खान्देश खबरबात : दारु दुकाने बचावचा जळगाव पॅटर्न

खान्देश खबरबात : दारु दुकाने बचावचा जळगाव पॅटर्न

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला दिलेल्या आदेशानुसार राज्यातील 4 हजार 813 किलोमीटर राष्ट्रीय महामार्गावरील जवळपास 4,500 दारुची दुकाने व बिअरबार दि. 1 एप्रिल 2017 पासून बंद झाली आहेत. या कार्यवाहीमुळे राज्य सरकारला दारु विक्रीतून वर्षाला मिळणारे 20 हजार कोटी रुपयांचे उत्पादन शुल्क घटून निम्म्यावर येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश तसा राज्य सरकारचे महसुली उत्पन्न घटविणारा आहे.

महाराष्ट्रात दरवर्षी जवळपास 15 हजार जणांचा महामार्गांवरील वाहनांच्या अपघातात बळी जातो. त्यात मुंबई- गोवा, मुंबई- नागपूर, मुंबई- आग्रा, धुळे- सोलापूर आणि पुणे- बंगळुरु या महामार्गांवर होणाऱ्या अपघातांची संख्या जास्त आहे. या अपघातांच्या मागील एक कारण अवजड वाहनांचे बहुतांश चालक रात्री दारूच्या नशेत वाहने अती वेगात पळवतात. त्यामुळे होणाऱ्या अपघातात शेकडो लोकांचे बळी जातात, हे आहे. हीच बाब लक्षात घेवून सर्वोच्च न्यायालयाने महामार्गलगत 500 मीटर परिसरातील दारु दुकाने व बिअरबारला बंदीचे आदेश दिले आहेत. त्याची कार्यवाही खान्देशात सुरू झाली आहे.

धुळे व नंदुरबार जिल्ह्यात दि. 1 एप्रिल 2017 पासून जवळपास 361 दारु दुकाने, बिअरबार बंद झाले आहेत. पण, जळगाव शहराचे भाजपचे आमदार सुरेश उर्फ राजूमामा भोळे यांनी जळगावात दारुची दुकाने व बिअरबारला संरक्षण देण्याचे चलाखीने नियोजन केले आहे. एका रात्रीत राष्ट्रीय व राज्य महामार्गांचे हस्तांतरण हे स्थानिक स्वराज्य संस्था मनपाकडे करण्याचा चमत्कार त्यांनी केला आहे. त्यामुळे जळगाव शहरात पूर्वीच्या महामार्गलगतची दारु दुकाने जैसे थे आहेत. हा चमत्कार घडवणारे आमदार भोळे राज्यभरात लक्षवेधी ठरले आहेत.

धुळे जिल्ह्यात महामार्गावरील देशी- विदेशी दारुविक्रीची जवळपास 326 दुकाने होती. त्यापैकी नियम लागू होणारी 260 दुकाने बंद करण्यात आली आहेत. यात धुळे शहराच्या लगत 60 दुकाने आहेत. बंद केलेल्या दुकानदारांकडील दारुचा स्टॉक सील करण्यात आला आहे. उर्वरित 66 दुकानांच्या परवान्यांचे नुतनिकरण करण्यात आले आहे.

नंदुरबार जिल्ह्यात महामार्ग लगतची 101 दारु विक्रीची दुकाने व बिअरबार बंद करण्यात आले आहेत. नंदुरबार हे शहर पूर्वी गवळी राजांचे शहर होते. तेथे दुधाचा महापूर असायचा. गेल्या 20 वर्षांत नंदुरबारची ओळख दारूचे शहर अशी झाली. तेथे गल्लीबोळात आणि एकमेकांना खेटून बिअरबार सुरू झाले. महामार्ग लगतची दारु दुकाने बंद झाल्याचा फटका जवळपास 100 दुकानदारांना बसला आहे. यात राष्ट्रीय महामार्गावर 20 तर राज्य महामार्गावर 81 बिअरबार व दारू दुकाने आहेत.

नंदुरबार जिल्ह्यातून 4 राज्य मार्ग व 1 राष्ट्रीय महामार्ग जातो. गेल्या दीड वर्षातील अपघातांची संख्या लक्षात घेता 80 टक्के अपघात हे या 5 महामार्गावर झालेले दिसतात. त्यात जवळपास 122 जणांचा बळी गेला आहे. 800 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. सर्वाधिक अपघात प्रवण क्षेत्र हे कोंडाईबारी ते नवापूर व वडाळी ते अक्कलकुवा हे क्षेत्र ठरले आहेत.

धुळे व नंदुरबार जिल्ह्यात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महामार्गालगतची दारु दुकाने बंद झाली. तेथील आमदार, खासदार किंवा इतर लोकप्रतिनिधींनी यासाठी विरोधाची कोणताही हालचाल केली नाही. पण जळगावचे आमदार भोळे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात महामार्गांचे हस्तांतरण एका रात्रीत स्थानिक मार्गात करुन आपली व इतरांची दारु दुकाने वाचवून जळगाव शहरातील दारु दुकानदारांसाठी सरंभकाची भूमिका निभावली आहे. आमदार भोळेंचा हा रस्ते हस्तांतरणाचा फॉर्म्यूला इतर लोकप्रतिनिधी अनुकरणात आणण्याची शक्यता आहे.

जळगाव शहरात जवळपास 150 व जिल्ह्यात 600 वर दारू दुकाने व बिअरबार आहेत. त्यापैकी जळगाव शहरात राष्ट्रीय महामार्गावर अयोध्यानगर ते खोटेनगर या 7 कि. मी. च्या अंतरात 23 दारू दुकाने आहेत. यात स्वतः आमदार भोळेंची आणि त्यांच्या गोतावळ्यातील अनेकांची दारु दुकाने आहेत. या सर्वांना आमदार भोळेच्या हातचलाखीने अभय मिळवून दिले आहे.

आमदार भोळेंनी असे काय केले की, जळगाव शहरात महामार्ग लगत एकही दारु दुकान बंद झाले नाही ? आमदार भोळेंनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सन 2001 मधील एका परिपत्रकाचा आधार घेतला. त्या पत्रकात म्हटले होते की, ज्या शहरांमध्ये वळण रस्त्यांची बांधकामे झालेली असतील तेथे शहराच्या हद्दीत असलेले दोन्ही महामार्ग अवर्गीकृत (डिनोटीफाइड) करून स्थानिक मनपा किंवा नगरपालिकांकडे हस्तांतरित करता येतील.

आमदार भोळे यांनी या परिपत्रकाचा आधार घेवून जळगाव शहराच्या लगतचे महामार्ग रात्रीतून (दि. 31 मार्चला) जळगाव मनपाला वर्ग करुन टाकले. गंमत अशी की, जळगाव मनपा सध्याच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर समांतर रस्त्यांचे बांधकाम करण्यास सक्षम नाही. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात हे समांतर रस्ते तयार करण्याची जबाबदारी मनपाने स्वीकारली होती.

मात्र आता त्या जबाबदारीतून मनपा हात झटकते आहे. विरोधाभासाच्या या पार्श्वभूमीवर आमदार भोळे यांनी मनपाच्या गळ्यात इतर 5 रस्तेही अडकवले आहेत. जी मनपा शहरातील नागरी रस्ते दुरूस्तीसाठी एक रुपया खर्च करु शकत नाही, त्या मनपाला इच्छा नसताना, मनपाच्या पदाधिकाऱ्यांना माहित नसताना नवे रस्ते बाळगावे लागणार आहेत.

आता चर्चा अशीही आहे की, महामार्गालगतची 23 दारु दुकाने वाचविण्यासाठी एका दुकानदार किंवा बार मालकाकडून 50 हजार रुपये गोळा करण्यात आले आणि एकत्र आलेल्या रकमेतून संबंधिताना हिस्सेदारी वाटप झाली. जळगाव शहरातील 23 आणि संपूर्ण जिल्ह्यातून 200 वर दारु दुकानदार तथा बिअरबार मालकांकडून वरीलप्रमाणे वसुली झाल्याचे सांगण्यात येते.

जळगाव महापालिकेकडे चोपडा- भोकर- आमोदा- जळगाव- पाचोरा- वाडी- सातगाव रस्ता राज्यमार्ग क्र. 40 (म्हणजेच शिरसोली रस्ता) पहूर- जळगाव- इंदूर रस्ता (राज्यमार्ग क्र. 42), बांभोरी- निमखेडी- जळगाव- असोदा- भादली (प्रजिमा-59), बांभोरी- निमखेडी- जळगाव- असोदा- भादली (प्रजिमा-59),

जळगाव कलेक्टोरेट रस्ता (प्रजिमा-54) हे अवर्गीकृत घोषित करुन वर्ग केले आहेत. ही कार्यवाही एवढ्या तातडीने झाली की, एकाच दिवसात मंत्रालय व मनपात कागदपत्रांची फाईल फिरली.

जेव्हा आमदार भोळेच्या या चलाखीवर माध्यमे व जळगावकर टीका करायला लागले तेव्हा आमदारांनी रस्ते हस्तांतरणाशी माझी संबंध नाही असा पवित्रा घेतला. जेव्हा माध्यमांनी आमदार भोळे यांचे रस्ते हस्तांतरणसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करणारे दि. 3 मार्च 2017 चे पत्र प्रसिद्ध केले तेव्हा आमदार भोळे तोंडघशी पडले. अर्थात यात जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनीही यात व्यवहार केल्याची शंका आहे. मंत्री पाटील यांनी यावर अद्याप भाष्य केलेले नाही.

काय आहे आमदार भोळेंची चलाखी ?

आमदार भोळे यांनी अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना दि. 3 मार्च 2017 ला दिलेले पत्र आहे. त्यात म्हटले आहे की, जळगाव नगरपालिका हद्दीतील 10.020 किमी लांबीचे राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग दर्जाचे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नगरपालिकेकडे सुधारणा, दुरुस्ती व देखभालीसाठी वर्ग करण्यात आले आहेत. हे रस्ते हस्तांतरणासाठी नगरपालिका जळगाव यांनी ठराव क्र. 251, दि. 1 ऑगस्ट 2001 अन्वये मान्यता दिली आहे. त्यानुसार हे रस्ते दि. 6 मार्च 2002 पासून नगरपालिकेकडे हस्तांतरण झाल्याने व त्यांची देखभाल दुरुस्ती 2002 पासून मनपा करीत आहे. त्यामुळे या रस्त्यांच्या कागदोपत्री मालकीत त्वरित बदल करावा.

यावर दि. 3 मार्च 2017 ला अधीक्षक अभियंता यांनी सविस्तर माहिती मागविली. पुन्हा दि. 8 मार्च 2017 रोजी अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ जळगाव यांनी आमदार भोळे व मंडळ कार्यालयाच्या पत्राच्या अनुषंगाने कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव यांना पत्र देत लोकप्रतिनिधींकडून मागणी झालेली असल्याने प्रथम प्राधान्याने रस्ते दर्जाहीन (मालकी बदलण्याचा) करण्याचा प्रस्ताव सादर करावा, असे आदेश दिले. लगेच दि. 10 मार्च 2017 ला उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्र. १ जळगाव यांना माहिती व प्रस्ताव त्वरित सादर करण्याचे आदेश दिले. दि. 20 मार्च 2017 रोजी मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम, प्रादेशिक विभाग, नाशिक, यांनी शासनास तसेच अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव यांना पत्र दिले.

अधीक्षक अभियंता यांच्याकडून रस्ते मालकी बदलाबाबत प्रस्ताव मागविला. दि. 23 मार्च 2017 रोजी अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव यांनी तातडीने अहवाल पाठवला. तो शासनाकडे सादर करण्यात आला. दि. 31 मार्च 2017 ला सहा रस्ते मनपाकडे वर्ग करती त्यांची मालकी मनपाला दिल्याचा शासन निर्णय जाहीर झाला.

‘खान्देश खबरबात’मधील याआधीचे ब्लॉग :


 

आमदार निलंबन की मॅच फिक्सिंग !

खान्देश खबरबात : डॉक्टरांना सामाजिक व कायदेशीर संरक्षण हवेच !

यशवंतराव ते पर्रिकर व्हाया पवार !

खान्देश खबरबात : जलसंपदा मंत्र्यांच्या तालुक्यात होणार विक्रमी शेततळी 

खान्देशवासी मोकाट कुत्र्यांनी त्रस्त

खानदेश खबरबात: जळगावात समांतर रस्त्यांचा प्रश्न सार्वजनिक अजेंड्यावर

खान्देश खबरबात : जळगावसह धुळ्यात हॉकर्सचा प्रश्न कळीचा !!

खान्देश खबरबात : खान्देशात वाढतेय रनिंग, सायकलिंग कल्चर

खान्देश खबरबात : अवैध धंद्यांसाठी खान्देश नंदनवन

खान्देश खबरबात : पालकत्व हरवलेले तीन जिल्हे

खान्देश खबरबात : खान्देशातील आरोग्य यंत्रणा सुधारणार

खान्देश खबरबात : वाघुर, अक्क्लपाडा प्रकल्पांची कामे गती घेणार

खान्देश खबरबात : खान्देशात भूजल पातळीत वाढ

खान्देश खबरबात : खान्देशच्या औद्योगिक विकासाकडे लक्ष हवे!

खान्देश खबरबात : जळगाव, धुळे मनपात अमृत योजनांचे त्रांगडे

खान्देश खबरबात : कराच्या रकमेत धुळे, जळगाव मनपा काय करणार?

खान्देश खबरबात : करदाते वाढवण्यासाठी गनिमीकावा

खान्देश खबरबात : खान्देशात पालिका निवडणुकांत खो खो…

खान्देश खबरबात : ‘उमवि’त डॉ. पी. पी. पाटील यांची सन्मानाने एन्ट्री

खान्देश खबरबात: उसनवारीच्या पालकमंत्र्यांमुळे प्रशासन खिळखिळे… !!!

खान्देश खबरबात: मुख्यमंत्री जळगावसाठी उदार झाले…

खान्देश खबरबात: खान्देशात डेंग्यूचा कहर

खान्देश खबरबात : सारंगखेडा फेस्टिव्हल

खान्देश खबरबात : जळगावच्या राजकारणात अस्वस्थ खामोशी!

खान्देश खबरबात : खान्देशी काँग्रेस गलितगात्र

खान्देश खबरबात : गाईंना कत्तलखान्यात पाठवणारे कोण असतात?

खान्देश खबरबात : पोषण आहार घोटाळ्याचे रॅकेट

खान्देश खबरबात : वैद्यकीय सेवा महागणार, IMA चा इशारा

खान्देश खबरबात : पर्यटन विकासाला संधी

खान्देश खबरबात : पावसाची पाठ, शेतकरी चिंतेत  

शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV