भारतातील 70 टक्के एटीएमवर सायबर हल्ला शक्य, RBI ला अलर्ट जारी

भारतातील 70 टक्के एटीएमवर सायबर हल्ला शक्य, RBI ला अलर्ट जारी

नवी दिल्ली : भारताचा अशा 99 देशांमध्ये समावेश आहे, ज्या देशांवर नुकताच सायबर हल्ला झाला आहे. आंध्र प्रदेश पोलिसांचे 102 कम्प्युटर शनिवारी हॅक करण्यात आले. यामध्ये गंभीर बाब म्हणजे भारतातील 70 टक्के एटीएमवर हा सायबर हल्ला करणं शक्य आहे.

कारण भारतातील 70 टक्के एटीएम अशा आऊटडेटेड सॉफ्टवेअरचा वापर करतात, ज्यांना सहजपणे हॅक केलं जाऊ शकतं. खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, शेअर बाजार आणि पेमेंट कंपन्यांना अलर्ट जारी केला आहे.

भारतातील 70 टक्के एटीएममध्ये आऊटडेटेड विंडोज XP चा वापर केला जातो. याचं संपूर्ण नियंत्रण बँकांना सिस्टम पुरवणाऱ्या कंपनीच्या हातात आहे. मायक्रोसॉफ्टने अगोदरच विंडोज XP ला सपोर्ट करणं बंद केलं आहे. 2014 पासूनच मायक्रोसॉफ्ट विंडोज XP ला सिक्युरीटी आणि इतर टूल्सही देत नाही. दरम्यान इतर देशातील सायबर हल्ल्यानंतर मायक्रोसॉफ्टने विंडोजसाठी अपडेट रिलीज केली आहे.

आंध्र प्रदेश पोलिसांनाही सायबर हल्ल्याचा सामना करावा लागला. पोलिसांचे 102 कम्प्युटर फ्रान्समधून हॅक करण्यात आले. सुदैवाने पोलिसांचा सर्व डेटा सुरक्षित आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

जवळपास 100 कम्प्युटर हॅक करण्यात आले होते, मात्र आता काहीही धोका नाही. एका रॅनसमवेअर व्हायरसद्वारे सिस्टम एन्क्रिप्ट करुन लॉक केली जाते. डेटा रिलीज करण्याच्या मोबदल्यात हॅकर्सकडून पैशांची मागणी केली जाते, असं पंतप्रधान कार्यालयातील सायबर सिक्युरिटी सल्लागार गुलशन राय यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना सांगितलं.

म्हणून रॅनसमवेयर व्हायरसचा हल्ला

इंग्लंडच्या अनेक रुग्णालयांचं म्हणणं आहे की, त्यांचे कम्प्युटर सुरु करण्यासाठी त्यांना खूप अडचणी येत आहेत. जे कम्प्युटर हॅक झाले आहेत. त्यांच्यावर एक मेसेज दाखवण्यात येत आहे. त्यात असं म्हटलं आहे की, फाइल रिकव्हर करायची असल्यास पैसे भरा.

या सायबर हल्ल्यासाठी रेनसमवेयर नावाच्या व्हायरसचा वापर केला असल्याचं म्हटलं जात आहे. रेनसमवेयर हा एक असा व्हायरस आहे की जो तुमच्या कम्प्युटर्स फाइल डिलीट करण्याची धमकी देतो. त्यासोबत अशीही धमकी दिली जाते की, जर तुमच्या फाइल वाचवायच्या असतील तर त्यासाठी पैसे द्या.

हा व्हायरस कम्प्युटरमधील असणाऱ्या फाइल आणि व्हिडिओ इनक्रिप्ट करतो आणि पैसे दिल्यानंतर पुन्हा तुमच्या फाइल सुरु होतात. सुदैवाने हा व्हायरस अद्याप भारतात पसरलेला नाही. पण याचा धोका कायम आहे.

कम्प्युटर व्हायरसपासून बचाव करण्यासाठी काय करावं?

तुमच्या सिस्टममध्ये एखाद्या चांगल्या कंपनीचा अॅण्टी व्हायरस टाकून घ्या. तसेच अॅण्टी व्हायरसची शेवटची तारीख लक्षात ठेऊन ते वेळच्या वेळी अपडेट करा. तसेच तुम्ही तुमच्या कम्प्युटरला जेव्हा कधी मोबाइल, पेन ड्राईव्ह किंवा दुसरे कोणते डिव्हाईस जोडाल तेव्हा ते स्कॅन करुन घ्या. कोणत्या ऑनलाईन साइटवरुन काही डाऊनलोड करण्याआधी पहिले हे पाहा की ती वेबसाइट नोंदणीकृत आहे का. तसेच तुमची सिस्टम वेळच्या वेळी फॉर्मेट करत जा.

काय आहे रॅनसमवेयर व्हायरस?

अनेक देशात रेनसमवेयर नावाच्या कम्प्युटर व्हायरसला सायबर हल्ल्यासाठी जबाबदर  मानलं जातं. यूजर्सकडून पैसे उकळण्यासाठी या व्हायरसचा वापर केला जातो.

संबंधित बातमी : अनेक देशात सायबर हल्ला, रेनसमवेयर व्हायरसमुळे कम्प्युटर ठप्प

First Published:

Related Stories

भारतात घुसखोरी करणाऱ्या पाक सैनिकांकडे शस्त्रास्त्रांसह खास सापळे
भारतात घुसखोरी करणाऱ्या पाक सैनिकांकडे शस्त्रास्त्रांसह खास...

जम्मू : पाकिस्तानी लष्कराच्या बॉर्डर अॅक्शन टीमने (BAT) नियंत्रण

21 'आप' आमदारांवर निलंबनाची टांगती तलवार
21 'आप' आमदारांवर निलंबनाची टांगती तलवार

नवी दिल्ली: आम आदमी पक्षाच्या मोठा झटका बसला आहे. कारण त्यांच्या 21

पंतप्रधान मोदी अमेरिकेसह तीन देशांच्या दौऱ्यावर रवाना
पंतप्रधान मोदी अमेरिकेसह तीन देशांच्या दौऱ्यावर रवाना

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 4 दिवसीय परदेश

VIDEO: ओदिशातल्या रायगडात दोन कोब्रा एकत्र, व्हिडिओ व्हायरल
VIDEO: ओदिशातल्या रायगडात दोन कोब्रा एकत्र, व्हिडिओ व्हायरल

रायगडा (ओदिशा): एखाद्या चित्रपटात दिसणारं क्रोबाचं दृश्यं

‘त्या' पोस्टरनं बुमराह नाराज, जयपूर ट्रॅफिक पोलिसांना सुनावलं!
‘त्या' पोस्टरनं बुमराह नाराज, जयपूर ट्रॅफिक पोलिसांना सुनावलं!

मुंबई: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताचा

सलगच्या सुट्ट्यांमुळे तीन दिवस बँका बंद
सलगच्या सुट्ट्यांमुळे तीन दिवस बँका बंद

मुंबई : आजपासून सलग तीन दिवस देशातल्या सर्व बँका बंद राहणार आहेत.

राष्ट्रपतीपदाचा अर्ज भरल्यानंतर लालकृष्ण अडवाणी एकाकी?
राष्ट्रपतीपदाचा अर्ज भरल्यानंतर लालकृष्ण अडवाणी एकाकी?

नवी दिल्ली : एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 23/06/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 23/06/2017

नीट परीक्षेचा निकाल जाहीर, पुण्याचा अभिषेक डोगरा राज्यात पहिला,

6 जनपथवर पवार-फडणवीस भेटीत नेमकं काय झालं?
6 जनपथवर पवार-फडणवीस भेटीत नेमकं काय झालं?

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत जेव्हा एनडीएच्या राष्ट्रपती

'नीट'मध्ये पुण्याचा अभिषेक राज्यात अव्वल, देशात पाचवा
'नीट'मध्ये पुण्याचा अभिषेक राज्यात अव्वल, देशात पाचवा

नवी दिल्ली : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई)