'आप'ला धक्का बसणार, 20 आमदार अपात्र ठरणार?

आपने आपल्या 21 आमदारांना संसदीय सचिव पद दिलं आहे. ही सर्व लाभाची पदं आहेत.

'आप'ला धक्का बसणार, 20 आमदार अपात्र ठरणार?

नवी दिल्ली: सत्ताधारी आम आदमी पक्षाचे एक दोन नव्हे तर तब्बल 20 आमदार अपात्र ठरण्याची शक्यता आहे. याप्रकरणी निवडणूक आयोग राष्ट्रपतींकडे शिफारस करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आपने आपल्या 21 आमदारांना संसदीय सचिवपद दिलं आहे. ही सर्व लाभाची पदं आहेत. त्यामुळे या आमदारांचं सदस्यत्व रद्द करा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि वकील प्रशांत पटेल यांनी मार्च 2015 मध्ये राष्ट्रपतींकडे याचिकेद्वारे केली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
सामाजिक कार्यकर्ते आणि वकील प्रशांत पटेल यांनी मार्च 2015 मध्ये राष्ट्रपतींकडे याचिका दाखल केली. यामध्ये त्यांनी आम आदमी पक्षाचे 21 आमदारांना संसदीय सचिव बनवण्यात आलं आहे, ही सगळी लाभाची पदं आहे. त्यामुळे त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात यावं, अशी मागणी केली. यानंतर राष्ट्रपतींनी हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे पाठवलं. या प्रकरणावर सुनावणी पूर्ण झाली असून आज अंतिम निर्णय येईल.

कायदा बदलण्याचा प्रयत्न
इतकंच नाही तर केजरीवाल सरकारने आपल्या आमदारांना वाचवण्यासाठी ही पदं लाभाच्या पदापासून बाहेर ठेवण्यासाठी कायदा बनवण्याचा प्रयत्न केला होता. पण राष्ट्रपतींनी त्याला मंजुरी दिली नाही. त्यावेळी दिल्ली हायकोर्टात केंद्र आणि दिल्ली सरकारच्या अधिकारासंदर्भातील सुनावणीत केंद्राने स्पष्ट केलं होतं की, दिल्लीत एवढे संसदीय सचिव ठेवता येणार नाहीत. यासाठी कोणतीही तरतूद नाही. यानंतर 8 सप्टेंबर 2016 रोजी दिल्ली हायकोर्टाने 21 संसदीय सचिवांची नियुक्ती रद्द केली होती.

दरम्यान, राष्ट्रपतींनी जरी आपचे 20 आमदार अपात्र ठरवले, तरीही केजरीवाल सरकारवर फरक पडणार नाही. कारण दिल्लीत 70 पैकी तब्बल 66 आमदार आपचे आहेत.

दिल्ली विधानसभेचं पक्षीय बलाबल

एकूण जागा - 70 (बहुमताचा आकडा 36)
आम आदमी पक्ष - 66
भाजप - 04
काँग्रेस -00

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: 20 AAP MLAs’ to get disqualified: SOURCES
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV