खान्देश खबरबात : कागदोपत्री आपत्ती व्यवस्थापन उघडे !

खान्देश खबरबात : कागदोपत्री आपत्ती व्यवस्थापन उघडे !

पावसाळा सुरु झाला. जूनच्या पहिल्या आठवड्यात धुळे जिल्ह्यात गारपीट झाली. 7 जूनला धुळे, नंदुरबारसह जळगाव जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. पहिल्या पावसानंतर जे दरवर्षी घडते तेच घडले. जळगाव व धुळे शहरात रस्त्यांवर पाणी तुंबले. नालेसफाई झालेली नसल्यामुळे इतर ही प्रसंग उद्भवले. जळगाव शहरात महावितरणच्या बेपर्वाईचे धिंडवडे निघाले. उन्हाळ्यात शहरात भारनियमनचा फारसा त्रास झाला नाही पण पहिल्या पावसाने महावितरणचे आपत्ती व्यवस्थापन पार मोडीत काढून संपूर्ण शहराची बत्ती गूल झाली. शहरातील पाणीपुरवठा आठवडाभर विस्कळीत झाला. गल्लोगल्ली पाणीपुरवठ्याचे टँकर दिसू लागले. मतदारांसाठी काहीतरी काम करण्याची संधी नगरसेवकांना मिळाली. सरकारी छाप कागदोपत्री आपत्ती व्यवस्थापन उघडे पडले.

जळगाव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक  23 मे रोजी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली आहे. त्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी जळगावातील वीज पुरवठा व नाले सफाई या दोन विषयांचे नियोजन किती बेभरवशाचे आहे हे सिध्द झाले. कोणत्याही प्रकारची आपत्ती उद्भवल्यास त्याचे निवारण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी सज्ज राहण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली होती. त्यानंतरही काय घडले ? हा अनुभव लक्षात घेवून महावितरण व मनपाला जिल्हाधिकारी जाब विचारतील का ? हा प्रश्न आहे.

धुळे जिल्हा आपत्ती निवारण समितीची बैठक 23 मे रोजी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीचा अजेंडा सरकारी छापच होता. आढावा आणि तयारी या नियोजनात केवळ मागील वर्षाची आकडेवारी सुधारित करुन सांगितली गेली. डॉ. पांढरपट्टे यांनी सूचना केली की, आपत्तीच्या काळात शोध व बचावासाठी 43 प्रकारचे साहित्य खरेदी करण्यात आले आहे. ते सुस्थितीत असल्याची खात्री करुन घ्यावी. तसेच त्याचे प्रात्यक्षिक घ्यावे. बैठक होवून 15 दिवसांचा काळ गेला पण प्रात्यक्षिके झाली किंवा नाही याचा खुलासा नाही.

धुळ्यात पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापनात पूरनियंत्रण हा कळीचा मुद्दा आहे. धुळे शहरातून वाहणाऱ्या पांझरानदीची पूररेषा निश्चित नाही. त्यामुळे पांझरा पात्रात किंवा लागून असलेल्या रहिवास व उद्योग व्यवसायांना धोका असल्याचा विषय नेहमी गाजतो. या विषयावर आमदार अनिल गोटेंनी भूमिका मांडली आहे. पण जलसंपदा विभाग आणि मनपा प्रशासन याकडे लक्ष देत नाही. धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील नद्यांचे प्रत्यक्ष सर्व्हेक्षण व तांत्रिक अभ्यास करुन उपग्रहामार्फत जीपीएस पध्दतीने पूररेषा, महत्तम पूररेषा निश्चित होणार होती. त्याचे पुढे काय झाले ? हे गुलदस्त्यात आहे.

नंदुरबार जिल्हा आपत्ती निवारण समितीची बैठक 1 जुन रोजी जिल्हाधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीचाही अजेंडा मागील पानावरुन पुढे असाच आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी एक सूचना केली आहे. ती म्हणजे, रात्रीच्यावेळी देखील सर्व विभाग प्रमुख व त्यांच्या अधिनस्थ अधिकारी व कर्मचारी यांनी आपापले मोबाईल सुरु ठेवावेत व ते उचलावेत. हा आदेश देण्याची आवश्यकता का निर्माण झाली असावी ? याचे थेट उत्तर आहे की, कार्यालयीन वेळेत संबंधित मंडळी मोबाईल वरील कॉल घेत नाहीत. तेव्हा ड्युटीवर नसताना मोबाईल वरील कॉल ते घेतील की नाही ही शंकाच आहे.

दरवर्षी जिल्हाधिकारी मे महिन्यात किंवा जुनच्या पहिल्या आठवड्यात आपत्ती निवारण समितीच्या बैठका घेतात. या बैठकांचे स्वरुप सरकारी छाप असते. मागील वर्षाची तयारी आणि संभाव्य तयारी यात बहुतांश आकडेवारी तीच असते. काही वेळा अधिकाऱ्यांची नावे बदलतात. जिल्हा माहिती कार्यालयाकडून बैठकांच्या बातम्या दिल्या जातात. त्याचा आशयही वर्षानुवर्षे तोच असतो. प्रत्यक्षात जेव्हा नाले, नद्यांचे पूर, अतिवृष्टी, घरे कोसळणे, वाहतूक ठप्प, वीज बंद असे प्रकार घडतात तेव्हा आपत्ती निवारण होते की नाही ? हा प्रश्न पडतो. आपत्ती निवारणाच्या दृष्टीने एखाद्या ठिकाणी मॉक ड्रील झाल्याचे काही वाचनात येत नाही.

आपत्ती व्यवस्थापनाचा संबंध प्रामुख्याने महसूल विभाग, महानगरपालिका/नगरपालिका, जिल्हा पोलीस अधीक्षक, पोलीस विभाग, जिल्हा होमगार्ड समादेशक, जिल्हा शल्य चिकीत्सक व आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, दूरसंचार विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, राज्य परिवहन महामंडळ, पाटबंधारे विभाग, उपप्रादेशिक परिवहन विभाग यांच्यासह अन्य शासकीय विभागांशी येतो. या सर्वांचे नेतृत्व जिल्हाधिकारी करतात. आपत्ती निवारण समितीने संभाव्य गरज लक्षात घेवून पर्जन्यमापके, बोटी, पोहणारे, मदत पथके याचा आढावा घ्यायचा असतो. प्रत्येक विभागाने स्वतंत्रपणे आपत्ती निवारण आराखडा तयार करायचा असतो. यानुसार कागदावर सारे काही तयार होते. पण त्याची उपयुक्तता, व्यवहार्यता व गुणवत्ता तपासण्यासाठी सराव कवायत झाल्याचे अगदीच अपवादाने दिसते. यंत्रणा आहे पण ती खरोखर आपत्ती स्थळी पोहचते का आणि अपेक्षित काम करते का ? हे सातत्याने तपासणे आवश्यक असते. तसे होत नाही म्हणूनच प्रत्यक्ष आपत्तीच्यावेळी नियोजनातील दोष उघडे पडतात.

यावर्षीही जुनच्या पहिल्या आठवड्यातील पावसामुळे जळगाव शहरासह धुळे, नंदुरबार शहरे आणि इतर ठिकाणच्या नाले सफाईचा विषय चर्चेत आला आहे. जळगाव मनपा आयुक्त जीवन सोनवणे यांनी नालेसफाई कामाची चौकशी करु असे म्हटले आहे. पावसाळ्याच कारवाई हवी की चौकशी ? हाच मुद्दा प्रशासन समजून घेत नाही. या बरोबराच वीज मंडळाने दगा दिल्यामुळे जळगाव शहरातील पाणीपुरवठा आठवडाभर विस्कळीत झाला आहे. आता याची चौकशी कोण करणार ?

जिल्हास्तरावरील आपत्ती निवारण समित्यांच्या बैठका या म्हणजे दरवर्षीचा सोपस्कार असतो. आपत्ती निर्माण होवून गैरसोय झाली की चौकशीचा प्रकार हा वराती मागून घोडे असा असतो. आपत्ती ही नैसर्गिक असते आणि तीला नागरिक सामोरे जातात. ही बाब लक्षात घेवून आपत्ती व्यवस्थापनातही नागरी सहभाग वाढवायला हवा. जळगाव शहरात रेडक्रॉस सोसायटीने या पध्दतीने प्रयत्न केले आहेत.

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय आपत्ती निवारण कक्ष

टोल फ्री क्रमांक 1077

दूरध्वनी 0257-2217193/2223180

नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालय आपत्ती निवारण कक्ष

दूरध्वनी 02564-210006,

पोलीस नियंत्रण कक्ष दूरध्वनी 02564-210001

मुख्य अभियंता तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगाव दूरध्वनी 0257-221142

खान्देश खबरबात’ सदरातील याआधीचे ब्लॉग :

खान्देश खबरबात : शेतकरी संपाने खान्देशला काय दिले ?

खान्देश खबरबात : आदिवासींचा विकास घोटाळ्यातच!

खान्देश खबरबात : हैदोस घालणारा “दादा” समर्थक!

खान्देश खबरबात : खान्देश होणार मेडिकल हब !


ब्लॉग : जळगाव जिल्हा परिषदेत ‘काँग्रेसयुक्त’ भाजप


आमदार निलंबन की मॅच फिक्सिंग !


खान्देश खबरबात : डॉक्टरांना सामाजिक व कायदेशीर संरक्षण हवेच !


यशवंतराव ते पर्रिकर व्हाया पवार !


खान्देश खबरबात : जलसंपदा मंत्र्यांच्या तालुक्यात होणार विक्रमी शेततळी 


खान्देशवासी मोकाट कुत्र्यांनी त्रस्त


खानदेश खबरबात: जळगावात समांतर रस्त्यांचा प्रश्न सार्वजनिक अजेंड्यावर


खान्देश खबरबात : जळगावसह धुळ्यात हॉकर्सचा प्रश्न कळीचा !!


खान्देश खबरबात : खान्देशात वाढतेय रनिंग, सायकलिंग कल्चर


खान्देश खबरबात : अवैध धंद्यांसाठी खान्देश नंदनवन


खान्देश खबरबात : पालकत्व हरवलेले तीन जिल्हे


खान्देश खबरबात : खान्देशातील आरोग्य यंत्रणा सुधारणार


खान्देश खबरबात : वाघुर, अक्क्लपाडा प्रकल्पांची कामे गती घेणार


खान्देश खबरबात : खान्देशात भूजल पातळीत वाढ


खान्देश खबरबात : खान्देशच्या औद्योगिक विकासाकडे लक्ष हवे!


खान्देश खबरबात : जळगाव, धुळे मनपात अमृत योजनांचे त्रांगडे


खान्देश खबरबात : कराच्या रकमेत धुळे, जळगाव मनपा काय करणार?


खान्देश खबरबात : करदाते वाढवण्यासाठी गनिमीकावा


खान्देश खबरबात : खान्देशात पालिका निवडणुकांत खो खो…


खान्देश खबरबात : ‘उमवि’त डॉ. पी. पी. पाटील यांची सन्मानाने एन्ट्री


खान्देश खबरबात: उसनवारीच्या पालकमंत्र्यांमुळे प्रशासन खिळखिळे… !!!


खान्देश खबरबात: मुख्यमंत्री जळगावसाठी उदार झाले…


खान्देश खबरबात: खान्देशात डेंग्यूचा कहर


खान्देश खबरबात : सारंगखेडा फेस्टिव्हल


खान्देश खबरबात : जळगावच्या राजकारणात अस्वस्थ खामोशी!


खान्देश खबरबात : खान्देशी काँग्रेस गलितगात्र


खान्देश खबरबात : गाईंना कत्तलखान्यात पाठवणारे कोण असतात?


खान्देश खबरबात : पोषण आहार घोटाळ्याचे रॅकेट


खान्देश खबरबात : वैद्यकीय सेवा महागणार, IMA चा इशारा


खान्देश खबरबात : पर्यटन विकासाला संधी


खान्देश खबरबात : पावसाची पाठ, शेतकरी चिंतेत 

शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV