हिमाचल प्रदेशमध्ये बस नदीत कोसळली, 43 जणांचा मृत्यू

हिमाचल प्रदेशमध्ये बस नदीत कोसळली, 43 जणांचा मृत्यू

शिमला : हिमाचल प्रदेशमधील शिमला जिल्ह्यातील टॉन्स नदीत बस कोसळल्याची भीषण दुर्घटना घडली आहे. सकाळी 8 ते 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

या भीषण दुर्घटनेत 43 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती पीटीआयने दिली आहे. तर काही जण वाहून गेल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

शिमला जिल्ह्यात टॉन्स नदी आहे. या नदीत प्रवाशांनी भरलेली बस कोसळली. बसमध्ये 50 हून अधिक प्रवाशी होते, अशी माहिती मिळते आहे.

बचावकार्यासाठी संबंधित प्रशासनाची पथकं घटनास्थळी दाखल झाली आहेत.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: accident bus himachal pradesh shimla
First Published:

Related Stories

LiveTV