सिनेमेनिया : सलमाननंतर आता वरुणचा ‘जुडवा’

जुडवा 2 चा ट्रेलर रीलिज झाला. सव्वा तीन मिनिटांच्या ट्रेलरमध्ये आपल्याला सलमानच्या जुडवाची नक्कीच आठवण येते.

Shishupal Kadam’s blog on Judwa Film Trailer

डेविड धवन आपल्या लाडक्याला सोबत घेऊन आपल्याच हीट चित्रपटाच्या दुसऱ्या अंकासह सज्ज झालेत. वरुण धवन सलमानचा हीट चित्रपट जुडवाचा सिक्वेल घेऊन येतोय.

judwaa 01

जुडवा 2 चा ट्रेलर रीलिज झाला. सव्वा तीन मिनिटांच्या ट्रेलरमध्ये आपल्याला सलमानच्या जुडवाची नक्कीच आठवण येते.. आता यात निर्मात्याचं अपयश म्हणायचं की, लोकांना त्याचं कथानकाला नव्या रुपात दाखवण्यात त्यांना यश आलं का?

judwaa 02

पहिल्या फ्रेमपासून ट्रेलरमध्ये वरुण धवन कसा केंद्रस्थानी आहे हे दाखवले आहे, पण इतके सारे पात्र चित्रपटात कसे बसवलेत हे पाहणं औत्सुक्य़ाचं ठरेल.

judwaa 03

डेविड धवन यांनी चित्रपट दिग्दर्शित केला आहे हे त्यांचे चित्रपट पाहणाऱ्यांना सहज कळेल. ट्रेलरमध्ये कारण बऱ्याच ठिकाणी दी डेविड धवन यांच्या स्पेशल फ्रेम्स दिसतात.

तडक-भडक भूमिका करणारी तापसी पन्नू आपल्याला या चित्रपटात वेगळीचं भूमिका साकारताना दिसतेय. आता प्रेक्षकांना तिची ही अदा किती भावणार लवकरच कळेल.

judwaa 04

वरुण, तापसीसोबत बॉलिवूडची ब्युटी क्वीन जॅकलीन फर्नांडीसही आपल्याला दिसणार आहे. जॅकलीनचा वरुणसोबतचा तिचा दुसरा चित्रपट आहे. ‘डिश्शुम’ चित्रपटात दिसलेली त्यांची केमेस्ट्री इथेही दिसणार का?

judwaa 05

1997 साली आलेल्या सलमानच्या जुवडा चित्रपटानं बॉलीवूडमध्ये लिपलॉकची क्रांतीच घडवली… त्या काळी ते नवीन होतं.. पण आता लिपलॉकच्या सीमा ओलांडून गेलेल्या बॉलिवूडमध्ये प्रेक्षकांना वरुण धवन, तापसू पन्नू आणि जॅकलीनचे लिपलॉक भावणार का? हे येत्या 29 सप्टेंबरलाच कळेल.

जुडवा’चा नवा अंदाज पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा :

याआधीचे ब्लॉग :

सिनेमेनिया : बोस डेड ऑर अलाईव्ह, उत्तर मिळणार?
सिनेमेनिया : अॅक्शन, ड्रामा, रिव्हेंज… संजुबाबा बॅक विथ बँग
सिनेमेनिया : डायलॉग्ज आणि अॅक्शनने पुरेपूर ‘बादशाहो’
सिनेमेनिया : ‘इंदू सरकार’ काँग्रेसविरोधी आहे का?

 

 

News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Shishupal Kadam’s blog on Judwa Film Trailer
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published: