वास्को द गामा पाटणा एक्स्प्रेस रुळावरुन घसरली, 3 मृत्यूमुखी

माणिकपूर आणि मुघलसराय रेल्वे स्टेशनदरम्यान पहाटे सव्वाचारच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातग्रस्त रेल्वेचे डब्बे बाजूला सारुन प्रवाशांना वाचवण्याचं कार्य युद्धपातळीवर सुरु आहे.

वास्को द गामा पाटणा एक्स्प्रेस रुळावरुन घसरली, 3 मृत्यूमुखी

चित्रकूट (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील चित्रकूटमध्ये 'वास्को द गामा पाटणा एक्स्प्रेस'चे 13 डब्बे रुळावरुन घसरले. या अपघातात तीन प्रवाशांचा मृत्यू झाला असून आठ प्रवासी जखमी झाले आहेत.

माणिकपूर आणि मुघलसराय रेल्वे स्टेशनदरम्यान पहाटे सव्वाचारच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातग्रस्त रेल्वेचे डब्बे बाजूला सारुन प्रवाशांना वाचवण्याचं कार्य युद्धपातळीवर सुरु आहे.

ही एक्स्प्रेस पाटणा जंक्शनवरुन गोव्याच्या मडगावला जात होती. एक्स्प्रेस सकाळी 4.18 वाजता चित्रकूटच्या माणिकपूर रेल्वे स्थानकाजवळ आली असता ती रुळावरुन घसरली.

रुळाला तडे गेल्याने हा रेल्वे घसरल्याचा प्राथमिक अंदाज उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) यांनी वर्तवला आहे.

दरम्यान, जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातानंतर तातडीने एक मेडिकल व्हॅन रवाना केली, जी 5.20 वाजता घटनास्थळी पोहोचली, अशी माहिती उत्तर-मध्य रेल्वेची जनसंपर्क अधिकारी अमित मालवीय यांनी दिली आहे.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: 3 dead as Vasco Da Gama-Patna express derails in Uttar Pradesh
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV