यूपीच्या बागपतमध्ये यमुना नदीत बोट पलटली, 19 जणांचा मृत्यू

बोटीत बहुतांश मजूर होते. ते मजुरीसाठी बागपतहून हरियाणाला जात होते.

By: | Last Updated: > Thursday, 14 September 2017 12:39 PM
19 dead after boat capsizes in UP’s Baghpat latest update

बागपत : उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यात मोठा अपघात झाला. इथे यमुना नदीत बोट उलटल्याने 19 जणांचा मृत्यू झाला आहे. या बोटीत 60 पेक्षा जास्त प्रवासी होते.

सध्या पोलिस प्रशासन आणि स्थानिक मदत आणि बचावकार्य करत आहेत. एनडीआरएफच्या पथकालाही पाचारण करण्यात आलं आहे.

क्षमतेपेक्षा जास्त लोक बसल्याने दुर्घटना
बागपतमधील काठा गावात सकाळी 7.45 सुमारास हा अपघात झाला. क्षमतेपेक्षा जास्त लोक बोटीत बसल्याने अपघात झाल्याचं कळतं. अपघातानंतर 15 जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. पोलिसांनी आतापर्यंत सहापेक्षा जास्त मृतदेह पाण्यातून काढले आहेत.

बोटीत बहुतांश मजूर होते. ते मजुरीसाठी बागपतहून हरियाणाला जात होते.

संतापलेल्या लोकांचा रास्तारोको
अपघातानंतर वेळेत मदत न पोहोचल्याने संतापलेल्या नागरिकांनी दिल्ली-यमनोत्री हायवेवर रास्तारोको केला. तर काही लोकांनी वाहनांची तोडफोडही केली. घटनास्थळी पोहोचलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना नागरिकांनी घेराव घातला.

तर पोलिस परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या नातेवाईंकांना आवश्यक ती मदत देण्याचे निर्देश योगी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. शिवाय मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे.

India News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:19 dead after boat capsizes in UP’s Baghpat latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

आपल्या मराठी गुरुबद्दल उद्या काय बोलणार पंतप्रधान नरेंद्र मोदी?
आपल्या मराठी गुरुबद्दल उद्या काय...

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर ज्या व्यक्तीचा

गोव्यातील धरणे फुल्ल, पावसाची बॅटिंग सुरुच
गोव्यातील धरणे फुल्ल, पावसाची बॅटिंग...

गोवा : गेल्या पाच दिवसांपासून पावसाने सुरु केलेले धूमशान काही

‘त्या’ जैन दाम्पत्याविरोधात मानवाधिकार आयोगाकडे तक्रार
‘त्या’ जैन दाम्पत्याविरोधात...

नीमच : कोट्यवधीच्या संपत्तीसह तीन वर्षांच्या मुलीचा त्याग करुन

योगी सरकारकडून सहा महिन्यांचं रिपोर्ट कार्ड सादर
योगी सरकारकडून सहा महिन्यांचं...

लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या

एमबीबीएसला प्रवेश न मिळाल्याने 25 वर्षीय विवाहितेची हत्या?
एमबीबीएसला प्रवेश न मिळाल्याने 25...

हैदराबाद : एमबीबीएसला प्रवेश न मिळाल्याने 25 वर्षीय विवाहितेची पती

साडी वाटताना राडा, डिझाईन न आवडल्याने महिला आपसात भिडल्या
साडी वाटताना राडा, डिझाईन न आवडल्याने...

हैदराबाद : साडी म्हणजे तमाम महिलावर्गाचा वीकपॉईन्ट. साडी खरेदीच

'सरकारी अधिकाऱ्यांना मिनरल वॉटर, तर विद्यार्थिनींना साधं पाणी का?'
'सरकारी अधिकाऱ्यांना मिनरल वॉटर, तर...

अलाहाबाद :  अलाहाबाद हायकोर्टाने सरकारी

दिवाळीपर्यंत पेट्रोल-डिझेलचे भाव उतरतील : पेट्रोलियम मंत्री
दिवाळीपर्यंत पेट्रोल-डिझेलचे भाव...

चंदिगढ : येत्या दिवाळीपर्यंत पेट्रोल-डिझेलचे दर उतरतील, असं वक्तव्य

हनीप्रीत नेपाळच्या बिराटनगरमध्ये लपलेली, सुत्रांची माहिती
हनीप्रीत नेपाळच्या बिराटनगरमध्ये...

काठमांडू (नेपाळ) : बाबा राम रहीमच्या सर्वात जवळची व्यक्ती समजली

रोहिंग्यांना ट्रेनिंग देण्यासाठी आलेला अल-कायदाच्या दहशतवाद्याला अटक
रोहिंग्यांना ट्रेनिंग देण्यासाठी...

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी अल-कायदाच्या दहशतवाद्याला अटक केली