प्रतिष्ठेच्या लढतीत सतेज पाटील जिंकले, महाडिक हरले

Kolhapur Satej Patil wins

कोल्हापूर : संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या विधानपरिषदेच्या कोल्हापूर मतदारसंघात काँग्रेसच्या सतेज पाटील यांनी बाजी मारली आहे. सतेज उर्फ बंटी पाटील यांनी काँग्रेसचेच बंडखोर उमेदवार महादेवराव महाडिक यांचा 63 मतांनी पराभव केला.

 

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 382 मतांपैकी 220 मतं सतेज पाटील यांना मिळाली. तर महादेवराव महाडिकांच्या वाट्याला 157 मतं आली. 5 मतं बाद ठरली. त्यामुळे सतेज पाटील यांनी तब्बल 63 मतांनी बाजी मारली.

 

या निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र आली होती. त्यांना माजी मंत्री विनय कोरे यांच्या जनसुराज्य शक्ती पक्षानेही पाठिंबा दिला होता. त्यामुळे सतेज पाटलांचा विजय सुकर झाला.

 

या निवडणुकीसाठी तिकीटवाटपावरून पक्षश्रेष्ठींसमोर प्रचंड गुंता निर्माण झाला होता. मात्र कोल्हापूर विधानपरिषदेच्या जागेसाठी काँग्रेसने शेवटच्या क्षणी तिकीट जाहीर केलं. पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या पारड्यात काँग्रेसने उमेदवारी बहाल केली होती.

 

त्यामुळे वेळोवेळी पक्षविरोधी भूमिका घेणारे आमदार महादेवराव महाडिक यांचा पत्ता कट झाला.

 

असं असलं तरी महादेवराव महाडिक यांनी बंडखोरी केली होती. त्यांना भाजपने पाठिंबा दिला होता.

 

महादेवराव महाडिक यांचा मुलगा अमल महाडिक हे कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील भाजप आमदार आहेत. तर महादेवराव महाडिकांचा पुतण्या धनंजय महाडिक हे राष्ट्रवादीचे खासदार आहेत. म्हणजे महाडिक या एकाच घराण्यात तीन पक्ष आहेत.

First Published:

Related Stories

महाडिक निवडणुकीत, तर कार्यकर्ते पैजेत हरले !
महाडिक निवडणुकीत, तर कार्यकर्ते पैजेत हरले !

कोल्हापूर : विधानपरिषद निवडणुकीत अत्यंत चुरशीच्या आणि

विधानपरिषद निवडणुकीचे सर्व निकाल
विधानपरिषद निवडणुकीचे सर्व निकाल

मुंबई : नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीच्या सर्व सात

बंडखोर महाडिकांची हकालपट्टी, काँग्रेसचा दणका
बंडखोर महाडिकांची हकालपट्टी, काँग्रेसचा दणका

कोल्हापूर: विधानपरिषद निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या महादेवराव

विधानपरिषद निवडणुकीत भाजप - राष्ट्रवादीची छुपी युती?
विधानपरिषद निवडणुकीत भाजप - राष्ट्रवादीची छुपी युती?

मुंबई: विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसला हरवण्यासाठी राष्ट्रवादी

अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रीपद सोडणार?
अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रीपद सोडणार?

नवी दिल्ली : दिल्लीच्या राजकारणात नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे.

विधानपरिषद : कोणाची लढत कोणाशी?
विधानपरिषद : कोणाची लढत कोणाशी?

मुंबई: राज्याच्या विधान परिषदेच्या 8 जागांसाठी येत्या 27 डिसेंबरला

बंटी पाटलांना उमेदवारी, महाडिकांचा पत्ता कट
बंटी पाटलांना उमेदवारी, महाडिकांचा पत्ता कट

कोल्हापूर : पक्षश्रेष्ठींसमोर प्रचंड गुंता निर्माण झालेल्या

LIVE : गुजरातमध्ये भाजपची प्रतिष्ठा पणाला
LIVE : गुजरातमध्ये भाजपची प्रतिष्ठा पणाला

गांधीनगर : गुजरातमध्ये भाजपची सत्वपरीक्षा पाहणाऱ्या महापालिका

स्वाभिमानी, RPI सह 280 पक्षांची मान्यता रद्द?
स्वाभिमानी, RPI सह 280 पक्षांची मान्यता रद्द?

मुंबई : कागदपत्रांची पूर्तता न करणाऱ्या राजकीय पक्षांना राज्य

नितीश कुमार बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान
नितीश कुमार बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान

पाटणा: भाजपला धोबीपछाड देत जेडीयू नेते नीतिश कुमार पुन्हा एकदा