बलात्कार पीडितेच्या बाळाचा डीएनए आरोपीशी जुळला नाही

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेला मामा तिने जन्म दिलेल्या बाळाचा बायोलॉजिकल पिता नसल्याचं डीएनए रिपोर्टमधून समोर आलं.

By: | Last Updated: 12 Sep 2017 11:14 PM
बलात्कार पीडितेच्या बाळाचा डीएनए आरोपीशी जुळला नाही

चंदिगढ : बलात्कारातून गर्भवती राहिलेल्या चंदिगढमधील दहा वर्षांच्या चिमुरडीने अर्भकाला जन्म दिला. मात्र बाळाचा डीएनए बलात्काराचा आरोप असेलल्या पीडितेच्या मामाशी न जुळल्यामुळे आता नवे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

चंदिगढमधील सेंट्रल फॉरेन्सिक लॅबमध्ये नवजात बाळ आणि पीडितेवर बलात्काराचा आरोप असलेल्या मामाची डीएनए टेस्ट करण्यात आली. मात्र अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेला मामा तिने जन्म दिलेल्या बाळाचा बायोलॉजिकल पिता नसल्याचं डीएनए रिपोर्टमधून समोर आलं. त्यामुळे या प्रकरणाला पूर्ण कलाटणी मिळाली आहे.

अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणी तिचा मामा दोषी नसल्यास गुन्हेगार कोण, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. पोलिसांच्या तपासावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. ओळख परेडमध्ये पीडितेने मामाकडे बोट दाखवलं होतं. पोलिस आता पुन्हा नव्याने या प्रकरणाचा तपास सुरु करणार आहेत.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV