बंगळुरुमध्ये बारला आग, पाच कर्मचाऱ्यांचा मृत्यू

अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवलं.

बंगळुरुमध्ये बारला आग, पाच कर्मचाऱ्यांचा मृत्यू

बंगळुरु : कर्नाटकची राजधानी बंगळुरुमध्ये बारला लागलेल्या आगीत पाच कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. रविवारी रात्री अकराच्या सुमारास लागलेली आग आटोक्यात आली आहे.

कुंभारा सांघा इमारतीमधील कैलास बारमध्ये ही आग लागली होती. मृतांमध्ये या बारच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सगळ्यांचा गुदमरुन मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवलं.

आग लागली त्यावेळी पाचही कर्मचारी बारमध्ये झोपले होते. आगीच्या धुरामुळे त्यांच्या गुदमरुन मृत्यू झाला. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं म्हटलं जात आहे. परंतु आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

मुंबईच्या कमला मिल्समधील हॉटेल्सना लागलेल्या आगीची घटना ताजी असतानाच, बंगळुरुच्या कैलास बारला लागलेल्या आगीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: 5 died after fire breaks out at a bar in Bengaluru
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV