जिभेचे चोचले : तरुणाईचा ‘चिजी’ अड्डा, प्युअर मिल्क सेंटर

जिभेचे चोचले : तरुणाईचा ‘चिजी’ अड्डा, प्युअर मिल्क सेंटर

शहरात कितीही उपहार गृहं आणि रेस्टॉरन्टस असली तरी त्यातले खास कॉलेजवयीन तरुणांचे अड्डे स्पेशल आणि वेगळे असतात. एकतर हे तरुणाईचे अड्डे वेगवेगळ्या कॉलेजेसच्या जवळ असतात किंवा खास तरुणाईला आकर्षित करणारा मेन्यू असणारे रेस्टॉरन्टस तरुणाईला आपल्याकडे खेचतात. पॉकेटमनीला परवडणाऱ्या किमती हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा तरुणाईच्या रेस्टॉरन्ट सिलेक्शनमध्ये असला तरी त्यांच्या चवी जरा वेगळ्या असतात हे ही तितकंच खरंय.

असंच खास युवापिढीच्या चवींचा विचार करुन पदार्थांमध्ये नाविन्य आणणारं घाटकोपरमधलं प्युअर मिल्क सेंटर सध्या जबरदस्त प्रसिद्ध झालं आहे. घाटकोपर पूर्वेला टिळक रोडवर अगदी चौकात असलेलं हे अतिशय छोट्या जागेतलं रेस्टॉरन्ट शोधावं लागत नाही, लगेच सापडतं त्यामुळेही लोकांचा आणि खासकरुन युवापिढाचा ओढा या प्युअर मिल्क सेंटरकडे वळत असावा.

पण गेल्या काही दिवसात प्युअर मिल्क सेंटरच्या पदार्थांची जाहीरात जास्त झाली म्हणून की काय संध्याकाळच्या वेळी प्रचंड गर्दी असते इथे. खरं तर एका दुकानाच्या गाळ्यात थाटलेलं हे छोटेखानी रेस्टॉरन्ट. एखादं स्नॅक्स सेंटर म्हणता येईल इतकं ते लहान आहे आणि फुटपाथच्याच थोड्या भागावर मांडव टाकून बसण्यासाठी अगदी मोजके चार पाच टेबलं टाकून तयार झालेलं हे रेस्टॉरन्ट आहे. येणारे ग्रुप मात्र मोठमोठे .एकतर कॉलेजवयीन मुलांचे मोठे ग्रुप किंवा मोठी कुटुंब आली की एकाचवेळी सगळी टेबलं फुल्ल होतात, त्यामुळे संध्याकाळपासूनच इथे टेबल मिळवण्यासाठी तासनतास ‘वेटींग करावं लागतं. भर चौकातच प्युअर मिल्क सेंटर असल्याने उभं रहायलासुद्धा पुरेशी जागा नाही. अशा परिस्थितीत अक्षरश: रस्त्यावर उभे राहून लोक आपल्याला टेबल मिळण्याची वाट बघत असतात. वाट बघून कंटाळून गेलेले लोक तिथल्या मॅनजरला वारंवार विचारत असतात आणि काही लोक तर शेवटी ऑर्डर देऊन हातात प्लेट घेऊन खायला सुरुवात करतात, काही लोक आणलेल्या टू व्हिलरचाच टेबल बनवून त्यावरच मागवलेली डिश ठेवतात आणि खाऊ लागतात.

आता तिथल्या गर्दीचं इतकं सगळं वर्णन वाचल्यावर नक्की असे पदार्थ काय मिळतात या ठिकाणी याबद्दल उत्सुकता चांगलीच ताणली गेली असेल. युवा पिढीला आकर्षण वाटतं असं म्हंटल्यावर तर नक्की काय मिळतं इथे असा प्रश्नच पडला असेल. अगदी थोडक्यात इथल्या पदार्थांचं वर्णन करायचं तर चिज आणि चॉकलेट या लहानांना आवडणाऱ्या दोन चवी इथल्या प्रत्येक पदार्थाच्या स्टार आहेत. पदार्थ कुठलाही असो डोसा, सॅण्डविच, पास्ता किंवा चक्क पाव भाजी. प्रत्येक पदार्थात चिजचा मुबलक वापर ही प्युअर मिल्क सेंटरमधल्या प्रत्येक पदार्थाची खासियत. मोठ्यामोठ्या भांड्यातून एरव्ही उडप्यांच्या हॉटेलात जसा सांबार गरम होत असतो तसा इथे प्युअर मिल्क सेंटरला चिज ठेवलेलं असतं. काही ठिकाणी वितळलेलं पातळ चिज, तर किसून काही पदार्थांवर टाकण्यासाठी चिजच्या मोठमोठ्या विटा असा सगळा चिजचा पसारा दिसतो त्या छोट्याशा जागेत.

cheese burst dosa 1

‘चिज बर्स्ट मसाला डोसा’ हा इथला सगळ्यात प्रसिद्ध आणि सर्वाधिक मागणी असलेला पदार्थ, इथे खायला आलेली प्रत्येक व्यक्ती इतर कुठलाही पदार्थ खाऊ देत पण न चुकता चिज बर्स्ट डोसा मात्र मागवतेच. म्हणूनच रेस्टॉरन्टमध्ये अगदी उघड्यावरच ठेवलेल्य़ा मोठ्या तव्यावर तीन ते चार लोक न थांबता केवळ डोसेच करत असतात. एक जण त्यावर मसाला म्हणजे भाजी टाकून त्या डोशाचे रोल बनवून डिशमध्ये ठेवत असतो. त्या डिशमधल्या उभ्या डोसा रोल्सवर मग अगदी मुक्त हस्ताने पातळ केलेलं चिज सोडलेलं असतं. असा तो चिज ओतलेला खऱ्या अर्थाने चिज बर्स्ट डोसा चटणी आणि सांबाराच्या वाट्यांबरोबर प्लेटमध्ये येतो. त्या डोशाच्या प्रत्येक घासात चिज आणि चिज आणि चिजचीच चव लागते. असा चिजी डोसा युवापिढीता फेवरेट होणार नाहीतर काय.

pav bhaji dosa

तोच प्रकार ‘चिझु’ पावभाजी नावाच्या पदार्थाचा. एरव्ही चिज पावभाजी हा प्रकार आपल्यासाठी नवा नाही, पण चिझु पावभाजी हा प्रकार त्याहीपेक्षा भन्नाट. पावभाजीमध्ये चिजचे चार पाच मोठ्ठे गोळेच टाकलेले असतात. चिझु म्हंटल्यावर ते गोळे फोडून एकत्र केले की जितकी पावभाजीची चव तितकीच चिजची चव लागते.

five cheese pasta

चिजने भरलेला ‘फाईव्ह चिज पास्ता’ हासुद्धा चिजप्रेमींना वारंवार प्युअर मिल्क सेंटरला आणणारा पदार्थ. जितका पास्ता तितकं हे पाच प्रकारचं चिज असं यातलं प्रमाण. लाल ग्रेव्हीमधला पास्ता वेगवेगळ्या प्रकारच्या चिजमुळे खरोखर रुचकर लागतो यात शंका नाही.

Chocolate-Dosa (2)

प्युअर मिल्क सेंटरमध्ये चिज जसं खूप महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं आहे चॉकलेट. ब्रेडवर चॉकलेट लावून वरुनही चिजसोबत किसलेलं चॉकलेट असलेलं सॅण्डविच तर आता अनेक ठिकाणी मिळतं. पण या प्युअर मिल्क सेंटरमध्ये चॉकलेट डोसा मिळतो. चॉकलेट साधा डोसा, चॉकलेट चिज डोसा आणि त्याहीपुढे जाऊन आईसक्रीम असलेला चॉकलेट सण्डे डोसाही मिळतो..आता असे क्रेझी पदार्थ चाखायचे तर तरुणाईचा क्रेझी ग्रुप आणि क्रेझी मूड पाहीजे बाकीच्याचं ते कामच नाही.

cake dosa

चॉकलेटच्याही पुढे जाऊन ‘केक डोसा’ नावाचा फारच भन्नाट पदार्थ इथे मिळतो. पण यातही दोन जाडसर डोशांच्यामध्ये भरपूर चॉकलेट भरलेलं असतं आणि आलुपराठ्यासारख्या भरलेल्या या डोशावर केकसारखं आयसिंग केलेलं असतं. म्हणजे केकही चॉकलेटचाच.

pizza dosa


केक डोशासारखाच पण चॉकलेट नाही तर भरपूर चिज असलेला आणखी एक पदार्थ म्हणजे पिझ्झा डोसा, डोशाचा जाडसर बेस तयार करुन वरती पिझ्झ्याच्या भाज्या आणि खूप चिज असा हा पिझ्झा डोसाही ब्रेडच्या ऐवजी डोशाच्या बेसवर छान लागतो. त्याशिवाय पावभाजी डोसा, पनीर डोसा, मंचुरियन डोसा आणि कोल्हापुरी डोसा असे आता अनेक ठिकाणी मिळणारे डोशाचे प्रकार इथे मिळतातच. मात्र, डोशांसारखेच उत्तपमचेही कितीतरी प्रकार इथे मिळतात. सगळ्यात वेगळा आणि कधीही न ऐकलेला उत्तपमचा प्रकार म्हणजे वॅफल उत्तपम. वॅफल हा सध्याचा खवय्यांचा आणि खासकरुन तरुणाईचा फेवरेट पदार्थ. पण वॅफल हे आईसक्रीमच्या कोनसारखे लागतात. त्याच वॅफलच्या आकारात इथे उत्तपम तयार होतो आणि हा उत्तपम गोड नसून चमचमीत असतो.

डोसा आणि सॅण्डिविचच्या या काही भन्नाट पदार्थांबरोबर इतरही चमचमीत, चटपटीत पदार्थ मिळतात, चाट, समोसे अशा पदार्थांबरोबरच चाटमध्येही डोशासारखे काही टेस्टी प्रयोग दिसतात, त्यातलाच एक पदार्थ टॉर्टिला चाट. कुरमुऱ्यांच्या चाटच्या जागी मेक्सिकन कुरकुरीत टॉर्टिलांचा वापर करुन वर छान शेव, कांदा टोमॅटोचं डेकोरेशन अशी ही डीश. अर्थात पदार्थ खूप आणि वैविध्यपूर्ण असल्याने निवांत बसून खाऊया असा विचार केला तर मात्र इथल्या गर्दीमुळे साफ निराशा होते. त्यामुळे कुठला पदार्थ चाखायचा हे आधीच ठरवून खूप वेळ वाट बघण्याची तयारी असलेल्यांनीच प्युअर मिल्क सेंटर गाठावं.अर्थात तासनतास वेटींगची तपश्चर्या केल्यानंतर मात्र चवींच्या बाबतीत निराशा होणार नाही हे नक्की.

संबंधित ब्लॉग : 

जिभेचे चोचले: उडुपी संस्कृतीचा पारंपारिक थाट


जिभेचे चोचले : आस्वादचा ‘आस्वाद’


जिभेचे चोचले : स्पेशल सिझलरसाठी ‘फुड स्टुडियो’


जिभेचे चोचले : ‘फ’ से फ्यूजन… ‘फ’ से फूड


जिभेचे चोचले : ढाब्याची आठवण – चौबारा 601


जिभेचे चोचले : ग्लोबल एशियन फ्युजन


जिभेचे चोचले : हम काले है मगर… आईस्क्रीमचा भन्नाट फ्लेवर


जिभेचे चोचले : महाराष्ट्राचा काठ आणि घाट


जिभेचे चोचले: केक चॉकलेट पेस्ट्रीचं रोलिंग पिन


जिभेचे चोचले : पाणीपुरी – ‘तोंडभर’ आनंद


जिभेचे चोचले: पावभाजी – विथ लव्ह फ्रॉम मुंबई


 जिभेचे चोचले: इराणी हॉटेलांचा मॉडर्न अवतार


जिभेचे चोचले : मुंबईतलं मिनी दक्षिण भारत : इडली-डोशाचं गाव


जिभेचे चोचले : मुंबईचं मॉडर्न कॅन्टीन


जिभेचे चोचले : कुटुंबसंस्थेचं सेलिब्रेशन


जिभेचे चोचले : सफर विस्मरणातल्या खाद्यसंस्कृतीची


जिभेचे चोचले : हवाहवासा प्रवास


जिभेचे चोचले : गल्लीतला ‘खाऊ’


जिभेचे चोचले : पंचतारांकित रसनातृप्ती


जिभेचे चोचले : चमचमीत ग्रील आणि बार्बेक्यू


जिभेचे चोचले : तरुणाईची हँगआऊट प्लेस


जिभेचे चोचले : टूमदार, चटकदार घराची ‘स्टोरी’


जिभेचे चोचले: विलक्षण पाहुणचार


जिभेचे चोचले – खाद्यपदार्थांची न्यारी दुनिया ! 


जिभेचे चोचले : मुंबईतला नवा ट्रेण्ड- मॉडर्न फुड विथ ट्विस्ट 

Blog शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV