घुमक्कडी : धरतरी माझी मायु रं, तिच्यावं पाय कसा मी ठेवू रं

घुमक्कडी : धरतरी माझी मायु रं, तिच्यावं पाय कसा मी ठेवू रं

पृथ्वीची अनेक नावं आहेत... वसुंधरा, धरती, मेदिनी, पावनी, अवनी, उर्वी, रसा, पृथा. त्यातलं पृथ्वी हे नाव ‘पृथू’ या पृथ्वीच्या पहिल्या राजावरून पडलेलं आहे. ते कसं, त्याची एक गोष्ट आहे. सहावा मनु चाक्षुष याचा नातू वेन. तो दुष्ट आणि शक्तीचा दुरुपयोग करुन लोकांना छळणारा होता. ऋषींनी विद्रोह करुन त्याला नष्ट केलं. तेव्हा त्याच्या डाव्या भुजेतून निषाद जन्मला; तो आदिम जमातींचा पूर्वज मानला जातो. उजव्या भुजेतून ‘पृथू’ जन्मली. त्या काळात समाज विस्कळीत होता. पशुपालन आणि शेती यांची सुरुवात तर झाली होती; पण अज्ञानाने लोक नुकसानच जास्त करुन ठेवत. त्या शोषणाने त्रासून दु:खी झालेल्या पृथ्वीने गायीचं रुप घेतलं आणि ती ‘तिन्ही लोकां’त इतस्तत: पळू लागली. ‘पृथू’ धनुष्यबाण घेऊन तिच्या मागे लागला. मात्र आपल्याला मारलं तर सर्व समाजच नष्ट होईल, हे तिनं सांगितलं. पृथुने तिला आपली मुलगी मानलं आणि तिची नीट काळजी घेतली जाईल, तिच्यावर अत्याचार होणार नाहीत असं वचन दिलं. ‘पृथू’ कृषिविद्येचा संशोधक होता, असा उल्लेख अथर्ववेदात आहे. तो पहिला अभिषिक्त राजा असल्याचं शतपथ ब्राह्मणात म्हटलं आहे.

earth 1

पृथ्वी कशी निर्माण झाली हे सांगणारी एक सुंदर संथाळी लोककथा आहे. २२ एप्रिल या ‘वसुंधरा दिना’च्या निमित्ताने ती आठवली. कथा अशी आहे.....
त्या काळात सगळीकडे फक्त पाणीच पाणी होतं. काही भागातलं पाणी स्वच्छ होतं आणि काही भागातलं मळकट. तेव्हा आकाशदेखील खूप खाली होतं. ‘ठाकुरजी’ आणि त्यांची पत्नी ठाकुराइन आकाशात राहत. अंघोळ करण्यासाठी ते तोडे -सुतम वरुन, म्हणजे एका काल्पनिक धाग्यावरून पाण्यात उतरुन येत आणि अंघोळ झाली की, आभाळात परतून जात. एके दिवशी ठाकुराइनच्या मानेखालच्या हाडाशी जास्त मळ साचला होता. तो धुऊन टाकण्याऐवजी तळव्यावर घेऊन ती मळत राहिली. त्यातून दोन पक्षी बनले. अत्यंत देखणे, मधुर गाणे गाणारे पक्षी पाहून हे जिवंत करावेत असा ठाकुराइनला मोह झाला. तिने ठाकुरजींना तशी विनंती केली.

पत्नीची विनंती म्हणजे आज्ञाच असते, हे मानून ठाकुरजींनी त्या दोन्ही पक्ष्यांमध्ये प्राण फुंकला.
शरीरात प्राण येताच दोन्ही पक्षी आभाळात इकडे-तिकडे भराऱ्या मारत उडू लागले. बराच काळ उडल्यावर ते थकले, पण त्यांना बसायला कुठे जागाच नव्हती. चहूकडे फक्त पाणीच पाणी दिसत होतं. मग ठाकुराइन त्यांना म्हणाली, "माझ्या खांद्यावर बसत जा!"
मग कधीही उडून थकले की ते ठाकुराइनच्या खांद्यावर बसून विश्रांती घेऊ लागले.
दोघंही ठाकुराइनच्या हँसली हड्डीच्या म्हणजे मानेच्या हाडाच्या मळापासून बनले होते, त्यामुळे त्यांची नावं हाँस-हाँसिल (हंस-हंसिनी) अशी पडली. उजव्या बाजूच्या हाडाच्या मळापासून बनलेला नर आणि डाव्या बाजूच्या हाडाच्या मळापासून बनलेली मादी अशी ही जोडी सर्वदूर मुक्त विहरु लागली.
एके दिवशी सिंगबोंगा (सिंग नावाचा देव) चा सिंगसदोम (दैवी घोडा) पाणी पिण्यासाठी आकाशातून खाली आला. तेव्हा त्याच्या तोंडातून निघालेला फेस पाण्यावर तरंगू लागला.
ठाकुरजींनी पाहिलं, तेव्हा त्यांनी पक्ष्यांना आज्ञा दिली की, "तुम्ही त्या फेसावर जाऊन बसा."
earth 2

त्यांच्या आज्ञेनुसार पक्षी फेसावर जाऊन बसले. पण फेसावर किती काळ बसणार? तो तर काही काळाने विरुन गेला असता.
तेवढ्यात अंघोळ करणाऱ्या ठाकुराइनचे काही केस तुटून पाण्यात पडले. त्यातून सिरम दंधी - बिरना/जलवेली निर्माण झाल्या. त्या पाण्यावर तरंगत राहत. पक्षी आता त्या वेलींवर राहू लागले. मग ठाकुरजींनी पाण्यावर करम वृक्ष निर्माण केला. जलवेली वाहत वृक्षाला जाऊन अडकल्या. पक्ष्यांनी जलवेलींपासून त्या वृक्षावर आपलं घरटं बनवलं. काही दिवसांनंतर हंसिनीनं त्या घरट्यात दोन अंडी घातली. हे पाहून ठाकुर-ठाकुराईन खूप आनंदी बनले.
पण आता ठाकुराईनला निराळीच काळजी वाटू लागली. पाण्यातले जीव ही अंडी खाऊन टाकतील, या कल्पनेने ती चिंताग्रस्त झाली. मग ठाकुरजी त्या अंड्यांची राखण करू लागले.
काही काळानंतर त्या अंड्यांमधून दोन जीव जन्मले. ते मानवाकृती होते. मोठे झाल्यावर ते घरट्यात मावू शकणार नव्हते. ही मुलं कुठं व कशी सुरक्षित ठेवायची, या भयानं पक्षी विलाप करु लागले.
त्यांचा विलाप ऐकून ठाकुरजी काळजीत पडले. त्यांनी अस्वच्छ पाण्यात मिसळलेले मातीचे कण वेगळे करुन एक जागा बनवण्याचा निर्णय घेतला आणि पाण्यात राहणाऱ्या सर्व जीवांना मातीचे कण गोळा करुन आणण्याचं काम दिलं.
प्रथम खेकड्याने आपल्या नांगीने माती गोळा करण्याचा प्रयत्न केला, पण ती पाण्याच्या पृष्ठावर आणण्याआधीच पाण्यात विरघळून गेली. खेकडा अयशस्वी ठरला.
मग मासे, मगरी, सुसरी अशा बाकी जलचरांनीही प्रयत्न केले. पण त्यांनाही यश मिळालं नाही. मग गांडुळाची पाळी आली. तो म्हणाला, "मी माती तर वर आणू शकेन, पण ती वर आणून ठेवायची कुठे? तुम्ही आधी कासवाला पृष्ठावर येऊन थांबायला सांगा."
earth 3

मग कासवाला पृष्ठावर आणलं गेलं. त्याने जास्त हालचाल करु नये, म्हणून त्याचे तीन पाय बांधून ठेवण्यात आले. मग गांडुळाने माती जमवायला सुरुवात केली. तोंड पाण्यात आणि शेपटी कासवाच्या पाठीवर ठेवली. तोंडात माती भरुन शेपटीकडून कासवाच्या पाठीवर माती टाकत टाकत त्याने कासवाच्या पाठीवर पुष्कळ माती जमा केली.
ठाकुरजींनी माती समतल केली. तरी काही जागा उंच राहिल्या, त्यांचे पहाड बनले. काही जागा खोल राहिल्या, त्यात पाणी साचून नद्या, सरोवरं, तळी बनली. मग सिरम दंधी आणि करम वृक्ष तिथं तरंगत आले आणि रुजले.
ठाकुरजी पक्ष्यांना म्हणाले, "आता तुम्ही तुमच्या मुलाबाळांसह या पृथ्वीवर राहा."
हंस-हंसिनी आपल्या मुलांना घेऊन प्रथम पृथ्वीवर आले, त्या स्तराचं नाव होतं - हिहिड़ी -पीपीडी. त्यांची मुलं पिलचू दांपत्य म्हणून ओळखली जाऊ लागली. त्यांच्यापासून मानव वंशाची वृद्धी झाली, तेच 'संथाळ' जमातीचे लोक होत.

earth 4

सर्वच आदिवासी जमातींच्या पृथ्वीविषयीच्या भावना, विचार आणि कल्पना बाकी समाजाहून फार निराळ्या आहेत. आनंदाने नाचण्याआधीही ‘धरतरी माझी मायु रं, तिच्यावं पाय कसा मी ठेवू रं’ म्हणत तिची परवानगी घेऊन तिच्या पाठीवर पाय टेकवणारी ही माणसं म्हणूनच अधिक आपली, अधिक जवळची वाटतात.

घुमक्कडीमधील याआधीचे ब्लॉग :


घुमक्कडी (37) : कार्तिकेयाचं मंदिर आणि चैत्रातली जत्रा


घुमक्कडी (36) : इसामई काला लगी सोना


घुमक्कडी (35) : सुपारी माझी आईबाई !


घुमक्कडी (34) : लोकल दारवा आणि चखणे!


घुमक्कडी (33) : रहिमन पानी राखिये, बिन पानी सब सून


घुमक्कडी (32) : सर्वांत स्वच्छ गावं


घुमक्कडी (31) : जीवट डोकऱ्या माशाची गोष्ट!


घुमक्कडी (30) : पलाशधगधगती अग्निफुले


घुमक्कडी (29) : एको आणि नार्सिसस


घुमक्कडी (28) : तू-ती आणि रेशमी प्रेमाचा लोचा


घुमक्कडी (27)  भई जब लाखो उदला वायरो


घुमक्कडी (26): महुआ बीने दोहर होये जाय


घुमक्कडी (25): साकाचं बेट


घुमक्कडी (24) : कार निकोबार आणि नारळ


घुमक्कडी (23) लावण्याची देवता आणि प्रलय


घुमक्कडी (22) : त्यांना दुसरे हृदय दे, वा मला वेगळी भाषा!


घुमक्कडी (21) : सतगुरु सिंवरो मोवण्या, जिण ओ संसार उपायो


घुमक्कडी (20): सात जिभांचा अग्नी आणि पुलोमाचे अश्रू


घुमक्कडी : (19) : जे तुमच्याकडे नाही, ते माझ्याकडे आहे!


घुमक्कडी : (18) : जिवंत होणारी चित्रं


घुमक्कडी : (17) : कुरजां ऐ म्हारा भंवर मिला दीजो ऐ


घुमक्कडी (16) : निंदिया सतावे मोहे


घुमक्कडी (15) : बगळ्या बगळ्या कवडी दे


घुमक्कडी : (14) उडणाऱ्या देवदूतांचा महाल!


घुमक्कडी (13) : सांवरे अई जइय्यो जमुना किनारे


घुमक्कडी (12) : आईच्या आधी लेकीला न्हाण आलं हो…!


घुमक्कडी (11) : इज्जत जाईल, पण प्रियकर राहील!


घुमक्कडी (10) : तुमच्या हातात एक फूल दिलं, तर… 


घुमक्कडी (9) : सासू-सुनांच्या विहिरी आणि तळी


घुमक्कडी (8) : फूल जंगल मे खिले किन के लिये


घुमक्कडी (7) : हुंकारकुपातले हरिण


घुमक्कडी (6) : वेगळ्या जागेवरून पाहताना


घुमक्कडी (5) : मिठाचा शुभ्र खारट खडा!


घुमक्कडी (4) साता प्रश्नांची कहाणी


घुमक्कडीः (3) न नींद नैना, ना अंग चैना


घुमक्कडी : (2) सीतेची तहान


घुमक्कडी : आभाळाचा कागद, समुद्राची शाई

शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: Ghumakkadi Kavita Mahajan
First Published:
LiveTV