दिल्लीत चुलत भावाकडून 8 महिन्यांच्या चिमुकलीवर बलात्कार

चिमुकलीची प्रकृती नाजूक ती व्हेंटिलेटरवर आहे. तिच्यावर कलावती सरन रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दिल्लीत चुलत भावाकडून 8 महिन्यांच्या चिमुकलीवर बलात्कार

नई दिल्ली : राजधानी नवी दिल्लीत क्रूरकृत्याची परिसीमा गाठल्याची घटना समोर आली आहे. दिल्लीच्या शकूरबस्ती परिसरात आठ महिन्यांच्या मुलीवर बलात्कार झाल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी चिमुकलीच्या 28 वर्षांच्या चुलत भावाला सोमवारी रात्री उशिरा अटक केली.

हे प्रकरण रविवारचं आहे. चिमुकलीची आई रविवारी रात्री कामावरुन घरी परतल्यानंतर तिला या घटनेबाबत समजलं. जखमी अवस्थेत मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात असून ती व्हेटिंलेटरवर आहे. मुलीचं कुटुंब शकूरपूर वस्तीत राहतं. वडील मजुरी करतात तर आई इतरांच्या घरात धुण्या-भांड्यांचं काम करते.

पोलिसांच्या माहितीनुसार, मुलीची आई रविवारी सकाळी तिला नातेवाईकांकडे ठेवून कामाला गेली. काही वेळाने मुलीचे वडीलही कामासाठी निघाले. संध्याकाळी आई कामावरुन परतली असता, मुलगी रडत होती, आणि तिच्या गुप्तांगांमधून रक्तस्राव सुरु होता.मुलीची आई तिला आरोपीच्या आईकडे ठेवून कामाला गेली होती. तिच्यासोबत खेळण्याच्या बहाण्याने आरोपी तिला वरच्या मजल्यावर घेऊन गेला आणि तिच्यावर अत्याचार केले. आरोपीने चिमुकलीचं तोंड दाबून ठेवलं होतं, जेणेकरुन तिच्या रडण्याचा-ओरडण्याचा आवाज बाहेर जाऊ नये, असंही पोलिस म्हणाले.

लैंगिक अत्याचाराबाबत पोलिसांनी केलेल्य प्राथमिक चौकशी आरोपीने गुन्हा दाखल केलं नाही आणि त्यानंतर तो पसार झाला. यामुळे पोलासांचा संशय बळावला आणि अखेर त्याला अटक करण्यात आली.

आरोपी अविवाहित आहे. त्याच्याविरोधात आयपीसीच्या कलमांअंतर्गत आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत सुभाष पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद झाली आहे.

चिमुकलीची प्रकृती नाजूक ती व्हेंटिलेटरवर आहे. तिच्यावर कलावती सरन रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: 8-month-old girl allegedly raped by her cousin in Delhi
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV