खान्देश खबरबात : खान्देशात भूजल पातळीत वाढ

खान्देश खबरबात : खान्देशात भूजल पातळीत वाढ

खान्देशातील तीनही जिल्ह्यात सन २०१६ च्या पावसाळ्यापूर्वी जलयुक्त शिवार योजनांतर्गत विविध कामे पूर्ण करण्यात आली होती. याकरिता महसूल, जिल्हा परिषद, कृषी, वनीकरण, जलसंपदा आदी सरकारी यंत्रणांनी ग्रामस्थ व स्वयंसेवी संस्थांच्या सहभागातून कामे पूर्ण केली. त्याच्या परिणाम स्वरुप खान्देशातील १८ तालुक्यांमध्ये भूजल पातळीत वाढ झाल्याचे आढळून आले आहे. भूजल पातळीच्या नोंदी करण्यासाठी भूजल सर्वेक्षण विभागाने निरीक्षण विहीरी निश्चित केलेल्या आहेत. त्यातील भूजल पातळीच्या अलिकडच्या नोंदी या समाधानकारक व जलयुक्त शिवार योजनेची उपयुक्तता सिद्ध करणाऱ्या आहेत.

नाशिक महसूल विभागात एकूण ५४ तालुक्यांपैकी ४५ तालुक्यात भूजल पातळी वाढलेली आहे. त्यात खान्देशातील जळगाव जिल्ह्यातील १५, नंदुरबार जिल्ह्यातील २ आणि धुळे जिल्ह्यातील १ अशा एकूण १८ तालुक्यांचा समावेश आहे.

Khandesh-Khabarbat-512x395

राज्यात देवेंद्र फडणवीस सरकारने गेल्या २ वर्षांपासून जलयुक्त शिवार योजना सुरू केली आहे. पाणी अडवा - पाणी जिरवा या जुन्या योजनेचेच हे नवे रुप आहे. नदी किंवा नाला खोलीकरण, तलाव रुंद करणे, गाळा काढणे, चर खोदणे अशी कामे ग्रामस्थ किंवा स्वयंसेवी संस्थाच्या सहभागातून विविध सरकारी यंत्रणा करुन घेत आहेत. गेल्या पावसाळ्यात अशा कामांमुळे बहुतांश ठिकाणी पावसाचे पाणी साठवले गेले व जमिनीतही जिरले. त्याचा सकारात्मक परिणाम आता निरीक्षण विहिरींमधील भूजल पातळीच्या अहवालातून समोर आला आहे.

जलयुक्त शिवार योजनेत जळगाव जिल्ह्याने पहिल्यापासून आघाडी घेतली होती. यात जिल्हा महसूल व जिल्हा परिषद प्रशासनाची भूमिका सक्रिय राहिली. जळगाव जिल्ह्यातील जलयुक्त शिवारची कामे पाहण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्वप्रथम दौरा केला. त्यानंतर प्रशासनाने जलयुक्तची कामे पूर्ण करण्यासाठी घेतलेली मेहनत कामी आल्याचे आता दिसत आहे.

जळगाव जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेत सन २०१५ -१६ मध्ये २३२ गावे निवडण्यात आली होती. त्यातीळ २३२ गावांमध्ये ३७ हजार २१८.२५ हेक्टर क्षेत्रावर ७,३१६ कामे सुरु झाली होती. त्यापैकी ७,१३८ कामे पूर्ण झाली. १७८ कामेही प्रगतिपथावर आहेत. सन २०१६ -१७ साठी २२२ गावांची निवड झाली असून सर्व गावांचे आराखडे मंजूर करण्यात आले आहेत. या कृति आराखड्यात ३२,३९५.३४ हेक्टर क्षेत्रावर ७,५२९ कामे होणार आहेत.

गतवर्षी पूर्ण झालेल्या कामांमुळे जळगावसह धरणगाव, एरंडोल, भडगाव, चाळीसगाव, भुसावळ, रावेर, मुक्ताईनगर, जामनेर, चोपडा, अमळनेर, पारोळा व पाचोरा अशा सर्वच तालुक्यात भूजल पातळी वाढली आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील ५ तालुक्यातील ७२ गावांचा या योजनेत समावेश होता. प्रत्यक्षात ७६ गावांमधून योजनेचे काम सुरु झाले. या योजनेत जवळपास ११७ कामे सुरु झाली. त्यातील बहुतांश कामे पूर्ण झाली आहे. या शिवाय, नंदुरबार जिल्हा नियोजन समितीने २.५ टक्के निधी देवून काही कामे प्रस्तावित केली होती.

नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी ५० टक्केपेक्षाही कमी पाऊस झालेला आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यावर पाणी टंचाईचे संकट राहणार आहे. अशाही स्थितीत नंदुरबारसह धडगाव तालुक्यात काही ठिकाणी पाण्याची पातळी वाढलेली आहे. ही बाब समाधानकारक आहे.

धुळे जिल्ह्यातही पावसाचे प्रमाण कमीच राहिले. त्यामुळे तेथेही आगामी काळ पिण्याच्या पाण्यासाठी संकटाचाच असेल. धुळे जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेत सन २०१५ -१६ वर्षात १२९ गावांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी ६६ गावामधील कामे शंभर टक्के पूर्ण झाली. उर्वरित कामे प्रगतीत आहेत. सन २०१६- १७ साठी १२३ गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांमध्ये १४४ कामे पूर्ण झाली असून ७३६ कामे प्रगतीपथावर आहेत. भूजल अहवालाचा विचार करता धुळे जिल्ह्यातील केवळ साक्री तालुक्यात पाणी पातळी वाढलेली दिसते.

जलयुक्त शिवार योजनेत जळगाव जिल्ह्याने भरारी घेतली. जिल्हा प्रसासन व जिल्हा परिषद यंत्रणेने यात सक्रिय सहभाग घेतला. त्याचा समाधानकारक निष्कर्ष समोर दिसत आहे. आगामी काळात इतर जिल्ह्यातही जलयुक्त शिवार योजनांची कामे पूर्ण करण्याकडे संबंधित यंत्रणांनी व ग्रामस्थांनी लक्ष द्यायला हवे.

खान्देश खबरबातमधील याआधीचे ब्लॉग :

खान्देश खबरबात : खान्देशच्या औद्योगिक विकासाकडे लक्ष हवे!


 खान्देश खबरबात : जळगाव, धुळे मनपात अमृत योजनांचे त्रांगडे

खान्देश खबरबात : कराच्या रकमेत धुळे, जळगाव मनपा काय करणार?

खान्देश खबरबात : करदाते वाढवण्यासाठी गनिमीकावा

खान्देश खबरबात : खान्देशात पालिका निवडणुकांत खो खो…

खान्देश खबरबात : ‘उमवि’त डॉ. पी. पी. पाटील यांची सन्मानाने एन्ट्री

खान्देश खबरबात: उसनवारीच्या पालकमंत्र्यांमुळे प्रशासन खिळखिळे… !!!

खान्देश खबरबात: मुख्यमंत्री जळगावसाठी उदार झाले…

खान्देश खबरबात: खान्देशात डेंग्यूचा कहर

खान्देश खबरबात : सारंगखेडा फेस्टिव्हल

खान्देश खबरबात : जळगावच्या राजकारणात अस्वस्थ खामोशी!

खान्देश खबरबात : खान्देशी काँग्रेस गलितगात्र

खान्देश खबरबात : गाईंना कत्तलखान्यात पाठवणारे कोण असतात?

खान्देश खबरबात : पोषण आहार घोटाळ्याचे रॅकेट

खान्देश खबरबात : वैद्यकीय सेवा महागणार, IMA चा इशारा

खान्देश खबरबात : पर्यटन विकासाला संधी

खान्देश खबरबात : पावसाची पाठ, शेतकरी चिंतेत

शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV