खान्देश खबरबात : खान्देशी काँग्रेस गलितगात्र

By: | Last Updated: > Monday, 19 September 2016 3:48 PM
Journalist Dilip Tiwari’s blog on Congress in Khandesh

ब्लॉग लेखक : पत्रकार दिलीप तिवारी

खान्देशातील धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेस पक्ष हा अंतर्गत वादांमुळे आणखी खिळखिळा झाला आहे. जळगाव जिल्ह्यात काँग्रेसची अवस्था “ना काही प्रभाव, ना काही घट,” अशी जैसे थे आहे. एक प्रकारे “खान्देशी काँग्रेस गलितगात्र” होत असून स्वकियांच्या भांडणातूनच सारे घडते आहे.

 

दोन दिवसांपूर्वी धुळे येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पासून दुरावलेले डॉ. हेमंत पाटील यांचा काँग्रेस पक्षात प्रवेशाचा सोहळा होता. तेथे अमरिश पटेल यांच्या “ऍन्कर” गटाच्या आणि रोहिदास पाटील यांच्या “जवाहर”  गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. अशोक चव्हाण यांनी भेटायला आलेले रोहिदास पाटील व त्यांचे पुत्र कुणाल यांना रोखण्यात आले. रोहिदास पाटील यांच्यासोबत शामकांत सेनेर, युवराज करणकाळ, शिवाजी दहिते आदी होते. माजी आमदार द. वा. पाटील यांचे नातू प्रफुल्ल रामराव पवार यांनी रोहिदास पाटील यांना चव्हाणांची भेट घेण्यास मज्जाव केला. त्यानंतर पवार यांना रोहिदास पाटील समर्थकांनी धक्काबुक्की केली.

 

Khandesh Khabarbat

 

या मागील कारण असे सांगितले जाते की, गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत धुळे मतदार संघातून काँग्रेसतर्फे अमरिश पटेल यांना उमेदवारी असताना रोहिदास पाटील यांच्या “जवाहर” गटाने काँग्रेस विरोधात काम केल्याचा आरोप आहे. त्यामुळे रोहिदास पाटील आणि त्यांच्या मुलावरील रोष व्यक्त झाला. अमरिश पटेल व रोहिदास पाटील यांच्या “ऍन्कर” व “जवाहर” गटात पूर्वीपासून वर्चस्वासाठी प्रयत्न सुरू असतात. त्यातूनच दोघांचे कार्यकर्ते एकमेकाला भीडत असतात.

 

धुळे जिल्ह्याच्या पाठोपाठ नंदुराबार जिल्ह्यातही काँग्रेस अंतर्गत माजी खासदार माणिकराव गावीत आणि चंद्रकांत रघुवंशी तसेच माजी मंत्री सुरूपसिंग नाईक आणि अमरिश पटेल यांच्या गटातही सुंदोपसुंदी सुरू असते. मोदी लाटेत गावीत यांची खासदारकी गेली आहे, त्याच लाटेत नाईक यांची आमदारकी गेली आहे. दोघांना असे वाटते की आपल्या विरोधात समोरच्याने काम केले म्हणून आपण पराभूत झालो. या दोघांमधील हा वाद आता पुढची पिढी माणिकरावांचे पूत्र भरत गावित आणि सुरुपसिंग यांचे पूत्र शिरीष नाईक यांच्यात सुरू असते. खासगी बैठकांमध्ये गावित आणि नाईक एकमेकांच्या कट्ट्रर शत्रू सारखे बोलतात. याशिवाय चंद्रकांत रघुवंशी यांना असे वाटते की, विधान परिषदेच्या निवडणुकीत आपले आमदार पद अमरिश पटेल यांच्यामुळे हिरावले गेले आहे. रघुवंशी व पटेल यांच्यात आपापसात नाराजी आहेच.

 

जळगाव जिह्यातही पक्ष निरीक्षक भाई जगताप आले असताना काही कार्यकर्त्यांनी नेत्यांमधील गटबाजीचा मुद्दा मांडला होता. जळगाव जिल्ह्यातील काँग्रेसही स्व. व्ही. जी. पाटील आणि स्व. काझी यांच्यात विभागलेली आहे. सध्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष ऍड. संदीप पाटील आहेत. जळगाव महानगराध्य डॉ. ए. जी . भंगाळे आहेत. ऍड. पाटील यांचा जिल्हाध्यक्ष म्हणून फारसा प्रभाव नाही. जळगाव शहरात भंगाळे यांच्यापेक्षा डॉ. राधेशाम चौधरी यांनी बऱ्यापैकी पक्ष वाढवायचा प्रयत्न सुरू केला आहे. तरी सुद्धा ज्या घराण्यांनी काँग्रेसच्या सुवर्ण काळात सत्ता उपभोगली ती मंडळी किंवा त्यांची पिढी आज काँग्रेस पासून लांब आहे. माजी खासदार डॉ. उल्हास पाटील हे पक्षाला आणि पक्ष नेत्यांना गुंडाळून ठेवतात असा आरोप काही कार्यकर्ते करतात. मात्र, डॉ. उल्हास पाटील हे पूर्णतः जनाधार हरवून बसल्याचे मागील निवडणुकीत आढळून आले आहे. म्हणूनच जळगाव जिल्ह्यात काँग्रेस “ना पुढे ना मागे अशी जैसे थे” आहे.

‘खान्देश खबरबात’मधील पत्रकार दिलीप तिवारी यांचे याआधीचे ब्लॉग :

 

खान्देश खबरबात : गाईंना कत्तलखान्यात पाठवणारे कोण असतात?

खान्देश खबरबात : पोषण आहार घोटाळ्याचे रॅकेट

खान्देश खबरबात : वैद्यकीय सेवा महागणार, IMA चा इशारा

खान्देश खबरबात : पर्यटन विकासाला संधी

खान्देश खबरबात : पावसाची पाठ, शेतकरी चिंतेत

News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Journalist Dilip Tiwari’s blog on Congress in Khandesh
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published: