शेवटी तिच्याच चारित्र्यावर संशय घेतो… त्यामुळे नेमकं काय कथानक आहे भूमिचं ट्रेलरवरुन सांगणं कठीण आहे…

Bhoomi 6

ओमंग कुमार यांनी भूमि चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. 22 सप्टेंबरला आपल्याला संजय दत्त इन अॅक्शन दिसणार आहे.  आता जितका सस्पेंस ट्रेलरमध्ये दिसतोय तो प्रेक्षकांना थिएटर्सकडे आकर्षित करणार का हा प्रश्न आहे? की फक्त संजुबाबासाठी गर्दी उसळणार…हे 22 तारखेलाच कळेल.

संजूबाबाच्या अॅक्शन थ्रिलर भूमि चित्रपटाची झलक

शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV