ग्रामदेवता : अकोल्याच्या बार्शी टाकळीचं ग्रामदैवत श्री कालंका माता

gramdevta akola barshi takli shri kalanka mata story

अकोला : बार्शी टाकळी तालुक्याची आध्यात्मिक ओळख येथील दोन मंदिरांनी दृढ केली आहे. एक कालंका मातेचं आणि दुसरं खोलेश्वराचे मंदिर. यापैकी कालंका माता हे बार्शी टाकळीचं ग्रामदैवत आहे. हे मंदिर जवळपास चारशे ते पाचशे वर्षांपूर्वीचं असावं असा अंदाज असल्याचं गावकरी सांगतात.

स्थापत्य कलेचा उत्कृष्ठ नमुना, आकर्षक नक्षीकाम, दगडांवर रेखाटलेली मनमोहक आणि सुरेख चित्रं हे या मंदिराच्या प्राचीनतेची साक्ष पटवत आहेत. हे मंदिर हेमाडपंथी शैलीचं आहे. मात्र या मंदिराला मुघलांच्या आक्रमणालाही सामोरं जावं लागलं.

कालंका देवी येथे नेमकं कशी प्रतिष्ठापीत झाली याची ठोस आख्यायिका माहित नसली तरी राक्षसांसोबतच्या युद्धानंतर कालीचा अवतार धारण केलेल्या देवीनं विश्रांतीसाठी हे ठिकाण निवडलं. तेव्हापासूनच देवी या ठिकाणी कायम विराजमान झाल्याचं जुने जाणते सांगतात.

या मंदिराबाबत आणखी एक संदर्भ सांगितला जातो. आधी या मंदिरात शंकराची मूर्ती होती असे दाखले इतिहासात सापडतात. मुघलांच्या आक्रमणानंतर इथली शंकराची मूर्ती खंडित झाली आणि या ठिकाणी माहुरची रेणुका विराजमान झाली. हीच माहुरची रेणुका माता येथे पुढे  कालंका माता म्हणून प्रतिष्ठापित झाल्याचं सांगितलं जातं.

वर्षभर जिल्ह्यासह विदर्भातल्या भक्तांची मांदियाळी या मंदिरात लागलेली असते. पण दर मंगळवारी मोठ्या प्रमाणात भक्त येत असतात. नवरात्रातील नऊ दिवसात देवी स्वतः मंदिरात वास करीत असल्याची भावना असल्याने येथे भक्तांची मोठी गर्दी झालेली असते.

शंकराची मूर्ती असतांना या मंदिरातील गवाक्षातून सकाळचे सूर्याचे पहिले किरण थेट मूर्तीवर पडत होते असं जुने जाणकार सांगतात. मात्र अतिशय सुंदर वास्तुकलेचा नमुना असणारे हे मंदिर आता सरकारी अनास्थेला बळी पडताना दिसून येते.

या मंदिराच्या देखभालीची जबाबदारी सध्या पुरातत्व विभागाकडे आहे. अनेक ठिकाणी मंदिराचं नक्षीकाम खराब झाले. तर काही भाग ढासळायला लागला आहे. मंदिर परिसरात सध्या गवताचं साम्राज्य पसरलं आहे. त्यामुळे भक्तांनी हे वैभव टिकवून ठेवण्याची अपेक्षा केली आहे.

आदिशक्तीची विविध रुपं कधी आपण दुर्गा, काली, चंडी, महालक्ष्मी तर महिषासुरमर्दिनी  अशा स्वरुपात आपण पाहत असतो. याच भक्ती आणि उत्कठतेचं रुप म्हणजे बार्शीटाकळीची कालंकादेवी. या मातेचं दर्शन एकदा तरी घ्यायलाच हवं.

Gramdevta News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:gramdevta akola barshi takli shri kalanka mata story
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

ग्रामदेवता: औरंगाबादमधील कन्नड तालुक्याचे ग्रामदैवत कालीकामाता
ग्रामदेवता: औरंगाबादमधील कन्नड तालुक्याचे ग्रामदैवत कालीकामाता

औरंगाबाद: चाळीसगाव रस्त्यावरील उपळा गावात असलेलं कालीमातेचे मंदिर

ग्रामदेवता : औरंगाबादच्या लासूर गावचं ग्रामदैवत श्री दाक्षायणी देवी
ग्रामदेवता : औरंगाबादच्या लासूर गावचं ग्रामदैवत श्री दाक्षायणी...

औरंगाबाद : औरंगाबादच्या लासूर गावात शिवना नदीच्या काठावर

ग्रामदेवता : वर्ध्याच्या देवळीचं आराध्यदैवत मिरननाथ महाराज
ग्रामदेवता : वर्ध्याच्या देवळीचं आराध्यदैवत मिरननाथ महाराज

वर्धा : वर्धा जिल्ह्यातल्या देवळी तालुक्याचं ग्रामदैवत म्हणजे

ग्रामदेवता : पुण्यातील चिंचवडचं ग्रामदैवत श्री मोरया गणपती
ग्रामदेवता : पुण्यातील चिंचवडचं ग्रामदैवत श्री मोरया गणपती

पुणे : पुणे जिल्ह्याचं आध्यात्मिक महत्व रांजणगाव, मोरगाव, थेऊर या

ग्रामदेवता : अकोल्याच्या बाळापूरचं आराध्यदैवत श्री बाळादेवी
ग्रामदेवता : अकोल्याच्या बाळापूरचं आराध्यदैवत श्री बाळादेवी

अकोला : अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे.

ग्रामदेवता : सोलापूरच्या मंगळवेढ्याचं ग्रामदैवत दामाजीपंत
ग्रामदेवता : सोलापूरच्या मंगळवेढ्याचं ग्रामदैवत दामाजीपंत

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातला मंगळवेढा तालुका ज्वारीच कोठार

ग्रामदेवता : रायगडच्या खोपोलीचं ग्रामदैवत 'बोंबल्या विठोबा'
ग्रामदेवता : रायगडच्या खोपोलीचं ग्रामदैवत 'बोंबल्या विठोबा'

रायगड : रायगड जिल्ह्यातल्या खोपोली तालुक्याचं

ग्रामदेवता: गणपतीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी जालन्याचे राजूरेश्वर
ग्रामदेवता: गणपतीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी जालन्याचे...

जालना: जालना शहरापासून 25 किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या कुशीत

ग्रामदेवता: चंद्रपूरमधील भद्रावती तालुक्याचं ग्रामदैवत 'भद्रनाग'
ग्रामदेवता: चंद्रपूरमधील भद्रावती तालुक्याचं ग्रामदैवत 'भद्रनाग'

चंद्रपूर: नागपूर जिल्ह्यातल्या भद्रावती तालुक्याचं ग्रावदैवत

ग्रामदेवता: शिवकालीन परंपरा लाभलेले माढ्यातील माढेश्वरी मंदिर
ग्रामदेवता: शिवकालीन परंपरा लाभलेले माढ्यातील माढेश्वरी मंदिर

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्याचं दैवत म्हणजे