महाडिक निवडणुकीत, तर कार्यकर्ते पैजेत हरले !

By: | Last Updated: > Wednesday, 30 December 2015 12:25 PM
Kolhapur election betting on Satej Patil & Mahadevrao Mahadik

कोल्हापूर : विधानपरिषद निवडणुकीत अत्यंत चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या लढतीत काँग्रेसचे माजी मंत्री सतेज पाटील यांनी बाजी मारली. त्यांनी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार महादेवराव महाडिक यांचा पराभव केला.

 

बंटी पाटील जिंकले असले, तरी शेखर पाटील यांनीही या निवडणुकीत बाजी मारली. कारण त्यांना सतेज पाटील जिंकणारच असा विश्वास होता, त्यामुळे त्यांनी 25 हजार रुपयांची पैज लावली होती.

Satej Patil-compressed

कोल्हापूर विधानपरिषद निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. अत्यंत चुरस आणि खुन्नस भरलेल्या या निवडणुकीत अनेकांनी पैजा लावल्या होत्या.

 

निवडणुकीतील रंगत आणि इर्षा टोकाला पोहचली होती. नेत्यांमध्ये एक-एका मतासाठी संघर्ष सुरु असताना कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता दिसत होती. पैजांच्या माध्यमातून कार्यकर्ते आमनेसामने आले. नेत्यांवरील निष्ठेपोटी मैत्री पणाला लावत कार्यकर्त्यांकडून एक लाखापर्यंतच्या पैजा लावल्या गेल्या.

 

विधानपरिषदेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार महादेवराव महाडिकांचं पानिपत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी एकत्रित राहण्याचा निर्णय घेतला. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं कडवं आव्हान स्वीकारत अपक्ष म्हणून महादेवराव महाडिक यांनी शड्डू ठोकल्याने सतेज पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान उभे राहिले होते.

 

महाडिक यांच्याकडेही काही हुकुमाची पाने असल्याशिवाय ते शड्डू ठोकणार नाहीत. त्यामुळे या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं होतं. दोन्ही उमेदवार तगडे असल्याने एका-एका मतासाठी शेवटपर्यंत झुंजावे लागलं.

 

नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असली तरी त्यांच्यापेक्षा कार्यकर्तेच आक्रमक झाले होते. कोल्हापूर दक्षिण आणि उत्तर मतदारसंघांतील दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये पैजाही रंगू लागल्या होत्या. लाखापर्यंत पैजा लावल्या जात असल्याने वातावरण चांगलेच तापलं होतं.

 

दोन्ही गटांचे कार्यकर्ते ‘नेत्यासाठी कायपण,’ या भूमिकेत असल्याने गावागावांत इर्षा टोकाला पोहचली होती. राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांचे कागल तालुक्यातील कार्यकर्ते योगेश गुरव यांनी महादेवराव महाडिक विजयी होणार यासाठी 25 हजारांची पैज लावली. ‘ही पैज कोण स्वीकारणार का? ‘ असे खुले आव्हान त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलं होतं.

 

गुरव यांच्या पैजेचे आव्हान सतेज पाटील यांचे करवीर तालुक्यातील हलसवडे इथले कार्यकर्ते शेखर पाटील यांनी स्वीकारलं होतं. सतेज पाटील विजयी होणार म्हणून शेखर पाटील यांनी गुरव यांच्याबरोबर 25 हजारांची पैज लावली.

 

गुरव आणि शेखर पाटील यांचे पंचतारांकित वसाहतीमध्ये व्यवसाय आहेत. ते एकमेकांचे मित्र आहेत; पण नेत्यांसाठी त्यांनी मैत्री पणाला लावली होती. या पैजेचे मध्यस्थ म्हणून दोघांचे मित्र असणारे सिद्धनेर्लीचे पैलवान अमर पाटील यांनी पुढाकार घेतला. दोघांनी प्रत्येकी 25 हजारांप्रमाणे पन्नास हजार रुपये अमर पाटील यांच्याकडे जमा केले होते.

 

खासदार धनंजय महाडिक युवाशक्तीचे शहर उपाध्यक्ष रहीम सनदी यांनीही महादेवराव महाडिक विजयी होतील यासाठी 30 हजारांची पैज लावली. त्यानंतर आमदार महादेवराव महाडिक यांच्या गाडीच्या 7474 क्रमांकाचे बक्षीस या पैजेत लावले होते. तीस हजारांच्या पैजा 5 जणांनी, तर 7474 रुपयांच्या पैजा 10 जणांनी लावल्या होत्या.

 

सोशल मीडियावरुन रोज अशा पैजांचे पेव फुटू लागले होते. विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याचा अंदाज येत नसल्याने उमेदवारांसह कार्यकर्त्यांची घालमेल वाढली होती.

 

अखेर सतेज पाटील यांच्या बाजूने ज्यांनी ज्यांनी पैजा लावल्या, ते अखेर जिंकले आहेत.

VIDEO:

 

संबंधित बातम्या

विधानपरिषद निवडणुकीचे सर्व निकाल

प्रतिष्ठेच्या लढतीत सतेज पाटील जिंकले, महाडिक हरले

विधानपरिषद : मुंबईत भाई जगताप विजयी, लाड यांचा निसटता पराभव

नेत्यांसाठी कायपण, सतेज पाटील आणि महाडिकांवर पैजा

 

Election 2015 News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Kolhapur election betting on Satej Patil & Mahadevrao Mahadik
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

विधानपरिषद निवडणुकीचे सर्व निकाल
विधानपरिषद निवडणुकीचे सर्व निकाल

मुंबई : नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीच्या सर्व सात

प्रतिष्ठेच्या लढतीत सतेज पाटील जिंकले, महाडिक हरले
प्रतिष्ठेच्या लढतीत सतेज पाटील जिंकले, महाडिक हरले

कोल्हापूर : संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या विधानपरिषदेच्या

बंडखोर महाडिकांची हकालपट्टी, काँग्रेसचा दणका
बंडखोर महाडिकांची हकालपट्टी, काँग्रेसचा दणका

कोल्हापूर: विधानपरिषद निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या महादेवराव

विधानपरिषद निवडणुकीत भाजप - राष्ट्रवादीची छुपी युती?
विधानपरिषद निवडणुकीत भाजप - राष्ट्रवादीची छुपी युती?

मुंबई: विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसला हरवण्यासाठी राष्ट्रवादी

अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रीपद सोडणार?
अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रीपद सोडणार?

नवी दिल्ली : दिल्लीच्या राजकारणात नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे.

विधानपरिषद : कोणाची लढत कोणाशी?
विधानपरिषद : कोणाची लढत कोणाशी?

मुंबई: राज्याच्या विधान परिषदेच्या 8 जागांसाठी येत्या 27 डिसेंबरला

बंटी पाटलांना उमेदवारी, महाडिकांचा पत्ता कट
बंटी पाटलांना उमेदवारी, महाडिकांचा पत्ता कट

कोल्हापूर : पक्षश्रेष्ठींसमोर प्रचंड गुंता निर्माण झालेल्या

LIVE : गुजरातमध्ये भाजपची प्रतिष्ठा पणाला
LIVE : गुजरातमध्ये भाजपची प्रतिष्ठा पणाला

गांधीनगर : गुजरातमध्ये भाजपची सत्वपरीक्षा पाहणाऱ्या महापालिका

स्वाभिमानी, RPI सह 280 पक्षांची मान्यता रद्द?
स्वाभिमानी, RPI सह 280 पक्षांची मान्यता रद्द?

मुंबई : कागदपत्रांची पूर्तता न करणाऱ्या राजकीय पक्षांना राज्य

नितीश कुमार बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान
नितीश कुमार बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान

पाटणा: भाजपला धोबीपछाड देत जेडीयू नेते नीतिश कुमार पुन्हा एकदा