युद्धात नव्हे, रस्ते अपघातात दरवर्षी 1600 जवानांचा मृत्यू

जम्मू काश्मिरच्या सीमेवर गोळीबारात शहीद होणाऱ्यांपेक्षा जास्त जवानांचे मृत्यू रस्ते अपघातात होतात.

युद्धात नव्हे, रस्ते अपघातात दरवर्षी 1600 जवानांचा मृत्यू

मुंबई : कोणतंही युद्ध न होता आपला देश दरवर्षी 1 हजार 600 जवान गमावत आहे. धक्कादायक बाब म्हणजे सर्वाधिक जवानांचे मृत्यू हे रस्ते अपघातात होत आहेत. हा आकडा जम्मू काश्मिरच्या सीमेवर गोळीबारात शहीद होणाऱ्या जवानांहून जास्त आहे.

'टाईम्स ऑफ इंडिया'ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार दरवर्षी तब्बल 350 जवानांचा मृत्यू रस्ते अपघातात होतो. तर 120 जवान हे आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतात. ट्रेनिंगदरम्यान होणारे मृत्यू, आरोग्याचे प्रश्न हेसुद्धा जवानांच्या मृत्यूमागील गंभीर कारणं ठरत आहेत.

जगात सर्वाधिक रस्ते अपघात भारतात होतात, असंही ही आकडेवारी सांगते. आत्महत्या करणाऱ्यांचं प्रमाणही आपल्या देशात सर्वाधिक आहे. देशाला शिस्तीचं महत्त्व सांगणारे जवानही अशा गोष्टींना बळी पडत असतील, तर ही चिंतेची बाब आहे.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: 1600 Jawans die every year in road accidents latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV