सिनेमेनिया : ऐतिहासिक कथानक, शाही थाट, तगडी स्टारकास्ट आणि पद्मावती

बहुप्रतीक्षित ‘पद्मावती’ चित्रपटाचा ट्रेलर सोमवारी प्रदर्शित करण्यात आला. ऐतिहासिक कथानक, भव्य सेट, ऐतिहासिक दागिने, तितकीच तगडी स्टारकास्ट आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी. ट्रेलर प्रदर्शित झाला आणि जगभरात ट्रेंडिंगही झाला.

cinemania blog by shishupal kadam on padmavati trailer

बहुप्रतीक्षित ‘पद्मावती’ चित्रपटाचा ट्रेलर सोमवारी प्रदर्शित करण्यात आला. ऐतिहासिक कथानक, भव्य सेट, ऐतिहासिक दागिने, तितकीच तगडी स्टारकास्ट आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी. ट्रेलर प्रदर्शित झाला आणि जगभरात ट्रेंडिंगही झाला.

PADMAVATI 001

चित्रपटात दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. 3 मिनिटांच्या ट्रेलरमध्ये फक्त दोनच संवाद ऐकायला मिळतात. ट्रेलरमध्ये संपूर्ण लक्ष पार्श्वसंगीतावर केंद्रीत केल्याचं पाहायला मिळतं.

PADMAVATI 002

राजा रावल रतन सिंह, राणी पद्मावती यांच्यातील प्रेम, डोळ्यांतून आग ओकणारा अल्लाउद्दीन खिल्जी यांची पुरेपूर झलक ट्रेलरमध्ये दिसते. खरी प्रेम कहाणी पाहण्यासाठी 1 डिसेंबरची वाट लागणार आहे.

PADMAVATI 003

ट्रेलरमधले दोन डायलॉग आणि तेही शाहिद आणि दीपिकाला देण्यात आले, पण ट्रेलरमध्ये रणवीरला एकही डायलॉग दिला नसला तरी त्याचा चेहरा आणि डोळे खूप काही बोलून जातात.

PADMAVATI 004

संजय लीला भन्साळी आणि भव्यता परत एकदा आपल्याला ट्रेलरमध्ये दिसते. ट्रेलरमध्ये रामलीला, बाजीराव मस्तानी, बाहुबली चित्रपटांची आठवण येते, पण पद्मावतीला नेमकं या सगळ्या चित्रपटांपासून वेगळं कसं केलं आहे हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल.

PADMAVATI 005-compressed

 

पण या ऐतिहासिक कथानकाच्या चित्रपटाच्या ट्रेलरसाठी :

News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:cinemania blog by shishupal kadam on padmavati trailer
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published: