धुक्याचा कहर, यमुना एक्स्प्रेस वेवर 22 वाहनं एकमेकांवर आदळली

दाट धुक्यामुळे मथुरा शहरा जवळच्या यमुना महामार्गावर तब्बल 22 गाड्या एकमेकांना धडकल्या आहेत.

धुक्याचा कहर, यमुना एक्स्प्रेस वेवर 22 वाहनं एकमेकांवर आदळली

नवी दिल्ली : दाट धुक्यामुळे मथुरा शहरा जवळच्या यमुना महामार्गावर तब्बल  22 गाड्या एकमेकांना धडकल्या आहेत. आज अचानकपणे मथुरा भागात मोठं धुकं पसरलं. या भागात दाड धुक्यामुळे पायी चालणंही अवघड झालं आहे. त्यामुळे असे अपघात होत आहेत.

yamuna accident

अगदी काही फुटांवरचीही वस्तू देखील दिसत नसल्यामुळे पायी चालणंही अवघड बनलं होतं. धुक्यामुळे महामार्गावर वाहनांची गर्दी झालेली असताना मागून येणाऱ्या एका गाडीने धडक दिली. त्यानंतर पाठोपाठ येणारी वाहनंही समोरचं काहीही दिसत नसल्याने पुढच्या वाहनांवर धडकली.

yamuna accident 1

दरम्यान, सध्या जखमींना रुग्णालयात भर्ती करण्यात आलं  आहे. पुढचे काही तास महामार्गावरचं धुकं कायम राहिल्यामुळे वाहतूक खोळंबली होती. त्यामुळे धुक्यात वाहनं सावकाशपणे चालवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: 22 vehicles met with accident on Yamuna express way due to fog
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV