खान्देश खबरबात : खान्देशात वाढतेय रनिंग, सायकलिंग कल्चर

खान्देश खबरबात : खान्देशात वाढतेय रनिंग, सायकलिंग कल्चर

मुंबई, पुणे, नाशिक किंवा नागपूर सारख्या महानगरांमध्ये निरोगी व सुदृढ आरोग्यासाठी पहाटे वॉकिंग करणाऱ्या नागरिकांचे अनेक गृप दिसतात. काही ठिकाणी रनिंग, सायकलिंग करणारेही असतात. हौशी मंडळी स्विमिंगसाठीही जातात. रक्तदाब, हृदयविकार, अपचन आणि वजन वाढणे आदी दोष कमी करण्यासाठी रनिंग, सायकलिंग व स्विमींगचा नक्कीच फायदा होतो. हे तीनही प्रकार मानवी प्रकृतीसाठी लाभदायक असतानाच ते नियमित व साहसी खेळांचे प्रकारही आहेत. रनिंगसाठी हाफ मॅरेथॉन, मॅरेथॉन होतात. तसेच सायकलिंग व रनिंगसाठी स्पर्धा होतात. परदेशात तर हे तीनही प्रकार मिळून ट्रायथॉन किंवा आर्यनमॅन या प्रकारातील खेळांचे आयोजन सुद्धा होते. या तीनही प्रकारांसाठी सध्या जळगाव व धुळे शहरांमध्ये अनुकूल वातावरण तयार होत आहे. जळगाव येथे आंतराष्ट्रीय आर्यनमॅन कौस्तुभ राडकर आणि अमोद भाटे (दोघेही राहणार पुणे) हे येवून गेले. निमित्त होते जळगाव रनर्स गृपच्या पहिल्या वर्धापनदिनाचे. राडकर आणि भाटे यांनी जळगावकरांना या तीनही खेळांविषयी रंजक आणि शास्त्रशुद्ध माहिती दिली. रनिंग, सायकलिंग व स्विमिंग हे तीनही क्रिडा प्रकार मिळून आर्यनमॅन ही स्पर्धा होते. परंतु अशा तीनही खेळांच्या एकत्रिकरणाला भारतातील ऍथलेटीक्स महासंघ मान्यता देत नाही. त्यांच्यादृष्टीने या तीनही खेळांचे एकत्रिकरण असलेला ट्रायथॉन किंवा आर्यनमॅन हा प्रकार साहसी खेळाचा आहे. त्यामुळे या प्रकाराविषयी लोकांना माहिती होत नाही आणि युवा वर्ग त्याकडे आकर्षित होत नाही. ऑलिम्पिक किंवा आशियायी क्रिडा स्पर्धांमध्ये हे तीनही क्रिडा प्रकार स्वतंत्र आहेत. त्याचे एकत्रिकरण नाही.

राडकर आणि भाटे यांचा मुद्दा हाही होता की, शहरातील लोकांनी रनिंग, सायकलिंग व स्विमींग हे कल्चर ठरवून तयार केले पाहिजे. प्रौढांनी व युवकांनी यात सहभागी होत लहान मुलांमध्ये वयाच्या १५ व्या वर्षापासून आर्यनमॅन किंवा ट्रायथॉनची आवड निर्माण केली पाहिजे. या तीनही प्रकारांचे शास्त्रशुद्ध मार्गदर्शन देले गेले पाहिजे. तसे नाही केले तर याच गोष्टी चुकीच्या पद्धतीने होवून प्रकृती व आरोग्याचे नुकसान होवू शकते. रोज किमान ४५ मिनिटे कोणताही व्यायाम करा, भरपूर शुद्ध हवा घ्या, दिवसभरात योग्य त्या प्रमाणात पाणी प्या, आठवड्यातून किमान ४ दिवस सराव करा, एकमेकांना प्रोत्साहन द्या अशा खुप सोप्या साध्या टीप्स दोघांनी दिल्या.

जळगावकरांसाठी दोघांचा सल्ला खुप महत्त्वाचा आहे. याचे कारण म्हणजे, सुमारे वर्षभरापूर्वी जळगाव येथे ५ ते ७ जणांनी एकत्र येवून जळगाव रनर्स गृप तयार केला. आज त्यात किमान १७० वर सदस्य आहेत. यात महिलांसह लहान मुलांच्या सहभागाची संख्या मोठी आहे. जळगाव रनर्स गृप हा किरण बच्छाव, डॉ. रवी हिरानी, निलेश भांडारकर, नरेंद्रसिंह सोलंकी, विक्रांत सराफ, अविनाश काबरा यांच्यासह इतरांनी एकत्र येवून सुरू केला. संख्या २०, ५०, १०० आणि १५० वर वाढत गेली. गृपचे सदस्य शक्य तो सराव रोज करतात. दर रविवारी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिसरात ६ किलोमीटरची एकत्रित दौड आयोजित केली जाते. नियमित सरावाच्या ऐवजी हा एकत्रित सराव असतो. रनिंगसह आता सायकलिंगही सुरू झाले आहे. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जळगावमधील महिला आता मॅरेथॉनमध्ये धावायला लागल्या आहेत. काही सदस्यांनी मुंबई, बंगळुरू, लेह - लदाख अशा मॅरेथॉन पूर्ण केल्या आहेत. सायकलिंगमध्येही काही जण झेप घेत आहेत. जळगाव रनर्स गृप आता सदस्यांना शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून राडकर आणि भाटे जळगावात येवून गेले.

Khandesh-Khabarbat-512x395

जळगाव रनर्स गृपच्या कार्यक्रमात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरूही प्रा. डॉ. पी. पी. पाटील उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, जळगाव रनर्स गृपच्या पुढाकारात उमवितील मुलांसाठी दरवर्षी मॅरेथॉनचे आयोजन केले जाईल. हा एक चांगला उपक्रम भविष्यात सुरू होवून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे रनिंगकडे लक्ष जाईल.

रनिंग व सायकलिंग कल्चर धुळ्यातही आहे. तेथे धुळे सायकलिस्ट या गृपने गेल्या दोन वर्षांपासून विविध उपक्रम सुरू केले आहेत. मंगेश वर्गे, पराग पाटील, समाधान पवार, अनिल जाधव, दिलीप खोडे, विक्रम राठोड आदींनी एकत्र येवून गृप सुरू केला. तेथेही अगोदर १० – २० जण होते. आता संख्या १६० वर गेली आहे. त्यात १५० जण विविध प्रकारच्या स्पर्धांचे अंतर पूर्ण करणारे आहेत. या गृपचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी सायकलिंगच्या स्पर्धाही घेतल्या आहेत. त्यात धुळे – चांदवड – धुळे, धुळे सेंधवा – धुळे, धुळे – नाशिक – धुळे – शिरपूर – धुळे अशा २००, ३०० व ४०० किलोमीटर अंतराच्या स्पर्धांचा समावेश आहे.

धुळ्याच्या पाठोपाठ नंदुरबार येथेही सायकलिंग कल्चर बहरते आहे. तेथे नंदुरबार सायकल सफारी गृप आहे. या गृपची सुरुवात डॉ. सुनील पाटील यांनी केली. त्यांनी इतरांना सायकलिंगसाठी प्रेरित केले.  त्यांच्यासोबत शहादा, अक्कलकुवा, तळोदा, नंदुरबार येथील बरेच सायकलीस्ट सहभागी होत आहेत. यात डॉ. निकुंज शहा, अमित जैन, निशा जैन, सचिन जमादार, डॉ. सचिन खलाणे, दीपक दिघे, डॉ. बी. एम. जैन,  डॉ. नरेंद्र राठोड आदी गृपचे सक्रिय सदस्य आहेत.

खान्देश खबरबात’मधील याआधीचे ब्लॉग :


खान्देश खबरबात : अवैध धंद्यांसाठी खान्देश नंदनवन


खान्देश खबरबात : पालकत्व हरवलेले तीन जिल्हे


खान्देश खबरबात : खान्देशातील आरोग्य यंत्रणा सुधारणार


खान्देश खबरबात : वाघुर, अक्क्लपाडा प्रकल्पांची कामे गती घेणार


खान्देश खबरबात : खान्देशात भूजल पातळीत वाढ


खान्देश खबरबात : खान्देशच्या औद्योगिक विकासाकडे लक्ष हवे!


 खान्देश खबरबात : जळगाव, धुळे मनपात अमृत योजनांचे त्रांगडे


खान्देश खबरबात : कराच्या रकमेत धुळे, जळगाव मनपा काय करणार?


खान्देश खबरबात : करदाते वाढवण्यासाठी गनिमीकावा


खान्देश खबरबात : खान्देशात पालिका निवडणुकांत खो खो…


खान्देश खबरबात : ‘उमवि’त डॉ. पी. पी. पाटील यांची सन्मानाने एन्ट्री


खान्देश खबरबात: उसनवारीच्या पालकमंत्र्यांमुळे प्रशासन खिळखिळे… !!!


खान्देश खबरबात: मुख्यमंत्री जळगावसाठी उदार झाले…


खान्देश खबरबात: खान्देशात डेंग्यूचा कहर


खान्देश खबरबात : सारंगखेडा फेस्टिव्हल


खान्देश खबरबात : जळगावच्या राजकारणात अस्वस्थ खामोशी!


खान्देश खबरबात : खान्देशी काँग्रेस गलितगात्र


खान्देश खबरबात : गाईंना कत्तलखान्यात पाठवणारे कोण असतात?


खान्देश खबरबात : पोषण आहार घोटाळ्याचे रॅकेट


खान्देश खबरबात : वैद्यकीय सेवा महागणार, IMA चा इशारा


खान्देश खबरबात : पर्यटन विकासाला संधी


खान्देश खबरबात : पावसाची पाठ, शेतकरी चिंतेत      

शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV