उरी सेक्टरमध्ये लष्करी तळावरील हल्ल्याचा कट उधळला, 3 दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरच्या जंगलात लपून बसलेल्या 3 दहशतवाद्यांना भारतीय लष्कराने कंठस्नान घातलं.

उरी सेक्टरमध्ये लष्करी तळावरील हल्ल्याचा कट उधळला, 3 दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर : भारतीय लष्कराच्या तळावर हल्ला करण्यासाठी आलेल्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरच्या जंगलात लपून बसलेल्या 3 दहशतवाद्यांना भारतीय लष्कराने कंठस्नान घातलं.

या चकमकी दरम्यान एक जवान तर 4 भारतीय नागरिक जखमी झाले. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही दहशतवादी भारतीय लष्कराच्या तळावर हल्ला करण्यासाठी आले असल्याची माहिती सैन्याला मिळाली होती. त्यानंतर उरीच्या जंगलात शोध मोहीम सुरू करण्यात आली.

यावेळी दहशतवाद्यांनी भारतीय जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. भारतीय लष्कराच्या जवानांनी देखील चोख प्रत्युत्तर देत दहशतवाद्यांना यमसदनी धाडलं. सीमा भागातल्या जंगलात आणखी काही दहशतवादी लपून बसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दुसऱ्या एका कारवाई दरम्यान भारतीय जवानांनी कुपवाडामधून दहशतवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा हस्तगत केला आहे.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV