जिभेचे चोचले : 'फ' से फ्यूजन... 'फ' से फूड

जिभेचे चोचले : 'फ' से फ्यूजन... 'फ' से फूड

लहानग्यांना पहिल्यांदा अक्षर ओळख शिकवायची तर 'ए' फॉर 'अॅप्पल', 'बी' फॉर 'बॅट', तसंच हिंदीत 'अ' से 'अनार' असं अगदी आसेतुहिमाचल हमखास शिकवलं जातं. पण खवय्यांची, खाद्यप्रेमींची भाषा जरा वेगळीच. 'फ' से 'फल' न होता, खवय्यांच्या भाषेत 'फ' से फूड असाच विचार केला जाणार. त्यामुळेच तर 'फ' से 'फूड' नावाने मुलुंडमध्ये नव्यानं एक रेस्टॉरन्ट सुरु झालंय. खास खवय्यांच्या फॅन्टसिज प्रत्यक्षात उतरवणारं 'फ' से 'फूड'. फॅन्टसिज म्हणण्याचं कारण, इथले पदार्थ आणि ते सर्व्ह करण्याची पद्धत यांच्यासाठी वापरलेल्या कल्पना खरोखर वेगळ्या आहेत.

Chakli Chat 1

म्हणजे खास गुजराती लोकांच्या चवींचा विचार करुन तयार केलेला एक चाटचा भन्नाट प्रकार बाकरवडी चकली चाट. खरं तर प्रकारचं किती वेगळा-बाकर वड्या आणि चकल्यांबरोबर फरसाण, कांदा, टोमॅटो, यांना एकत्र करुन केलेली एक कुरकुरीत चाट, स्टार्टर म्हणून ऑर्डर दिल्यावर वेटर प्लेट किंवा बाऊल न आणता आणतो खेळण्यातली अतिशय सुबक अशी हातगाडी, भरपूर आणि रंगबेरंगी सामानाने भरलेली रस्त्यावरची हातगाडी कशी सुंदर दिसते. अगदी तशाच प्रकारे या खेळण्यातल्या छोट्याशा हातगाडीवर तो भेळेचा पसारा शोभून दिसतो. हातगाडीवरची ती भेळ डिशमध्ये न घेता तशीच हातगाडीवरुन खायची. तसाच प्रकार शेवपुरीचा! भरपूर चिजने सजवलेली शेवपुरी एका खेळण्यातल्या ट्रकवरच येते.

Desert Plate 1

असा या 'फ' से 'फूड'मधला प्रत्येक पदार्थ हटके आणि तो प्रेझेंट करण्याचा अंदाज त्याहूनही हटके. आता 'टार्ट' हा पदार्थ खरं तर 'डेझर्ट' किंवा गोड पदार्थ म्हणून खवय्यांच्या ओळखीचा. 'अॅप्पल टार्ट' हा तर फ्रान्सचा राष्ट्रीय पदार्थ. पण गेल्या काही वर्षात 'टार्ट'च्या कुरकुरीत बेसचा वापर करुन पदार्थांचं फ्यूजन करण्याचा प्रयत्न अनेक ठिकाणी होताना दिसतो. त्यातलेच काही भन्नाट पण चवदार पदार्थ 'फ' से 'फूड'मध्येही दिसतो. 'झुनका टार्ट' नावाचं फ्यूजन त्यातलाच एक भाग. नावात झुनका असला तरी, मराठी घरांमध्ये सर्रास होणारं पिठलं टार्टच्या वाट्यांमध्ये ग्रील केलेलं असतं, आणि वरुन भरपूर चिज असा हा झुनका टार्ट नावाचा पदार्थ. तितकाच इंटरेस्टींग पदार्थ आहे तो खिचिया पास्ता.

पापड- मुंबईच्या गल्ल्यांमध्ये मिळणारा चमचमीत चाटसारखा पदार्थ खिचिया पापड. कुरकुरीत भाजलेल्या पापडावर हिरवी चटणी, फरसाण, काकडी, कांदा, टोमॅटो, शेव टाकून तो भलामोठा खिचिया पापड खायची सवय मुंबईकरांना झालीय. पण या भाजक्या पापडावर फरसाणाच्या मसाल्याऐवजी त्या पापडावर पसरवलेला चिज पास्ता खाण्यातही एक वेगळी मजा येते. तसाच आणखी एक भन्नाट पदार्थ म्हणजे छोले-भटुरे. बॉम्ब – मोठेमोठे भटुरे छोल्यांशी लावून लावून खाण्याऐवजी तीच चव छोट्या बाईट्समध्ये देण्याचा प्रयत्न. स्प्रींगरोलसारख्या भटुऱ्याच्या रोलमध्ये छोले भरुन मेयो चटणी आणि कांद्याचं डेकोरेशन असा हा छोले भटुऱ्याचा ब़ॉम्ब.

Pawbhaji Plart 1

पण खऱ्या अर्थाने या रेस्टॉरन्टला पाव-भाजीचं रेस्टॉरन्ट म्हणावं इतक्या वेगवेगळ्या प्रकारांनी इथे पाव-भाजी मिळते. सध्या लोकप्रिय होत असलेला पाव-भाजी 'फॉन्द्यू' इथे मिळतोच. 'फॉन्द्यू' स्टीकला पाव टोचून भाजीत बुडवून ते खाण्याची मजा आजकाल अनेक लोक घेतात. पण त्याचबरोबर साधी बटर पावभाजी, चिज पाव-भाजी, पनीर पाव-भाजी, ग्रीन पाव-भाजी (यात पालक असतो), ब्लॅक पाव-भाजी (यात काळ्या उसळी असतात), मंच्युरियन पाव-भाजी, चायनिज पाव-भाजी, खडा पाव-भाजी असे पाव-भाजीचे प्रकार मिळतात. बरं पाव-भाजीचे इतके प्रकार पाहिले की, खवय्यांच्या मनात येऊन जातं की, यातले दोन-तीन तरी चाखता आले पाहीजे. तर त्याचीही सोय 'फ से फुड'च्या मेन्यूकार्डात आहे.

पाव-भाजी प्लॅटर म्हणून या पाव-भाजीचे तीन प्रकार खाण्याचा चॉईस मिळतो. एका प्लॅटरमध्ये पनीर, ब्लॅक आणि बटर पाव-भाजीचा आस्वाद घेता येतो. तर दुसऱ्या प्रकाराच्या प्लॅटरमध्ये मंच्यूरियन आणि चायनिज पाव-भाजीचा पर्याय मिळतो. त्यामुळे तीन-चार जणांचा ग्रुप असेल तर तीन प्रकारच्या पाव-भाजीचा सहज आस्वाद घेता येतो. बरं, पाव-भाजीचे विविध प्रकार इथेच थांबत नाही, तर वर उल्लेख केलेल्या टार्टमध्येही पाव-भाजी टार्ट नावाचा पर्याय या रेस्टॉरन्टमध्ये मिळतो. मोठ्या कपच्या आकाराचे टार्ट पाव-भाजीच्या भाजीने भरलेले असतात, आणि वर चिज असे हे पावभाजी टार्ट हा तर फ से फुडमधला सर्वाधिक मागवला जाणारा पदार्थ आहे.

Hatgadi 1

हे मल्टीक्युझिन रेस्टॉरन्ट असल्याने चायनिज, इटालियन पदार्थही मिळतात. पण त्यांच्या पिझ्झाच्या सेक्शनमध्येही मिळतो तो खास पावभाजी पिझ्झा. बाकी मॅक्सिकन आणि इटालियन पिझ्झांच्या यादीतला पावभाजी पिझ्झाच जास्त भाव खाऊन जातो. त्यामुळे पावभाजी प्रेमींनी तर फ से फुड ला किमान एकदातरी जायलाच हवं. कल्पनाही न केलेल्या किती वेगवेगळ्या प्रकारांनी पावभाजी खाता येते हे इथे आल्यावरच कळतं.

मुख्य जेवणापेक्षा स्टार्टर्स आणि डेझर्टमध्ये जास्त प्रयोग करता येतात. त्यामुळे पदार्थांचं फ्युजन हे सहसा मेन कोर्समध्ये दिसत नाही. तसंही मुख्य जेवणाने पोट भरायचं असल्याने त्यात फारसे प्रयोग नको, असं खवय्यांचंही मत असतं. पण हटके काहीतरी अशीच थीम 'फ से फूड'ची असल्यानं, पदार्थ सर्व्ह करण्यात मात्र जोरदार फ्यूजन वापरलंय.

Choti Badli 1

इथे तुम्ही कुठलाही भाताचा प्रकार मागवा चायनिज राईस असो की, भारतीय बिर्याणी, हा प्रकार तुमच्या टेबलवर प्लेट किंवा बाऊलमध्ये न येता थेट काचेच्या बाटलीत भरुनच आणला जातो. त्याबरोबरची ग्रेव्ही किंवा दालही येते ती छोट्याशा बादलीतून. अशा कितीतरी मिनी किंवा खेळण्यातल्या वस्तूंचा तर फारच कल्पक वापर या रेस्टॉरन्टमध्ये केलेला दिसतो. हातगाडी, ट्रक, छोट्या बादल्या,वाट्या पाहून आपल्यासोबतच बच्चेकंपनी तर हरखूनच जाते.

Kivi Rasgulla 1

अशा सगळ्या ट्विस्ट असलेल्या पदार्थांबरोबरच मॉकटेल्सही तशीच हटके असावी अशी आपली अपेक्षा असते. आणि त्यानुसारच या रेस्टॉरन्टच्या मेन्यूकार्डमध्ये कोकम मोईतो आणि ताक प्लॅटर अशी शीतपेयं दिसतात. पण खरी गंमत आहे ती डेझर्ट सेक्शनची. 8-10 पानी मेन्यू कार्डमध्ये डेझर्टस कुठे दिसतच नाहीत. मग डेझर्टसबद्दल मॅनेजरकडे विचारणा केली की, 8-10 छोट्याछोट्या रंगीत वाट्यांमधून गोड पदार्थ आपल्यासमोर आणले जातात. त्यात मग बुंदीच्या लाडूचं आईस्क्रीम, किवी फ्लेवरचा रसगुल्ला, चॉकलेट मूस, असे काही भन्नाट पदार्थ असतात. त्या 8-10 पदार्थांपैकी आपल्याला आवडेल तितकी डेझर्ट्स मागवायची अशी ती पद्धत. मात्र, हे डेझर्ट रोज बदलतात, त्यामुळे आज खाल्लेला पदार्थ उद्या गेलेल्या व्यक्तीला मिळेलच असं नाही. अर्थात रोजचे डेझर्ट असे चित्रविचित्र पण चवदार असेच असतात.

Garlik Bread 1

मुलुंडमधे फोर्टिस हॉस्पीटलच्या अलिकडे गॅलेरिया बिल्डिंग नावाची खूप मोठी नवीन इमारत झालीय. या इमारतीतच पहिल्या मजल्यावर 'फ से फूड' रेस्टॉरन्ट आहे. बाहेरच्या पाटीवरही अतिशय आकर्षक रंगसंगतीमुळे दुरुनही 'फ से फूड'ची पाटी ओळखू येते. अर्थात काही महिन्यांपूर्वीच सुरु झालेल्या या रेस्टॉरन्टची संध्या मुलुंडमध्ये प्रचंड क्रेझ आहे. आणि तुलनेनी रेस्टॉरन्टची क्षमता कमी आहे. त्यामुळे या सगळ्या हटके पदार्थांचा आस्वाद घ्यायचा तर वाट बघण्याची तयारी मात्र ठेवावीच लागेल. अर्थात वाट पाहून आत गेल्यावर मात्र खवय्यांची निराशा होणार नाही एवढं नक्की.

संबंधित ब्लॉग

जिभेचे चोचले : ढाब्याची आठवण - चौबारा 601

जिभेचे चोचले : ग्लोबल एशियन फ्युजन

जिभेचे चोचले : हम काले है मगर… आईस्क्रीमचा भन्नाट फ्लेवर

जिभेचे चोचले : महाराष्ट्राचा काठ आणि घाट

जिभेचे चोचले: केक चॉकलेट पेस्ट्रीचं रोलिंग पिन

जिभेचे चोचले : पाणीपुरी – ‘तोंडभर’ आनंद

जिभेचे चोचले: पावभाजी – विथ लव्ह फ्रॉम मुंबई

 जिभेचे चोचले: इराणी हॉटेलांचा मॉडर्न अवतार

जिभेचे चोचले : मुंबईतलं मिनी दक्षिण भारत : इडली-डोशाचं गाव

जिभेचे चोचले : मुंबईचं मॉडर्न कॅन्टीन

जिभेचे चोचले : कुटुंबसंस्थेचं सेलिब्रेशन

जिभेचे चोचले : सफर विस्मरणातल्या खाद्यसंस्कृतीची

जिभेचे चोचले : हवाहवासा प्रवास

जिभेचे चोचले : गल्लीतला ‘खाऊ’

जिभेचे चोचले : पंचतारांकित रसनातृप्ती

जिभेचे चोचले : चमचमीत ग्रील आणि बार्बेक्यू

जिभेचे चोचले : तरुणाईची हँगआऊट प्लेस

जिभेचे चोचले : टूमदार, चटकदार घराची ‘स्टोरी’

जिभेचे चोचले: विलक्षण पाहुणचार

जिभेचे चोचले – खाद्यपदार्थांची न्यारी दुनिया ! 

जिभेचे चोचले : मुंबईतला नवा ट्रेण्ड- मॉडर्न फुड विथ ट्विस्ट 

शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV