बिहारमध्ये भीषण अपघात, 9 शाळकरी मुलांना चिरडलं

बिहारमधील मुजफ्फरपूरमध्ये आज (शनिवार) दुपारच्या दरम्यान एका बोलेरो कारने 9 शाळकरी मुलांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

बिहारमध्ये भीषण अपघात, 9 शाळकरी मुलांना चिरडलं

मुजफ्फरपूर (बिहार) : बिहारमधील मुजफ्फरपूरमध्ये आज (शनिवार) दुपारच्या दरम्यान एका बोलेरो कारने 9 शाळकरी मुलांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा भीषण अपघात घडला. ज्यामध्ये 20 मुलं जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुजफ्फरपूर जिल्ह्यातील मीनापूर भागातील सरकारी शाळा सुटल्यानंतर हा अपघात घडला. शाळेतील सर्व मुलं राष्ट्रीय महामार्गावरुन घरी परतत असताना एका नियंत्रण सुटलेली बोलेरो तुफान वेगाने मुलांच्या अंगावर आली. यात 9 मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये 7 वर्षापासून 13 वर्षापर्यंतच्या मुलांचा समावेश आहे. या अपघातानंतर बोलेरो रस्त्याच्या कडेला जाऊन पलटली. तर चालकही फरार झाला.

दरम्यान, अपघातातील सर्व जखमी मुलांवर श्रीकृष्ण मेमोरिअल कॉलेज रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त बोलेरो ताब्यात घेतली.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: 9 students dead in road accident at muzaffarpur bihar latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV