107 वर्षांच्या आजीची राहुल गांधींच्या भेटीची इच्छा

राहुल गांधींनी केलेला ट्वीट पुरेसा नव्हता की काय, म्हणून त्यांनी स्वतः फोन करुन माझ्या आजीला बर्थडे विश केलं, असं 107 वर्षांच्या आजीच्या नातीने ट्वीट केलं.

107 वर्षांच्या आजीची राहुल गांधींच्या भेटीची इच्छा

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वात पक्षाने गुजरात निवडणुकांमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. 107 वर्षांच्या एका आजीबाईंनी आपल्या वाढदिवशी राहुल गांधींची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली. याची माहिती मिळताच तात्काळ राहुल गांधी यांनी फोन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.

बंगळुरुत राहणाऱ्या एका आजीबाईंनी 25 डिसेंबरला वयाची 107 वर्ष पूर्ण केली. आजी बर्थडे केक कापत असतानाचा फोटो त्यांची नात दीपाली सिकंद यांनी ट्विटरवरुन शेअर केला. 'आजीने राहुल गांधींची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली. मी विचारलं का, तर ती म्हणाली... कारण तो हँडसम आहे.' असं कॅप्शन दीपाली यांनी फोटोला दिलं.काही तासातच दीपाली यांच्या ट्वीटला रिप्लाय आला, तो होता साक्षात राहुल गांधी यांचा. 'प्रिय दीपाली, तुझ्या सुंदर आजीला माझ्याकडून वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दे. आणि नाताळच्या शुभेच्छा सांग. तिला माझ्याकडून एक मोठ्ठी मिठी मार. तुमचाच राहुल' असं ट्वीट राहुल गांधींनी केलं.

राहुल यांच्या ट्वीटनंतर दोन तासातच दीपाली यांनी पुन्हा ट्वीट केला. 'राहुल यांनी केलेला ट्वीट पुरेसा नव्हता की काय, म्हणून त्यांनी स्वतः फोन करुन माझ्या आजीला बर्थडे विश केलं. हीच खरी माणुसकी.' असं म्हणत दीपाली यांनी सर्व शुभेच्छुकांचे आभार व्यक्त केले.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: 107 years old lady wishes to meet Rahul Gandhi on her Birthday, Congress President calls her personally latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV