उत्तर प्रदेशमधील शामलीमध्ये साखर कारखान्यात गॅस गळती, 500 मुलं अत्यवस्थ

उत्तर प्रदेशातल्या शामली भागात एक मोठी दुर्घटना घडली आहे. एका साखर कारखान्यातून बाहेर पडलेलं वेस्टेज नष्ट करण्यासाठी सोडलेल्या गॅसमुळे तब्बल 500 पेक्षा अधिक मुलं अत्यवस्थ झाली आहेत.

उत्तर प्रदेशमधील शामलीमध्ये साखर कारखान्यात गॅस गळती, 500 मुलं अत्यवस्थ

लखनऊ : गोरखपूरमध्ये ऑक्सिजनअभावी मुलांच्या मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, उत्तर प्रदेशातल्या शामली भागात एक मोठी दुर्घटना घडली आहे.  एका साखर कारखान्यातून बाहेर पडलेलं वेस्टेज नष्ट करण्यासाठी सोडलेल्या गॅसमुळे तब्बल 500 पेक्षा अधिक मुलं अत्यवस्थ झाली आहेत.

शामलीतील सरस्वती विद्यामंदीर शाळेतली ही सर्व मुलं आहेत. ज्याठिकाणी हे केमिकल टाकण्या आलं, त्यापासून अगदी काही अंतरावर ही शाळा होती. दुपारच्या सुमारास साखर कारखान्यातील कचरा नष्ट करण्यासाठी टाकण्यात आलेल्या केमिकलचा गॅसमुळे मुलं बेशुद्ध झाली. याप्रकरणी साखर कारखान्यातील सुपरव्हायझरचा हलगर्जीपणा जबाबदार धरलं जात आहे.

सध्या त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पालकांनी साखर कारखान्याचा कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला असून पोलिसांनी याप्रकरणी चौकशी सुरु केली. तसेच याप्रकरणी साखर कारखान्याला दोषी धरलं जात आहे.

दरम्यान, हा साखर कारखाना उत्तर प्रदेश सरकारमधील कृषीमंत्री सुरेश राणा यांच्या मतदारसंघातील आहे.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV