काश्मीरच्या पुलवामात दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सैन्याला यश आलं आहे.

काश्मीरच्या पुलवामात दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सैन्याला यश आलं आहे. वसीम शाह आणि निसार अशी या दहशतवाद्यांची नावं असल्याचं कळतंय. सैन्याला हे दोघे दहशतवादी लिटर परिसरात लपल्याचं कळालं होतं. त्यानंतर सैन्याने केलेल्या कारवाईत दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

कंठस्नान घालण्यात आलेले दोघेही दहशतवादी एका घरात लपल्याची माहिती सैन्याला मिळाली होती. टॉप 12 वॉन्टेड दहशतवाद्यांमध्ये वसीमचा समावेश होता. सैन्यानं सर्च ऑपरेशन सुरु केल्यानंतर दोन्ही दहशतवाद्यांनी सैनिकांच्या दिशेनं गोळीबार सुरु केला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.

या दोन्ही दहशतवाद्यांच्या खात्म्यानंतर अजूनही सर्च ऑपरेशन सुरु आहे. यावर्षी आतापर्यंत 171 दहशतवादी सैन्याकडून मारले गेले आहेत.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV