जम्मू-काश्मीरमध्ये 5 दहशतवाद्यांना खात्मा

जम्मू काश्मीरच्या बांदीपुरामध्ये पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराच्या जवानांना यश आलं आहे. खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये कुख्यात दहशतवादी जकी-उर-रहमान लखवीच्या भाच्याचाही समावेश आहे.

By: | Last Updated: 18 Nov 2017 10:17 PM
जम्मू-काश्मीरमध्ये 5 दहशतवाद्यांना खात्मा

जम्मू-काश्मीर : जम्मू काश्मीरच्या बांदीपुरामध्ये पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराच्या जवानांना यश आलं आहे. खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये कुख्यात दहशतवादी जकी-उर-रहमान लखवीच्या भाच्याचाही समावेश आहे.

काश्मीरच्या बांदीपुरामध्ये एका घरात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाली होती, त्यानुसार लष्करानं कारवाई सुरी केली. यावेळी लष्कराने परिसराची नाकेबंदी करुन शोधमोहीम सुरु केली. यावेळी दहशतवाद्यांनी लष्करावर गोळीबार सुरु केला.

दहशतवाद्यांशी दोन हात करताना भारतीय वायुसेनेचा गरुड कमांडो शहीद झाला असून एक जवान जखमी झाला.

श्रीनगरमधील लष्कराचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी सांगितलं की, "हाजिनामधील चकमकीमध्ये पाच दहशतवाद्यांचा खात्मा झाला असून, यात जैश-ए-मोहम्मदचा जकी-उर-रहमान लखवीच्या भाच्याचाही खात्मा झाला आहे."

लखवीच्या भाच्याचं नाव ओवैद असं असून, तो ओसामा जंगी नावाच्या दहशतवादी संघटनेसाठी काम करत होता. यापूर्वी भारतीय लष्कराने जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरच्या भाच्याचाही अशाच प्रकारे खात्मा केला होता. भारतीय जवानांनी मसूदच्या भाच्याला पुलवामामध्ये कंठस्नान घातलं होतं.

दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये आत्तापर्यंत लष्कराने 194 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. ज्यात हिजबुलचा टॉप कमांडरचाही समावेश आहे.

एबीपी न्यूजला मिळालेल्या माहितीनुसार,लष्कराच्या ऑपरेशन ऑल आऊटमुळे हिजबुल आणि जैश-ए-मोहम्मदच्या टॉप लिडरचा खात्मा होत असल्याने पाकिस्तानकडून आता नवनवी षडयंत्र रचली जात आहेत.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: jk security forces gun down 5 terrorists during encounter-in-bandiporas-hajin
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV